घराच्या उत्तर भिंतीवर ‘ हे ‘ लटकवा गाडी, बंगला, पैसा सर्व मिळेल.

श्री गुरु देव दत्त नमस्कार मित्रांनो,

प्रत्येकाला श्रीमंत होण्याची इच्छा असते. धनप्राप्तीची पैसा प्राप्ती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत. चांगलं घर, बंगला, गाडी मित्रांनो हे सर्व प्राप्त करण्यासाठी तंत्र मंत्र शास्त्रात काही तोटके सांगितलेले आहेत. त्यातील अत्यंत प्रभावशाली तोटका!! खर तर हे एक यंत्र आहे.

हे आपण घरच्या घरी बनवू शकता आणि हे यंत्र बनवून त्याला सिद्ध करून त्याला सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पंधरा ते वीस मिनिटात त्याला फक्त लागणार आहेत. मात्र विश्वासाने पूर्ण श्रद्धेने हे यंत्र तुम्हाला पूर्ण करायचे आहे. केवळ एक सफेद रंगाचा कागद आणि तीन झाडांची पाने त्यामध्ये पिंपळ वड आणि औदुंबर म्हणजे उंबराचे झाड तीन वृक्षाची पाने आपण घ्यायची आहेत.

सामग्री इतकीच लागते. आणि आपलं हे यंत्र तयार होईल. मित्रांनो हे जे यंत्र तयार होणार आहे ते तयार झाल्यानंतर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दुकानांमध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर लावू शकता आणि प्रत्येक सोमवारी किंवा गुरुवारी अगरबत्ती ओवाळायची आहे.

अत्यंत प्रभावशाली हे यंत्र आहे. या यंत्रावर भगवान श्रीहरी श्रीविष्णूचा महादेवांचा सोबतच नवनाथांचा आशीर्वाद जोडलेला आहे. आणि तुम्हाला किंवा तुमच्या जीवनात काही कुणी केलेलं आहे एखादी बाधा कोणी उत्पन्न केलेली असेल. तर ती नवनाथांच्या कृपेने दूर होते.

कोणत्याही प्रकारचे दोष असतील, भगवान शिवशंकर या सर्व दोषांचे निराकरण करण्यास समर्थ आहेत. या जीवनामध्ये जी जी काही सुख तुम्हाला उपभोगायची आहेत. गाडी, बंगला, पैसा, ऐश्वर्य, वैभव, धन या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा आशीर्वाद या यंत्रामध्ये येणार आहे.

तर थोडक्यात आपल्यात पूर्ण श्रद्धेने हे यंत्र तयार करायचे आहे. यासाठी सर्वोत्तम दिवस सोमवार मानला जातो. अनेक जण प्रश्न उपस्थित करतात सोमवारच का? काही तोटका करताना उपाय करताना प्रश्न विचारू नका.. शंका उपस्थितीत करू नका.

तुम्ही आत्तापर्यंत अनेक उपाय करून पाहिलेत प्रयत्न करून पाहिलेत मात्र त्या प्रयत्नात तुम्हाला यश येत नाही आहे. मग हा छोटासा उपाय करून पाहायला काय हरकत आहे. हे तोटके करताना हे तंत्र मंत्र यंत्र संपूर्ण आत्मबल संपूर्ण विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. अत्यंत प्रभावशाली आहे हा सोमवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी सोमवारी आंघोळ करून, या दिवशी कोणतेही व्यसन करू नका.

हे कृपया लक्षात ठेवा!! मांसाहार करून त्याचे सेवन करून हा उपाय केल्यास त्याचा काहीच फायदा होणार नाही. एकदोन दिवस आधी मांसाहार टाळा. आपण नवणाथांच यंत्र स्थापित करत आहात हे लक्षात ठेवा. आपण स्नान करून सफेद कपडे परिधान करायचे आहेत. महिलांना हे वर्ज आहे. सफेद कपडे परिधान केले नाही तरी चालेल. शक्यतो सफेद रंगाचे कपडे आपण घालायचे आहेत. आणि ह्या तीन वृक्षाची पाने आपण घेवून यायची आहेत.

<
आता हा उपाय करताना कोणाला ह्या तोटक्या बद्दल सांगू नका. कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र यंत्र हे कोणाला न सांगता करायचे असतात. ही पाने आणल्या नंतर एका रूममध्ये शांतपणे बसायचे आहे. ही पाने पाटावर किवा एका ताटात घेऊन कुटायची आहेत.

आणि त्याचा रस काढायचा आहे. आणि हा रस काढल्यानंतर सफेद रंगाचा कागद घेऊन हे यंत्र आपण तयार करायचं आहे. एक चौकोन काढून उभ्या व आडव्या रेषा काढायच्या आहेत. त्याचे चार चौकोन तयार होतील. त्यामध्ये पहिला अंक लिहायचा आहे सहा.

दुसरा अंक लिहायचा आहे एक, तिसरा अंक नऊ आणि शेवटचा अंक आठ हे अंक क्रमानेच लिहा. घाई गडबडीत करू नका. त्याचा लाभ मिळत नाही. अशा प्रकारे हे अंक लिहल्या नंतर ते थोडंसं वाळू द्या पानाचा रस थोडासा वाळू द्या आणि त्या यंत्रा समोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा.

एक गोष्ट महत्त्वाची आहे की, तो कागद तुम्ही कुटून आणता या कागदाची शुध्दी होण्यासाठी त्या कागदावर गाईचं कच्च दूध शिपडायच आहे अगदी थोडस आणि गोमूत्र शिंपडने आणि त्यानंतर आपण या तीन झाडाच्या पानाच्या रसाने हे यंत्र काढायचे आहे. मित्रांनो हा कोणताही तोटका करताना लहान सहान नियम आहेत ते फार महत्वाचे आहे.

आणि या नियमांचे पालन आवर्जून करा. कारण चुकीचे केलेले तांत्रिक उपाय कधीकधी अडचणीत आणू शकतात. त्या तोटक्या समोर एक धूप अगरबत्ती लावून नैवद्य म्हणून मिठाई किंवा काही गोड धोड ठेवायचं आहे. आत्ता ही शाई वाळल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्या जवळच बोट आहे. (तर्जनी) असे म्हणतो.

त्या अगठ्या जवळचे बोट सहा ह्या अंकावर ठेवायचं आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे. घरामध्ये जपमाळ असेल त्यावर सुद्धा करू शकता. मात्र त्याहून ही उत्तम आहेकोणत्याही धान्याचे १०८ दाण्यावर मोजून जप करा.

महिलांनी नमः शिवाय ओम, नमः शिवाय ओम, नमः शिवाय ओम, नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो अंक आहे एक ह्या अंकावर तेच बोट उजव्या हाताच्या अंगठ्या जवळच बोट त्याला तर्जनी म्हणतात ते ठेवायच आहे.

आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तिसरा अंक नऊ त्यावर पुन्हा एकदा तर्जनी ठेवून ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः या महामंत्राचा जप करा. आणि सर्वात शेवटी आठ हा अंक आहे.

त्यावरती बोट ठेवून ओम नमो नवनाथाय नमः, ओम नमो नवणाथाय नमः या मंत्राचा जप केल्यानंतर जी आपण मिठाई आणली आहे ती गोड म्हणून ठेवा. आरती ओवाळा या यंत्राची आणि यानंतर हे यंत्र आपल्या घराच्या उत्तरेकडील भिंतीवर एखादी फ्रेम बनवून ठेवू शकता. जेणे करुन ते खराब होणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोरगरिबांना अन्नदान करा. हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या घरात जी पहिली भाकरी बनलेली असेल, चपाती असेल ती गाईला खाऊ घालायची आहे. हे यंत्र तयार झाल्यानंतर ही भाकरी किंवा चपाती आवर्जून खायला द्यावी त्यानंतरच तुम्ही जेवण करायच आहे.

आणि की शेवटची भाकरी कुत्र्यासाठी राखून ठेवायची आहे. कुत्र्याला खावू घालायची आहे. आणि हे यंत्र स्थापित केल्या नंतर प्रत्येक सोमवारी त्या यंत्राला धूप अगरबत्ती दाखवायची आहे जे आपण सिद्ध केलेलं आहे ते सिध्द राहील. सोमवारी सुध्दा गुरुवारी सुध्दा जेव्हा जेव्हा तुम्ही देवपूजा करता देवपूजा झाल्यानंतर या यंत्रामध्ये तीन देवतांचा वास आहे.

हे विसरू नका. त्यामुळे आपण या यंत्राला सुध्दा हात जोडून नमस्कार करायचा आहे. मित्रांनो हे सर्व काही प्राप्त करून देणार हे यंत्र आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *