नमस्कार मित्रांनो,
आज आपण लक्ष्मी टिकण्याची काही कारणे पाहणार आहोत. कळत नकळत आपल्या तोंडून असे काही शब्द बाहेर पडतात की ज्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते नाराज होते आणि आपले घर सोडून जाते. स्त्रियांनी या गोष्टीचे पालन नक्की करा. ते शब्द नेमके कोणते आहेत हे जाणून घेऊया.
आपल्या हळदीकुंकवाच्या करंड्यातले कुंकू संपले आहे, त्यात टाकायला हवे असे बोलू नका. कारण कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. कुंकू कधीच संपू नये ते अखंड वाढतच राहावे. असे आपण बोलायला हवे. जर कुंकू संपलेले असेल तर कुंकू वाढलय असे म्हणावे. कुंकू संपलय या शब्दाऐवजी कुंकू वाढलय या शब्दाचा आपण प्रयोग करावा.
तीच गोष्ट मंगळसूत्राची एखाद्या कारणास्तव आपलं मंगळसूत्र तुटते तुटल्यानंतर पुन्हा ओवून घ्यावे लागते. मंगळसूत्र तुटले असे बोलू नका कारण मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार आहे. ते कधीच तुटू नये आणि जर तुटलाच तर मंगळसूत्र तुटले या शब्दाऐवजी मंगळसूत्र वाढलय ओवायला हवे असे असे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडायला हवेत. हीच गोष्ट आहे हातातल्या बांगड्यांची.
हातातील बांगड्या फुटल्या तर बांगड्या फुटल्या असे न म्हणता बांगड्या वाढवल्या आहेत असे म्हणावे. आपली आजी असेल पणजी असेल आणि ह्या गोष्टींच पालन अगदी अचूक केले होते. स्त्रियांनीसुद्धा या गोष्टीचे पालन करा. कारण कुंकू असेल बांगड्या असतील मंगळसूत्र असेल ही सर्व सौभाग्याची लेणी आहेत. ती अखंड असावीत, टिकून राहावित त्यांच्यामध्ये वाढ होत जावी.
तसेच, घरात लक्ष्मी कायम टिकावी असे आपणास नेहमी वाटते. त्यासाठी घरामध्ये पाण्याने भरलेले पात्र एखादेतरी असावे विशेष म्हणजे माठ किंवा घागर असेल कळशी असेल तर ते नेहमी आपण पाण्याने भरलेले ठेवावे. भरलेले म्हणजे थोडेतरी पाणी त्यामध्ये अवश्य असावे. ते पाण्याचे पात्र कधीच रिकामी ठेवू नका. जी गोष्ट पाण्याची तीच दुधाची. रात्री थोडेतरी दूध त्या दुधाच्या पातेलात शिल्लक ठेवा.
लक्ष्मी तुमच्या घरात भरभरून देईल. दूध कधीच सगळे संपू नका ती लक्ष्मी आहे. मित्रांनो, पाण्याला अमृत असे म्हटले जाते. पाणी हे अमृतासमान आहे. आपल्या घरात लक्ष्मी ही कायमची राहावी असे वाटत असेल तर आपल्या या माठामध्ये कळशीमध्ये थोडेतरी पाणी शिल्लक ठेवा. त्याचप्रमाणे केरसुणी म्हणजे सर्व घर स्वच्छ करणारी झाडू. झाडू आपल्या घराला नेहमी स्वच्छ ठेवते.
आपले घर स्वच्छ असेल तर आपल्यालादेखील प्रसन्नता वाटते. केरसुणीशिवाय घराला घरपण नसते. या सर्व कारणांसाठी केरसुणीला म्हणजेच झाडूला लक्ष्मी म्हटले जाते. नवीन केरसुणी खरेदी केल्यानंतर प्रथम हळदी कुंकू लावा. तिची पूजा करा. थोडेसे पाणी शिंपडा आणि मगच आपण तिचा केरकचरा काढण्यासाठी उपयोग करा. ही जी आपण कृतघ्नता व्यक्त करत आहोत, त्यामुळे लक्ष्मी आपल्याला नेहमी प्रसन्न होईल.
कोणतीही तुम्ही नवीन वस्तू किंवा पदार्थ घरात आणता तेव्हा ती वस्तू, तो पदार्थ प्रथम देवापुढे ठेवा. आणि मग तुम्ही स्वतः त्याचा वापर सुरू करा. देव तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. वस्तू असतील पदार्थ असेल कपडे असतील हे सर्व काही आपल्याला त्या देवतेच्या कृपेने मिळालेले आहे. हा प्रेमभक्ती दाखवण्याचा एक छोटासा मार्ग आहे.
<
मोसमी फळे जर सुरू झाली तर ही फळे खरेदी करून आणल्यानंतर सर्वात प्रथम देवाला नैवेद्य म्हणून दाखवा आणि मग स्वतः खायला सुरुवात करा तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. नवीन कपडे खरेदी केले तर ते देवापुढे ठेवा. हळदी कुंकू लावा मग ते परिधान करा. त्यामुळे तुम्हाला कधीच कोणते दोष लागणार नाही. आपल्या आर्थिकस्थितीत काही चांगला फरक होईल. अशा काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केल्यास लक्ष्मी सदैव घरात वास करेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.