घरात जपमाळ असेल तर ही चूक करू नका, घर बरबाद होईल.

नमस्कार मित्रांनो,

अनेक देवी-देवतांच्या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्या घरात आपण जपमाळ ठेवतो. ही जपमाळ अनेकदा तुळशीची असते. कधी रुद्राक्षांची असते. तर अनेक लोक स्फटिकाची जपमाळ सुद्धा वापरतात.

जपमाळ कोणतीही असू द्या. त्या जपमाळ बाबतचे काही नियम आपण कटाक्षाने पाळा अन्यथा फायद्याऐवजी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागू शकते. विशिष्ट देवी-देवतांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो.

जपमाळ याविषयी हिंदू धर्मशास्त्र असं मानतो की ज्या प्रकारे दर्भा शिवाय धर्मानुष्ठान, उदक स्पर्शाशिवाय दान व जपमाळ शिवाय न मोजता केलेले जप सर्व कर्म निष्फळ आहेत. म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जर आपण जपमाळ याचा वापर केला तर त्याचे फळ हे कित्येक पटीने अधिक प्राप्त होतं.

शक्यतो मंत्रांचा जप हा जपमाळेवरच करावा. मात्र जप करताना एकाच माळेवर भिन्न म्हणजेच वेगवेगळ्या देवतांचे जप जपू नयेत. लक्षात घ्या एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मंत्राचा जप करण्यास हिंदू धर्म शास्त्र मनाई करत.

मात्र जर तुमची इच्छा असेलच तर आपण एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी-देवतांचा जप करू शकता. मात्र सौम्य आणि उग्र अशा दोन देवतांच्या मंत्रांचा एकत्रित जप एका माळेवर करू नये.

लक्षात घ्या एखादी देवता सौम्य आहे आणि एखादी देवता उघडा आहे. उदाहरणार्थ काली माता ही उग्र देवता आहे. तर एकाच माळेवर काली मातेचा मंत्र आणि त्याच माळेवर भगवान श्रीहरी विष्णूचा जप करून चालणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो आपली जी माळ आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. ती कधीच खुंटीला अडकवून ठेवू नका. तिच्यासाठी आपण एखादी डबी किंवा एखादी वाटी करू शकता.

आपल्या जपमाळेचा चुकूनही कधी अपमान करू नका. अनादर करू नका. दररोज नित्य नियमाने त्या माळे वरती एक फुल अवश्य वाहा आणि आपल्या घरात कितीही माणसे असू द्या. एका व्यक्तीने वापरलेली जपमाळ ही दुसऱ्याने कदापिही वापरू नये.

जर आपल्या जपमाळेस दुसऱ्या अन्य कोणत्या व्यक्तीचा स्पर्श झालाच, चुकून झाला तर यावेळी आपल्या जपमाळेस पंचगव्याने स्नान घालावं म्हणजे ती शुद्ध होते.

मित्रांनो जपमाळ याचे माहात्म्य हे खूप मोठ आहे. खरं तर या जपमाळे मुळे जप किती झाला, आपण किती मंत्र बोललो हे आपल्याला अगदी अचूक कळते आणि ही माळ रुद्राक्ष, तुळशीपासून बनवलेली असल्यामुळे या पवित्र वस्तुंचा सानिध्य आपल्याला सहजासहजी प्राप्त होतं.

आपण जेव्हा जप करतो तेव्हा अंगठ्यामध्ये आणि बोटांमध्ये जे घर्षण निर्माण होते त्यातून निर्माण होणारी विद्युत शक्ती ही विलक्षण असते. ती आपल्या शरीरातील नसा द्वारे आपले हृदय प्रभावित करते. आपल्या मनाची एकाग्रता वाढवते.

विशेष करून जेव्हा एखाद्या विशिष्ट देवतेची तिथी असेल, एखादा उत्सव काळ असेल त्या काळामध्ये केलेल्या देवतेचा नामजप हा अत्यंत प्रभावी ठरतो. कारण त्यादिवशी त्या तिथीला त्या विशिष्ट देवतेचे तत्त्व हे मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं.

मग देवतांचा जन्मदिवस असेल, उत्सव असेल त्या त्या काळामध्ये आपण अधिकाधिक नामजप करा. तितके जास्त त्या देवतेचे तत्व तुम्ही ग्रहण करू शकाल. अनेक लोक एखाद्या देवतेच्या मंत्राचा जप करु लागतात. काही दिवस त्या मंत्राचा जप करतात आणि काही दिवसानंतर हा जप बदलतात.

थोडक्यात म्हणजे काही दिवस भगवान रामाचं नाव घ्यायचं आणि मग कोणीतरी सांगतो आणि त्यांच्या सांगण्यावरून आपण दत्तभक्ती कडे वळतो. तर असे करू नये.

मित्रांनो हे सर्व देवी-देवतांची करा. मात्र ज्या देवतेचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. ज्या देवतेचे नाव घेतल्यामुळे, स्मरण केल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो, काही अध्यात्मिक अनुभव तुम्हाला येतात. तोच मंत्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडून ठेवा.

शेवटचा श्वास सुटताना सुद्धा अगदी तोच मंत्र आपल्या तोंडून बाहेर पडावा. जी व्यक्ती मरतेवेळी आपल्या मुखामध्ये आपण आयुष्यभर घेतलेलेच नाव म्हणजे आपण आयुष्यभर जो मंत्र जपलेला आहे तोच मंत्र ज्या व्यक्तीच्या तोंडात असतो त्या व्यक्तीला मुक्ती अगदी सहजासहजी मिळते. वासनेच्या गुंत्यातून ती व्यक्ती बाहेर पडते.

तर मित्रांनो जपमाळ विषयीची ही माहिती नक्कीच लक्षात ठेवा. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *