नमस्कार मित्रांनो,
झाड लावल्याने पर्यावरणाचं रक्षण होत असे नव्हे. तर आपल भाग्य बदलण्याची क्षमता सुद्धा या झाडामध्ये असते. मित्रानो काही काही झाडे इतकी महत्वाची आहेत. की त्यामुळे आपल्या घरातील, अंगणातील वातावरण पवित्र बनतं. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. सकारात्मक ऊर्जा मध्ये वाढ होते. तुम्हालाही वाटत की तुमच्या घरामध्ये सुख, समृध्दी यावी. बँक बॅलन्स वाढावा.
तुम्हाला समाजात योग्य तो मान सन्मान मिळावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. ही पाच झाड नक्की लावा. ही पाच झाड कशाप्रकाची आहेत. या झाडांनी खरंच फायदा होतो का? झाला तर तो कशा प्रकारे होतो. आणि झाड लावताना कोणती सावधानता बाळगावी हे आपण पाहणार आहोत. सविस्तर माहिती घेणार आहोत. ही झाड लावताना ती जमिनी मध्ये लावणंफार महत्वाचं आहे.
जर तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल शहरामध्ये राहत असाल. तर तुम्ही कुंड्यांचा सुद्धा वापर करू शकता. कुंड्यांमध्ये ही झाड आवश्य लावा. जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर आपण भिंतींवर या झाडांची चित्र लावू शकतो. मात्र जमिनीत ही झाडे लावल्याने सर्वाधिक फायदा होतो. कुंडीत लावल्याने आणि मग नंतर चित्र लावल्याने सर्वात पहिलं झाड आहे की जे सर्वात महत्वाचं आहे.
आणि हे झाड दुर्लभ सुद्धा आहे. म्हणजे ते सहज सहजी आपल्याला मिळणार नाही. हे झाड आहे पारिजातक च ज्याला हिंदी मध्ये पारिजात असे म्हणतात. मराठी मध्ये पारिजातक असे म्हणतात. मित्रानो या झाडाचं महत्व इतकं मोठं आहे. की ज्यावेळी राक्षस आणि देवांनी समुद्र मंथन केले होते. तर या समुद्र मंथन मधून चौदा रत्ने बाहेर पडली. आणि यामध्ये अकरावा रत्न होत.
ते म्हणजे हे पारिजातक च झाड. मित्रानो शास्त्र अस मानत की या झाडाचा स्पर्श जरी झाला तरी तुमचा सर्व थकवा निघून जातो. तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण होत. प्रकारची एनर्जी निर्माण होते. सर्व देवी देवतांना हे झाड अतिशय प्रिय आहे. हे झाड स्वर्ग मध्ये सुद्धा आढळते. घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता निर्माण करते. या झाडाला मनमोहक असा सुगंध आहे.
म्हणून परमात्म्याला सुद्धा हे झाड अती प्रिय आहे. तुम्हाला तुमच्या कुलदेवी किंवा कुलदेवतेचा दोष उद्भवला असेल. तर हे झाड लावल्याने आपल्या घरातील दोष दूर होतात. बऱ्याचदा आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो. आणि मग त्याचा दोष आपल्या माथी लागतो. त्यामुळे आपल्या घरात पैसा वैगरे टिकत नाही. कोणत्याही कामात यश येत नाही.
हे झाड लावल्यावर या झाडाची नित्य नियमाने काळजी घेतल्यावर आपल्या हातून जो गुन्हा झालेला आहे. काही अंशी सुटका नक्की होते. रुईचे जे झाड आहे त्यातल्या त्यात पांढरी रुई जी आहे. ही पांढरी रुई सहजासहजी मिळणार नाही. हे झाड अतिशय श्रेष्ठ मानले जाते. कारण जर हे झाड तुम्ही तुमच्या अंगणात लावलं. रुई झाड हे शक्यतो एखाद्या कोपऱ्यात लावा ज्याठिकाणी लहान मूल जाणार नाहीत.
या झाडातून एक प्रकारचा रुचिक आपण जे म्हणतो ती बाहेर पडतो. तो जरासा विषारी असतो. म्हणून हे झाड एखाद्या कोपऱ्यात लावलेलं अतिशय चांगलं. आपल्या घराची उत्तर दिशा ही शुभ मानली जाते. जर उत्तर दिशेला ही झाड लावणं शक्य नसेल तर दुसरी दिशा आहे ईशान्य दिशा. पूर्व आणि उत्तर च्या मधली जी दिशा आहे ती दिशा ही दिशा सुद्धा अतिशय शुभकरक समजली जाते.
<
तेही शक्य नसेल तर पूर्व दिशेला सुद्धा शुभ मानले जाते. मात्र चुकूनही दक्षिण दिशे ला लावू नका. रुई झाड लावल्यानंतर त्याला जी फुल येतात. ही फुल आपण भगवान शिव शंकराना आणि श्री गणेशाना वाहू शकता. असा हे झाडं लावल्याने आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. ११ वर्ष जर या झाडाची काळजी घेतली तर या झाडाच्या मुळात गणपती बाप्पा प्रकट होतात. असा शास्त्र म्हणत.
जर तुम्हाला समाजात मान सन्मान हवा असेल राजकारणात हवा असेल तर हा झाड अवश्य लावा. पांढऱ्या रुईच झाड लावल्याने आपल सूर्य ग्रह ताकदवान बनतो. ज्यावेळी आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह ताकदवान बनतो त्यावेळी समाजात आपोआपच मान सन्मान मिळतो. यश, कीर्ती आपल्या जीवनात येते. राजकारणात मोठ यश सुद्धा मिळतं.
मित्रांनो आता पाहुया; तिसर झाड तिसरे झाड आहे आवळ्याच, मित्रांनो आवळा ज्याचे गुणधर्म खूप सारे आहेत आवळ्या मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळत आणि आपले अनेक रोग बरे करण्याची क्षमता, थोडक्यात आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम हे आवळ्याचं झाड करत असतं.
ज्याप्रकारे आयुर्वेदात या आवळ्याचं महत्व आहे अगदी त्याचप्रकारे मित्रांनो आपल्या मध्ये महालक्ष्मीला चिरस्थाई ठेवण्याचं काम म्हणजेच आपल्या घरामध्ये मातालक्ष्मीला स्थाई रूपामध्ये वास करण्यासाठी हे झाड आपल्याला मदत करत. मित्रांनो याचं कारण असा आहे की आवळ्याचे झाड या आवळ्याच्या झाडांमध्ये भगवान श्री विष्णुचावास मानण्यात आलेला आहे.
म्हणजेच भगवान विष्णू या झाडामध्ये असतात. आणि म्हणून श्री विष्णूनारायननांच हे झाडं ज्यावेळी आपण आपल्या अंगणामध्ये लावतो आपल्या घरात लावतो त्यावेळी माता लक्ष्मी त्याठिकाणी आवश्यक येते, ज्याठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी मातालक्ष्मी या असणारच. आणि म्हणून असंही झाड सुद्धा आपण अवश्य लावा. त्याचे तुम्हाला आरोग्यदृष्ट्या अनेक फायदे होतील आणि धन संबंधी सुद्धा याचे खूप सारे फायदे होतात.
मित्रांनो हिजी झाड आपण लावत आहोत! हे कसं होतं की आम्ही काही उपाय सांगतो आणि तुम्ही ते करायला जाता मात्र हे उपाय अर्धे अधुरे या प्रकारे केले जातात. म्हणजे तो उपाय संपूर्णपणे ऐकला जात नाही. विनंती आहे की हे उपाय तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत चला आणि जर तुम्हाला एखादा भाग समजलं नाही तर तो उपाय पुन्हा एका आणि काळजीपूर्वक या गोष्टी समजून घ्या.
हे पाहताना मी तुम्हाला दिशानबद्दल सांगितलं की उत्तर दिशा ईशान्य दिशा आणि पूर्व दिशा या दिशा शुभ आहेत आणि दक्षिण दिशा ही अशुभ मण्यात येते. तर मित्रांनो ही जी झाडं आपण सांगत आहोत तर या झाडांना तुम्ही चुकूनही अंघोळ न करता स्पर्श करू नका. म्हणजे आपण आधी स्वतःला स्नान करावं पवित्र व्हावं! मगच आपण या झाडांना स्पर्श करायला हवा.
दुसरी गोष्ट म्हणजे या झाडांनमध्ये दैवत्व आहे म्हणजेच त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर व परमात्मा वास करत आहेत.अशा प्रकारची भावना श्रेष्ठत्वाची भावना आपल्या मनामध्ये सतत असायला हवी कारण अशी ही भावना असल्याशिवाय या झाडांवरती आपली ची श्रद्धा आहे ती असणार नाही. श्रद्धेशिवाय कोणतीही गोष्ट अशक्य आहे तर मित्रांनो अस हे आवळ्याच झाड आपण लावू शकता.
जे चौथ झाड आहे ते आहे कडीपत्त्याच ज्याला हिंदी मध्ये मीठानीम या नावानेसुद्धा ओळखलं जातं. मित्रांनो याची सुद्धा आयुर्वेदिक दृष्ट्या औषधे दृष्ट्या खूप सारे फायदे आहेत. आपल्याला माहीत असेल की आपलं वाढतं वय कमी करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती जर सुरकुत्या पडलेल्या असतील, जर आपले केस पांढरे होऊ लागले असतील तर मित्रांनो जी काही म्हातारपणाची लक्षण आहेत.
ती म्हातारपणाची लक्षणे कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कढीपत्त्याचा आवर्जून वापर करा. तुम्ही जेव्हा भाजीमध्ये ही पानं वापरता तर ही पानं कुस्करुन खातात चला, तुम्हाला खूप सारा फायदा होईल तुम्ही तरुण दिसू लागले. मित्रांनो आयुर्वेदामध्ये या प्रकारे फायदे आहेत त्याच प्रकारे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा याचे मोठे फायदे आहेत.
तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम हा कडीपत्ता करत असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट किजे तीन ग्रह आहेत ज्यांना आपण पापी ग्रह म्हणतो, शनी आहे राहू आहे आणि केतू आहे मित्रांनो या शनी राहू केतू यांना शांत करण्याचे काम त्यांना प्रसन्न करण्याचे काम हा कडीपत्ता करत असतो.
आणि म्हणून ज्या घरामध्ये हे कडीप्त्याच रोपट लावलं जातं हे झाड लावल् जात त्या घराला कधीही शनि पासून राहू पासून केतू पासून काही त्रास होत नाही. आणि मित्रांनो जे शेवटचं झाड आहे ते आहे तुळस आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक हिंदुधर्मीय यांनी आपल्या घरासमोर तुळस ही लावायलाच हवी. ज्या घरामध्ये अंगणामध्ये तुळस लावली जाते.
मित्रांनो त्या घरांमध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. किंवा आपण पाहतो की लोकांच्या वाईट नजरा आपल्याकडे घराकडे पुन्हापुन्हा जात असतात, आपल्या घराला लोकांची नजर लागत असते, तर अशा वाईट नजरेपासून सुद्धा हे तुळशीचे झाड आपल रक्षण करत. मित्रांनो तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं म्हणजेच भगवान विष्णूना तुळस अतिशय प्रिय आहे.
आणि म्हणून अशी ही तुळस लावल्याने भगवान विष्णू प्रसन्न तर होतातच मात्र ही लक्ष्मी स्वरूपात तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही. ज्या घरासमोर तुळस लावली जाते आणि तुळशीची नित्यनेयमाने पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळ सायंकाळी ज्या घरामध्ये संध्याकाळी तुळशीसमोर नित्य दिवा लावला जातो.
कधीही आजारपण येत नाही त्या घरामध्ये पैशाची तंगी कधीही जाणवत नाही. प्रत्येक प्रकारचे सुख आणि समाधान त्या घराला मिळत. मित्रांनो हीजी झाडे मी तुम्हाला पाच झाडं सांगितलेली आहेत त्यांच्यामध्ये देवत्वाची भावना असल्याची श्रद्धा ही आपल्या मध्ये नियमित पणे ठेवा. झाडांना न चुकता जल अर्पण करत चला; त्यांना नियमितपणे पाणी घालत चला.
अशा प्रकारे आपण घरातील लोकांची काळजी घेतो, या झाडांची काळजी घेतली जर तुम्ही तर तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करतील. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील.तुमच्या घरातील प्रत्येक समस्या ही झाडं दूर करतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.