नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, काहींच्या घरात एकत्र कुटुंब राहाले जाते सगळे लोक आनंदाने एकमेकांशी राहत असतात. एकत्र कुटुंब राहिल्याने संवाद वाढतो दुसरे कुठलेही विचार मनात येत नाहीत. दररोज एकमेकांशी संवाद राहिल्याने एकमेकांच्या बद्दल प्रेम वाढत असते.
कुटुंबातील एखादा जर व्यक्ती आजारी असेल तर कुटुंबातील सगळे व्यक्ती त्याच्यासाठी काळजी घेत असतात. परंतु काही कारणाने घरात वाद होऊन घराचे दोन भाग होतात. वारंवार होणाऱ्या वादामुळे आपल्या कुटुंबाचे फूट पडत जाते पण याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो.
जर मोठ्या कुटुंबात काही कारणाने कुटुंबाचे दोन भाग झाल्यास देवांचे काय करायचं याचा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला या मध्ये सांगणार आहोत. मित्रांनो खरंतर प्रत्येक कुटुंबाच्या वाटण्या कधी होऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा असते.
प्रत्येकाने एकमेकांसोबत आनंदाने राहावे. अशी इच्छा त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नसते. एकमेकांच्या मतभेदांमुळे किंवा व्यक्तींच्या वादामुळे जर कुटुंबाच्या वाटण्या झाल्या तर देवांचं काय करायचं?
याचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. कारण कोणत्याही वाटण्या झाल्या तरी चालेल, पण देवाच्या वाटण्या कधीच होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. कुटुंबाच्या वाटन्या भावाभावात होतात. दोन कुटुंबात वाटण्या झाल्या की वाट वडिलांचे देव मोठ्या भावाला देणे अशी प्रथा आहे.
काही कारणाने देवाची पूजा करणे शक्य नसेल किंवा मोठा भाऊ नास्तिक असेल. तर देव लहान भावाकडे गेल्यास तर काहीही हरकत नाही. देवांची वाटणी कधीच करू नये. वाटणी मध्ये सगळे देव मोठ्या भावाकडे गेले तर लहान भावांनी काय करावं. तर लहान भावांनी त्यांच्या लग्नात आलेल्या बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा आपल्या देवघरात ठेवून त्यांची पूजा करावी.
बाकीचे देव कधी वाढवावे काय हे सर्व त्याने ठरवावं. फोन आपल्या देवघरात कुलदैवताचे फोटो हे नक्की ठेवावे. पण कुलदेवते शिवाय घराला घरपण कधीच येत नाही. जसा आपल्याला वेळच्यावेळी जेवायला लागतं तसं देवांची पूजा आहे. ब्रह्म मुहूर्तावर करणे गरजेचे आहे.
पूजा करण्याचा वेळ ही शक्यतो पहाटेची असावी कारण सकाळ सकाळी शुद्ध वातावरण असते आणि सर्व आजूबाजूला शांतता असते ज्यामुळे आपण मनोभावे पूजा करू शकतो. दररोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो नैवेद्याच्या ताटात मीठ कधीच वाढवू नये. कांदा लसूण असलेल्या पदार्थ सुद्धा त्यात ताटात वाढू नये.
नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेचच आपण तो ताट काढून न घेता एक दहा-पंधरा मिनिटं देवासमोर ठेवावा आणि देवाने तो ग्रहण केला आहे अशी कल्पना करावी. मग तो ताट काढून घ्यावा. सर्व व्यक्तींना वाटून झाल्यानंतर खावा.
प्रवासामध्ये देवाची पूजा कशी करावी? प्रसाद स्त्रोत्र पठण केलं तर चालेल का? आपण प्रवासामध्ये मानस पूजा करू शकतो म्हणजेच रेल्वेच्या डब्यात बसून डोळे बंद करून स्त्रोत्र पठण करण्यास काहीच हरकत नाही.
ते स्तोत्र म्हण मोठ्याने न बोलता मनातल्या मनात बोलावे. देवघरातले काही देव किंवा झाडाखाली ठेवलेले काही मुर्त्या हे काही काळाने जीर्ण होतात. त्या मुर्त्या आपण वाहत्या पाण्यात सोडावे. अस धर्मशास्त्र सांगतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.