नमस्कार मित्रांनो,
!! श्री स्वामी समर्थ ! जय जय स्वामी समर्थ !!
तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो समोर तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला जेव्हा योग्य वेळ मिळेल त्यावेळेला जाऊन बसा.
स्वामींना हात जोडून नमस्कार करा. मुजरा येत असेल तर मुजरा करा. त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामींकडे बघा. तुम्हाला जी काही समस्या असेल, ज्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नाहीत, तुम्हाला जी अडचणी आहेत त्या सगळ्या स्वामींना त्यावेळी सांगा.
सगळं काही स्वामींना सांगा. अशा परिस्थिती मध्ये सांगा, समजवा की स्वामी खरंच तुमच्या समोर बसलेले आहेत आणि त्यानंतर स्वामींना प्रार्थना करा.
स्वामीराया, तुम्हीच आता मला मार्ग दाखवा. तुम्हीच माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्हीच मला या अडचणी मधून, दुःखा मधून, संकटांमधून बाहेर काढा. त्यानंतर स्वामींना हात जोडून नमस्कार करा.
बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. जे मार्ग मिळत नव्हते ते मार्ग देखील मिळतील. कोणीतरी येऊन तुमची मदत करून जाईल. संकटा मधून, समस्यांमधून, दुःखा मधून आणि अडचणींमधून तुम्ही बाहेर याल.
हा चमत्कार नक्की होतो आणि हा अनुभवसुद्धा आपल्याला येऊ लागतो. आपल्या आयुष्यात स्वामी आहेत म्हणून आपण कोणत्याच गोष्टीची काळजी, चिंता करायची नाही.
स्वामी नेहमी आपल्याला तेच देतात जे त्यांना योग्य वाटते. ते देत नाही जे आपल्याला योग्य वाटते. आयुष्यात दुःख, संकटे फार असतात. परंतु कधी रडायचे नसते. कारण आपल्या सोबत स्वामी महाराज असतात.
कधी कधी असेही होते की आपण सोने मागत असतो आणि आणि आपल्याला हिरा देतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. निर्णय मनुष्याचे चुकतात. ईश्वराचे कधीही चुकत नाही.
श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.