तुम्ही कधीच पाहिलं नसेल पैसाचा पाऊस पाडणारे फुल… जाणून घ्या चमत्कारिक फुलाबद्दल…

नमस्कार मित्रांनो,

आपण खूप कष्ट करूनही जर घरात पैसा टिकत नसेल. काही ना काही प्रॉब्लेम येत असतील. पैसा भरपूर येतो परंतु घरात टिकत नसेल तर हा प्रयोग खास तुमच्यासाठीच आहे.

गोकर्ण चे फुल तुम्ही बघितलेच असेल. गोकर्ण या फुलाची नाजुक अशी वेल असते. त्याला निळ्या रंगाचे फुले येतात. एक पांढऱ्या गोकर्णाची वेल असते. या फुलांचा आकार गाईच्या कानाप्रमाणे असल्याने त्यांना गोकर्ण असे म्हणतात.

हिंदी त्या फुलाला अपारजिता असे म्हणतात. हे फूल आरोग्याच्या दृष्टीने ही खूप उपयुक्त आहे. आपले रक्त शुद्ध करून शरीर आतून साफ ठेवण्याची काम गोकरणा ची फुले व पाने करतात.

त्याच्या फुलांचा व पानाचा रस आपण नियमितपणे घेतल्यास आपले रक्त शुद्ध होऊन शरीर उत्तर आहे. हे तर झाले आरोग्याविषयी पण तांत्रिक दृष्ट्या ही या फुलाचे फार महत्त्व आहे.

जर घरात पैसा टिकत नसेल, पैशाला पैसा लागत नसेल, पैसे भरपूर येतात पण शिल्लक राहत नसतील तर या झाडाचा व फुलांचा असा उपयोग करा. त्यामुळे तुमच्या हातात नेहमी पैसा खेळता राहील व घरात पैसा टिकेल.

त्यासाठी ज्या ठिकाणी ही वेल असेल त्या ठिकाणी शनिवारी सायंकाळी जावे. परंतु निळ्या फुलांची वेल असावी. पांढर्‍या फुलांची नाही. मग त्या वेलीला दिवा अगरबत्ती लावून हात जोडावे व आमंत्रण द्यावे की मी उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला येणार आहे. तुम्ही माझ्यासोबत चलावे व माझ्या घरी पैशाची भरभराट करावी.

किंवा इतर आरोग्यविषयक किंवा कौटुंबिक समस्या असतील त्या सांगाव्यात व दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी स्नान झाल्यानंतर त्या वेली जवळ जाऊन त्या वेलीची काही मुळे उपटून आणावीत. त्याबरोबरच दोन-चार फुलेही आणावेत.

घरी आणून ती फुले देवी लक्ष्मीला अर्पण करावीत. कारण गोकर्णाच्या फुलांना देवी लक्ष्मी चे स्वरूप मानले जाते. ते मूळ एका लाल कापडात आपल्या तिजोरीत, गल्ल्यात किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावे.

नंतर दुसऱ्या दिवशी देवघरातील फुले उचलून आपल्या पाकिटात व तिजोरी ठेवून द्यावे. जोपर्यंत आपल्याकडे ही फुले आणि मूळे आहेत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी होणार नाहीत.

पैसा टिकू लागेल. उत्पन्नात वाढ होईल व खर्चाला आळा बसेल आणि बचत वाढेल. हा प्रयोग करून पहा. खरेच खुप प्रभावी, जबरदस्त उपाय आहे व आपल्या घरात पैशांची भरभराट करा.

आजारी व्यक्तीसाठी याचा उपाय करायचा असेल तर त्याची मुळे आणून आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवावीत. हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा झालेली आपल्याला दिसेल.

जे उपाय दिसायला अगदी साधे असतात परंतु त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. कोणताही उपाय करताना त्यावर विश्वास असणे आवश्यक आहे. संपूर्ण श्रद्धेने व विश्वासाने आपण कोणताही उपाय केला तर त्याचे परिणाम हे मिळतातच.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *