नमस्कार मित्रांनो,
आपले स्वागत आहे आपल्या घराचा उंबरठा असतो त्या विषयी माहिती करून घेऊया!! आपल्या घरामध्ये दाराला जी लाकडी पट्टी असते तिला उंबरठा असे म्हणतात. चार लाकडी पट्टया जोडून जी तयार होते ती चौकट असे म्हणतात. आज काल बऱ्याच घरांमध्ये आजूबाजूला आणि वरती फळी असते पण खाली पट्टी लावलेलीच नसते.
मग ती चौकट कशी होईल. पण खरे पाहता बिना उबराठ्याचे घर असूचं नये. कारण शास्त्रानुसार उंबरठ्याला खूप महत्त्व दिलेले आहे. असे म्हंटले जाते की दे लक्ष्मीने आपल्या निरंतर व स्थिर वास करावा. यासाठी घराला उंबरठा अवश्य असावा. पूर्वीच्या काळी दररोज उंबरठ्याची पूजा केली जात असे घर बांधताना चौकट लावते वेळी शुभ मुहूर्त पाहून चौकट लावली जात असे.
कोणत्याही प्राचीन मंदिरांमध्ये आपण गेलो की तेथे आधी पाया पडून मगच आत प्रवेश केला जातो. उंबरठा ओलांडल्याशिवाय आपण मंदिरात प्रवेश करू शकत नाही. त्या प्रमाणेच कोणतीही बाहेरची व्यक्ती प्रवेश करतांना उंबरठा ओलांडूनच आत यावे अशी आपल्या घराची रचना असावी.
म्हणजेच घराला उंबरठा असावाचं जेव्हा आपण नवीन घरात प्रवेश करतो. तेव्हा वास्तुशांतीच्या वेळी ब्राह्मणही आपल्याला आपला उजवा पाय उंबरठ्याच्या आत घ्यायला सांगतात. म्हणून मुख्य दाराला उंबरठा ठेवावाच!! उंबरठ्यामुळे कितीतरी प्रकारचे सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून येतात.
आणि दुष्प्रभाव पासून आपल्या घराचे संरक्षण उंबरठ्यामुळे होत असते. त्याबरोबरच धनाची देवी लक्ष्मी स्थिर राहावी व प्रसन्न राहावी. यासाठीच उंबरठ्याचा प्रभाव असतो. असे म्हंटले जाते की ज्याघराच्या चौकटीला उंबरठा नसतो तेथे देवी लक्ष्मी टिकत नाही.
आणि हा अनेकांचा अनुभव आहे की उंबरठ्यामुळे खूप फायदे होतात. उंबरठा आपल्या कुंटूबाला संस्कार व शिक्षण प्रधान करतो. आपल्याला शत्रूंच्या कुदृष्टीला व त्यांच्या वाईट कारवायांना उंबरठा आत प्रवेश करत नाही. त्यांना बाहेरच रोखून ठेवतो. असे प्राचीन शास्त्रामध्ये सांगितले आहे.
कोणतीही वाईट शक्ति nigetivity उंबरठ्यामुळे घरात प्रवेश करत नाही. जर घराचे बांधकाम करताना उंबरठ्याच्या खाली चपटा तांब्याची तार सरळ रेषेत टाकली तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून आपल्याला दिव्यतेची जाणीव होते. शक्य असल्यास लाकडी उंबरठा घरासाठी शुभ असतो.
म्हणून लाकडीच उंबरठा बसवावा. परंतु आज काल फ्लॅट मध्ये लाकडी चौकट व दारे नसल्याने मार्बलची पट्टी लावतात. असे म्हणतात की, घराबाहेर पडताना उंबरठा आपल्याला प्रश्न विचारतो की तू कोणत्या कामासाठी बाहेर जात आहे? तू वाईट काम करणार नाही ना? व घरी येताना तू कोणते काम करून आला आहेस?
<
तू वाईट मार्गाने मिळालेला पैसा तर घेऊन आला नाही? अशा प्रकारे आपल्या वाईट कर्मांवर उंबरठयामुळे लगाम बसतो. तसेच दररोज सकाळी घराच्या सवाशिन स्त्रीने उंबरठा धूवून त्याचे पूजन करावे. त्यावर दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढावे. ते खूप शुभ असते. आणि त्याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो घर बनवताना आधी घराच्या मुख्य दाराला उंबरठा बनवा. मगच बाकीची कामे करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.