नमस्कार मित्रानो,
श्री स्वामी समर्थ आज आपला समाज इतका पुढारलेला आहे की आजही काही लोक मुलगी झाली की नाक मुरडतात. मुलगा झाला की पेढे वाटले जातात.
सर्वांना वाटते की आपल्याला एक तरी मुलगा असावा मुलगी नसेल तरी चालेल. वंशाला दिवा हवा.
पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते व गर्भ धारण केला जातो.
पण पहिला मुलगा असेल तर दुसरी मुलगी व्हावी अशी अपेक्षा नसते. आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कण्यादानात त्यांची मुलगी घरात आणतो.
त्या दानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणालातरी कन्यादान करावे लागते. त्यासाठी कन्या असावी लागते. ही परतफेड केली नाही तर या संसारातून मुक्त होऊ शकत नाही.
मुलगा फक्त एका कुळा चाच उद्धार करतो. मुलगी सासर आणि माहेर या दोन्ही कूळा चा उद्धार करते. ईश्वराची कृपा ज्या घरावर असते त्या घरात मुलगी जन्माला येते.
मुलगी ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते. मुलगी घरात आली की घरात सुख, समृध्दी येते. घरातील वातावरण मंगलमय होते. मुलीपासून जी माया आईवडिलांना मिळते.
ती मुलापासून मिळत नाही. असे म्हणतात की आपल्या पिढ्यांमध्ये जर एखादा संत महात्मा ज न्माला आला तर त्याच्या मागील व पुढील 21 पिढ्यांचा उद्धार होतो.
<
काय सांगता येते आपल्या कन्येच्या गर्भातून च एखादा संत महात्मा जन्माला आला. तर आपला लगेचच उद्धार होईल. आजकाल मुले आईवडिलांना सांभाळायला नकार देतात तेव्हा मुलीचं आई वडिलां चा सांभाळ करतात.
मुलांपेक्षा कितीतरी अधिक पटीने ते आई वडिलां चा सांभाळ करतात. म्हातारपणाची काठी म्हणून मुले नाही तर मुली ताठ मानेने उभ्या राहतात. मुलीचे आई पेक्षा वडिलांवर खूप प्रेम असते.
त्यामुळे बऱ्याच गोष्टी पटवून देण्याचे कामही मुलीला चांगल्या प्रकारे जमते. आई वडिलांना रागावते तेव्हढेच प्रेमही करते. जे आईलाही नाही जमणार.
मुलीने काही सांगितले आणि वडिलांनी ऐकले नाही असे होत नाही. अशी गोंडस, लाडकी लेक सर्वानाच असावी.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी मिसळ हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी मिसळ पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी मिसळ पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.