घरात काढा ही शुभचिन्ह तीस सेकंदात चमत्कार, फरक पडेल.

नमस्कार मित्रांनो,

स्वामी म्हणतात की आपल्या घरात नेहमी शुभचिन्हे काढा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घरावर केलेली काळी जादू, करणी, वाईट नजर दोष सर्व दूर होऊन तुमच्या घरात सुख शांती नांदेल.

वास्तुनुसार घरांच्या भिंतीवर काही शुभचिन्ह लावता येतात. यामुळे घरातील वास्तुदोष दूर करता येतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही शुभ चिन्हं बद्दल जे घरात लावल्याने सौख्य आणि समृद्धी वाढते.

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रात घरांच्या दिशांची काळजी प्रामुख्याने घेतली जाते. कधीकधी घराची रचना अशी असते की ज्यामध्ये बदल करणे शक्य नसतं. अशावेळी घरात अशी काही शुभचिन्हे काढली जातात यामुळे घरातील वास्तुदोष दूर करता येतात.

वास्तुनुसार घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक चिन्ह असायला पाहिजे. स्वास्तिक चिन्ह बनवल्याने नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो. सगळीकडून एकसारखे दिसून येते म्हणून घरातील वास्तुदोषांना दूर करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं.

प्रत्येक सणासुदीला घराच्या मुख्य द्वारावर शेंदूराने शुभ-लाभ काढण्याची पद्धत आहे. मुख्य द्वारावर हळदीचे टीपके दिल्याने घरात सुखसमृद्धी येते. हळद ही शुभ प्रतीक आहे व पिवळा रंगही बृहस्पति, गुरु चा घटक आहे. यामुळे घरात सुख समृद्धी येते. रोगराईचा नायनाट होतो. प्रत्येक घरासाठी ही चिन्हे काढणे आवश्यक आहेत.

वास्तुशास्त्रानुसार मीनच्या प्रतीक चिन्हांचा घरातील उत्तर दिशेस ठेवायला पाहिजे. असे केल्याने धनलाभ होतो. जर आपल्याच मिनचे प्रतीक ठेवायचे नसल्यास आपण फिश एक्वेरियम सुद्धा ठेवू शकता. यामुळे घरात पैसे वाढतात.

ओम् हे सृष्टीचे निर्माते परमपिता ब्रह्मा चे प्रतीक आहे. ओम चिन्ह घरात ठेवल्याने घरात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि घरातील रोगांचा नायनाट होतो. आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये जास्त प्रमाणात राहते.

शास्त्रानुसार श्री गणेश हे आराध्य दैवत आहेत. सर्वप्रथम आपण त्याची उपासना केली पाहिजे आणि केली जाते ही. घराच्या मुख्य द्वारावर त्यांचे चित्र लावल्यास घरात सुख-समृद्धी, आरोग्य सर्व काही येते.

घराचे मुख्य द्वार दक्षिण मुखी असल्यास दारावर पंचमुखी मारुती चे चित्र असावे. दाराच्या मधुमती क्रिस्टल चे बॉल लोंबकळत ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात वाढत असते.

तर मित्रांनो ही काही शुभ चिन्हे आपण आपल्या घरामध्ये नक्की लावायला पाहिजेत. यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात व आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्या सर्वकाही नांदते.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *