मूल म्हणून आपल्या घरी कोण जन्म घेते नक्की वाचा.

नमस्कार मित्रांनो,

पूर्वजन्मातील कर्मानुसारच आपल्याला या जन्मात आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मित्र शत्रू आणि सगे संबंधी नातेवाईक या जीवनातील जे काही नातेसंबंध आहेत ते सर्व मिळतात. कारण या सर्वांना आपल्याला काही द्यायचे असते अथवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते.

ते मागील जन्माची उधारी उसनवारी बाकी असते. आता आपण बघुया की, आपल्या मुलाबाळांच्या रूपात कोण येतात? तसे तर संतान रुपात आपल्या पूर्वजन्मातील कोणीतरी नातेवाईकच जन्म घेत असतात. ज्याला शास्त्रामध्ये 4 प्रकारे सांगितलेले आहे. पहिले म्हणजे ऋणानुबंध – मागील जन्मातील असा कोणी जीव ज्यांच्याकडून मागील जन्मी आपण ऋण घेतले असेल,

किंवा ज्याचे धन आपण नष्ट केलेले असेल असा जीव आपल्या घरात आपले संतान म्हणून जन्म घेतो व आपले धन त्याचे आजारपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टींवर खर्च करणे अशा प्रकारे नष्ट होत राहते. जोपर्यंत त्या जीवाचा संपुर्ण हिशोब क्लियर होत नाही तो पर्यंत असेच चालते.

दुसरे म्हणजे पूर्व शत्रू – मागील जन्मातील आपला एखादा शत्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात संतान म्हणून जन्म घेतो आणि मोठा झाल्यावर आपल्या आई-वडिलांना मारझोड करणे, भांडण तंटे करणे, त्रास देणे अशा प्रकारे संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्रासच देत राहतो. नेहमी वाईट साईट बोलून त्यांना दुखी करेल, अपमानित करेल व त्यांचे दुःख पाहून स्वतः आनंदी होईल.

तिसरे म्हणजे उदासीनता पुत्र – या प्रकारचे संतान आपल्या आई वडिलांची सेवाही करत नाहीत व त्यांना त्रासही देत नाहीत. त्यांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत तसेच राहू देतील. एकदा का विवाह झाला की, अशी मुले आपल्या आई-वडिलांपासून वेगळे व दूर राहणेच पसंत करतात

चौथा म्हणजे सेवक पुत्र – मागील जन्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जीव त्यांच्यावरील सेवेचे ऋण फेडण्यासाठी या जन्मात आपली संतान म्हणून जन्म घेतात आणि आपल्या सेवेत आपले जीवन घालवतात. आपण जे पेरले असेल तेच तर उगवेल ना.

आपण जर आपल्या आई-वडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुली मुले आपली सेवा करतील नाही तर कोणी पाणी पाजणारे ही भेटणार नाही. असे नाही की, या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यावरच लागू होतात या 4 प्रकारांमध्ये कोणताही जीव असू शकतो.

जसे आपण जर एखाद्या गाईची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर ते ही आपला मुलगा किंवा मुलगी म्हणून येऊ शकते. जर तुम्ही एखाद्या गाईला फक्त आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तिने दूध बंद केले तर त्यानंतर तुम्ही तिला टाकून दिली असेल किंवा सोडून दिले असेल तर तिच तुमची ऋणानुबंध संतान म्हणून जन्म घेईल आणि आपले कर्ज परत मागेल.

जर आपण एखाद्या निरपराध जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपला शत्रू बनवू येईल आणि त्याचा बदला घेईल. म्हणूनच जीवनात कधीही कोणाचेही वाईट करू नये. कारण निसर्गाचा हा नियमच आहे की, आपण जे काही कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला या जन्मात नाही तर पुढील जन्मात 100 पटीने अधिक मिळते.

जर तुम्ही कोणाला एक रुपया दिला असेल तर तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा होतील. जर तुम्ही कोणाकडून एक रुपया लुबाडला असेल किंवा घेतला असेल तर तुमच्या खात्यातून शंभर रुपये कमी होतील. विचार करा की, आपण येताना बरोबर कोणते धन आणले होते आणि आपण मेल्यानंतर किती बरोबर घेऊन जाणार आहोत.

जे निघून गेले त्यांनी किती धन, सोने-चांदी आपल्यासोबत नेले. आपण मेल्यानंतर जे काही धन, पैसे, सोने-चांदी घरदार, जमीनजुमला मागे राहिला असेल तर समजावे की, ते तर आपण व्यर्थच कमविले. जर आपली मुले मुली चांगले असतील तर त्यांच्यासाठी काहीही सोडून जाण्याची आवश्यकता नाही.

ते स्वतःच कमवून खातील आणि आपले जीवन आयुष्यारामात जगतील. परंतु जर आपली मुले मुली बिघडलेली व नालायक निघाली तर त्यांच्यासाठी कितीही धन सोडून जा थोड्याच दिवसात ते आपली सर्व संपत्ती नष्ट करतील. मी, माझे, मला आणि ही सर्व धनसंपत्ती इथल्या इथेच राहील काहीही आपल्यासोबत जाणार नाही.

बरोबर काही जाणार असेल तर फक्त आपली चांगली कर्मे, आपले चांगले वर्तन म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे पुण्य साठवण्याचे काम करा. चांगले कर्म करा वाईट कर्मापासून दूर राहून सत्कर्म करा व इतरांची सेवा करा. इतरांकडून सेवा करून घेऊ नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.