घराबाहेर लिंबू मिरची का टांगतात?…काय कारण आहे त्यामागे?

नमस्कार मित्रांनो,

दारीद्रता म्हणजे अल्क्षुमीदेवी, लक्ष्मीची मोठी बहीण म्हणूनचं तिला जेष्ठा देवी देवी म्हंटले जाते. ज्यावेळी श्री हरी विष्णूनी देवी लक्ष्मीशी विवाह करण्याचे ठरविले. त्यावेळी देवीनी अशी अट घातली, माझ्या जेष्ठ बहिणीचा विवाह झाल्याशिवाय, मी विवाह करू शकत नाही. त्यावेळी श्रीहरी विष्णूंनी दुस्साह मुनींना विवाह करण्यास तयार केले.व त्यांच्या विवाह करून दिला.

आणि दुस्साह मुनी जेव्हा आलक्ष्मीदेवीला आश्रमात घेऊन आले, त्या वेळी त्यांच्या आश्रमात पूजन चालू होते. यज्ञ, होम हवन,मंत्र उच्चारन होत होते. तो आवाज कानावर पडताच, अ लक्ष्मी तेथून दूर पळाली. व ऐका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसली.

दुस्साह ऋषींनी सांगितले, की देवी हे आपलेच घर आहे.तर देविनी सागितले, की मी आत येऊ शकत नाही. अशी तुम्ही हे मंत्र, पूजा, पाठ हवन बंद करा. नाहीतर मी आत प्रवेश करू शकणार नाही. म्हणजेच दरित्र तेथे च निवास करते,जेथे भगवंतांचे होमहवन, पूजापाठ, मंत्र उच्चारण हे काही होत नाही.

अशाप्रकारे दरिद्रता देवी पिंपळाच्या झाडाखाली होऊ लागली. तेव्हाच आपल्या हिंदू धर्मात घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावले जात नाही. कारण ह्या झाडाखाली दारिद्र्याचा वास असतो. अलक्ष्मीला आंबट व तिखट वस्तू खूप आवडतात. सर देवी लक्ष्मीला गोड वस्तू खूप प्रिय आहेत.

म्हणूनच आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या बाहेर लिंबू व मिरची टागुण टेवातो व गोड पदार्थ घरात ठेवतो. आपल्याला काय वाटते की लिंबू मिरच्या दारात टांगून ठेवल्याने, आपल्या घराला दृष्ट लागत नाही. हा समज चुकीचा आहे. देवी लक्ष्मी व दरिद्रता, यांचा रोजचा नियम आहे.

की सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दररोज या देवी भ्रमण करत राहतात. आणि यांना भूक लागली, त्या घरात प्रवेश करतात. परंतु दरिद्रता बघते, की माझे भोजन तर बाहेरच आहे. ती लिंबू व मिरच्या खाऊन बाहेरूनच निघून जाते. तर देवी लक्ष्मी गोड पदार्थांसाठी घरात प्रवेश करते.

एकदा देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू सोबत, आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आली, तेव्हा श्रीहरी विष्णूनी असा आशीर्वाद दिला. हे ज्येष्ठ देवी, आज शनिवार आहे. आणि शनिवारी तुला भेटण्यासाठी या पिंपळाच्या झाडाखाली आलेलो आहोत. म्हणून जोकोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावेल.

त्यांच्या घरी आम्ही दोघेही वास्तव्य करू. म्हणून शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो. तसेच श्रीहरी विष्णू असेही सांगितले, की जो मनुष्य पिंपळाच्या झाडाखाली रिकाम्या हाताने जाईल. त्याच्याबरोबर दरिद्रता हि त्याच्या घरी जाईल.

<
म्हणून पिंपळाच्या झाडाखाली रिकाम्या हाताने जाऊ नये. पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी तांदूळ, साखर, पाणी जे काही शक्य असेल ते घेऊन जावे. नाहीतर दरिद्रता मागे लागते. श्रीहरी विष्णू असा वर दिला, त्यावर जेष्ठादेवी म्हणाली.

हे तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सांगितले, परंतु माझ्यासाठी काय, तर श्रीहरी विष्णू म्हणाले.तुला काय हवे ते तू माग, तेव्हा अलक्ष्मी म्हणाली, मला सप्ताहातून एक दिवस माझा हक्काचा हवा. त्यादिवशी माझ्या पतीसाठी या झाडाखाली नृत्य करेन, तो संपूर्ण दिवस माझा दिवस असेल, आणि या दिवशी इतर कोणी व्यक्ती आमच्यामध्ये आला, तर त्या व्यक्तीच्या घरी मी कायमची वास्तव्य करेन.

श्रीहरी विष्णूनी सांगितले ठीक आहे. सप्ताहातील रविवार हा तुझा असेल, त्यादिवशी पिंपळाच्या झाडाखाली कोणीही येणार नाही. आणि जे येतील त्यांच्या घरी तुझे कायमचे वास्तव्य असेल. असा माझा तुला आशीर्वाद आहे. म्हणून रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये, त्याला स्पर्श करू नये, दिवा लावू नये.

कधीकधी भिंतीमध्ये पिंपळाची झाडे आलेली असतात. कितीही काढून टाकली तरी परत परत येतात. कारण दरित्र्याने घरात प्रवेश केला, तर सहजासहजी घराबाहेर पडत नाही. पिंपळाचे झाड काढून टाकायचे असेल, तर त्यालाही शास्त्र आहे, ते रविवारीच काढावे. त्याशिवाय ते काढण्यापूर्वी, त्याच्यासमोर एक लिंबू आणि सात मिरच्या ठेवाव्यात.व ते झाड काठावे.

त्यानंतर तो लिंबू तेथे चिरावा, म्हणजे जेष्टादेवी तिचा भाग ग्रहण करून कायमची निघुन जाते. त्यानंतर तेथे पिंपळाचे झाड कधीच उगवतं नाही. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल, घराबाहेर लिंबू मिरच्या का टाकल्या जातात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *