घराचा उंबरठा असा असेल तर जीवनभर पैसा कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घराला उंबरठा हा असायलाच हवा. आज काल आपण पाहतो बऱ्याच शा घरांना उंबरठा बसतच नाही. खरंतर मित्रांनो उंबरठा हा मर्यादेचं प्रतीक आहे. आपल्या घराचं घरपण जपण्याचं काम हा उंबरठा करत असतो.

कारण घरातील भावना घरातच ठेवण्याचं काम बाहेरील व्यवहार बाहेरच ठेवण्याचं काम हा उंबरठा करत असतो आणि म्हणून मित्रांनो आपल्या वास्तूचं आरोग्य जपण्यासाठी आपल्या घराला उंबरठा असायलाच हवा. किमान जो आपला मुख्य प्रवेश दरवाजा आहे त्याला तरी आपण उंबरठा बसवून घ्यायला हवा.

मित्रांनो जो उंबरठा असतो त्याचा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतो आणि आतील भाग चांद्र ऊर्जा दाखवत असतो. तर मधला भाग पृथ्वी ऊर्जेचं संतुलन राखतो. आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत उंबरठ्याच्या बाबतीत,

की ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होणार आहे. आपल्या घरांमध्ये आर्थिक स्थैर्य येणार आहे म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा येत राहील व आलेला टिकून राहील. तसेच आपल्या घरातील लोकांची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होणार आहे.

धर्मशास्त्रामध्ये असे मानले आहे की उंबरठा असतो या उंबरठ्यामध्ये श्री ऋषी व लक्ष्मी देवतेचे स्थान असते व आपल्या चौकटीच्या वर श्री विघ्नहर्ता गणेशाचे स्थान असते. ज्यावेळी सिंह राशीचे संक्रमण कन्या राशीत होत असेल

यावेळी घरातील मुख्य स्त्रीने आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये पैसा यावा तो टिकून राहावा या सर्वांसाठी आणि घरामध्ये सुख समाधान राहावं यासाठी उंबरठ्यावर रांगोळी अवश्य काढावी. म्हणजेच उंबरठ्याच्या समोर रांगोळी काढावी व लाल रंगाची फुले वाहावी तुपाचा दिवा लावावा.

आणि उंबरठा याची पूजा करावी. मित्रांनो आपल्या घरामध्ये जे काही येत आहे ते या उंबरठ्याच्या द्वारेच येत आहे. जर शक्य झालं तर प्रत्येक बुधवारी वर्षभर आपण ही पूजा करू शकता. अशा प्रकारची पूजा करणे शक्य नसेल तर कमीत कमी तुपाचा दिवा आपण या उंबरठ्यावर नक्की लावावा.

मित्रांनो अशा प्रकारे ही पुजा करत राहिलात तर तुम्हाला दिसेल तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य येऊ लागले. घरात पैशाची कमी येणार नाही. भाग्योदय साधण्यासाठी हा उपाय देशी चांगला आहे ज्यांना वाटतंय की त्यांचं नशीब साथ देत नाही त्यांनी हा उपाय नक्की करावा.

मित्रांनो उंबरठा च केवळ इतकेच महत्त्व नाहीये. तर आपल्या घरामध्ये काही वास्तू दोष असतील ते दूर करण्याचं काम हा उंबरठा करत असतो. तर असा हा उंबरठा आपणास शुभ ऊर्जा देणारा कुटुंबाचा भाग्योदय करणारा आता हा उंबरठा आहे.

मित्रांनो एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची तुम्ही जर हा उपाय करणार आहात मात्र चुकूनही कुठल्याही विषयाचा वाद हा उंबरठ्यावर घालणं टाळा. आपल्या दारात उभं राहून वाद घालू नये. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरांमध्ये टिकत नाही.

तसेच मित्रांनो दारात उभा राहून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणे टाळावे. शक्यतो पैशांचे व्यवहार तर दारात करूच नये. तर मित्रांनो अशा काही गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्या आणि उंबरठ्यावर शुभ चिन्हे कोरायला काही हरकत नाही जशी लक्ष्मीची पाऊले शुभ मानली जातात.

आपण जर दोन्ही बाजूला लक्ष्मीची पाऊले उंबरठ्यावर लावली तर हे शुभ लक्षण आहे. यामुळे अतिशय जलद गतीने आपल्या घराचे प्रगती होते. काही अशा गोष्टी आहेत मित्रांनो अजूनही काही अशा गोष्टी आहेत मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी बरेच जण चप्पल ठेवतात.

तश्या चप्पल ठेवू नका. एकाबाजूला आपलं चप्पल चे स्टॅन्ड असावं आणि ते बंद दरवाजा च असावं त्यामध्ये चप्पल आहे दिसता कामा नये. तसेच प्रवेश द्वाराजवळ तुटक्या-फुटक्या वस्तू मोडकळीला आलेल्या वस्तू आपण टाकू नये.

त्यामुळे नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि मग आम्ही सांगितलेले उपाय करतात आणि मग बोलतात त्याचा काही उपयोग झाला नाही. मित्रांनो वास्तुशास्त्राची संबंधित नियम आपण पाळले पाहिजे. ते जर पाळले नाहीत तर हा उपाय काम करत नाही.

हेच मित्रांनो आपल्या मुख्य दरवाजावर ओम किंवा स्वस्तिक अशी शुभ चिन्हे लावून घ्यावीत. त्यामुळे आपणास खूप मोठा फायदा होतो. तर हा उपाय नक्की करा धन्यवाद!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *