नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरातील वास्तुशास्त्र हे प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्वाचे असते. कारण घरातील सर्व सुख सोई त्या वास्तुशास्त्र वर अवलंबून असतात. आणि म्हणूनच घराचे बांधकाम करताना या गोष्टीना खास महत्त्व दिले जाते.
मित्रांनो यामध्ये आपल्या घरा समोर किंवा मुख्य दरवाजा समोर कोणत्या गोष्टी असल्याने आपल्या घराला त्रास होऊ शकतो, आपण अडचणीत येऊ शकतो याची माहिती आपल्याला असायलाच हवी. कारण या गोष्टी त्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती, तसेच संपूर्ण कुटुंबावरती वाईट प्रभाव टाकत असतात.
जर तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील, सुखाची कमतरता असेल, घरामध्ये वाद विवाद होत असतील, तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या.
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमच्या घरासमोर रस्ता संपत असेल तुमचा घर जर त्या रस्त्याच्या शेवटी आहे, तुमच्या मुख्यदरवाज्यासमोर हा रस्ता येऊन संपत आहे, असं असेल तर तुम्हाला सावध रहावे लागेल कारण अशा वेळी घराचा जो मालक असतो त्यावर प्राणघा तक संकट येतात.
तसेच काहींना गुलामगिरीच जीवन जगावे लागते, तसेच त्या घरामध्ये सतत आजा रपण येत राहील, घरातील वैभव नाहीसे होईल.
जर तुमचा घराच्या समोर वारंवार चिखल होत असेल किंवा गटार असेल तर यामुळे आपल्या घरातील सर्व वस्तू नष्ट होतात किंवा या वस्तू हिरावून घेतल्या जातात जे घरचे वैभव आहे ते नष्ट होते. घरातील सुख, शांती नष्ट होते.
जर तुमच्या घरासमोरून पाणी वाहत असेल, तर घरात वायफळ पैसा खर्च होण्याची दाट शक्यता असते. नको त्या गोष्टी वर पैसा खर्च होतो आणि हळूहळू घरांमध्ये दारिद्रय येऊ लागते, गरिबी येते.
जर तुमच्या घरासमोर स्तंभ असेल, मग तो विद्युत स्तंभ किंवा एखाद्या घराचा स्तंभ कॉलम आला असेल तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास घरच्या मालकाला होतो.
जर तुमच्या दारासमोर मंदिर असेल मग ते कोणत्याही देवाचे असो त्यामुळे घरामध्ये धनधान्याची चणचण होते. अगदी आपल्या खाण्या पिण्याचे वांदे देखील होऊ शकतात.
मित्रांनो याचा सगळयात जास्त त्रास लहान मुलांना होतो तसेच घराजवळ जर महादेवाचे मंदिर असेल तर ते घर दारिद्र्याकडे वळते, तेथील वंश वाढत नाही.
जर तुमच्या घरा समोर पोस्ट ऑफिस असेल तर तुम्हाला आगीपासून धोका होऊ शकतो, हे जरा विचित्र वाटेल पण हे सत्य आहे.
दुसऱ्याच्या घराचा कोपरा जर आपल्या दारासमोर असेल तर त्यामुळे आपल्या घरात भीतीचे वातावरण तयार होतं, काही वेळा डोक्यावर सुद्धा परिणाम होतो तसेच मृ त्यु देखील होऊ शकतो.
एखाद्या झाडाची किंवा इमारतीची सावली तुमच्या घरात पडत असेल तर अशा घरात पैसा टिकत नाही, गरिबी येते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.