नमस्कार मित्रांनो,
सध्या सगळीकडे उन्हाचा तडाखा सुरु झालाय. कडक उन्हामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्रत्येकजण उन्हाळ्यात विशेष काळजी घेत असतो. मात्र उन्हाळ्यातील घामामुळे येणारा दुर्गंधाच्या त्रासावर कुणाकडेच पर्याय नसतो.
मग अंघोळ करणे, हा एकच पर्याय सुचतो. पण या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या त्यामुळे तुम्ही अगदी सहजतेने घामापासून सुटका मिळवू शकतात.
1) बेसन आणि दहीची पेस्ट शरीरावर लावा
आंघोळ करण्यापूर्वी बेसन आणि दही यांची पेस्ट तयार करून संपूर्ण शरीरावर लावावी. अर्ध्या तासानंतर चांगली आंघोळ करा. या लेपमुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर काढण्याचा मार्ग तयार होतो. यामुळे आपल्या शरीरातून घामाचा वास येण्याची शक्यता कमी होते.
2) पुदीना
पुदिन्याची पाने उकळून आंघोळीच्या पाण्यात टाका. दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल.
3) व्हिनेगरचा वापर
व्हिनेगर हा एक नैसर्गिक जंतुनाशक पदार्थ आहे जो दुर्गंध पसरवणारे जीवाणू नष्ट करतो. एका स्प्रे बाटलीत पांढरा व्हिनेगर भरा आणि घाम येणाऱ्या भागात शिंपडा.
4) लिंबू वापरा
बादलीभर पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने आंघोळ करा, दुर्गंधी दूर होईल.
5) बेलची पाने
बेलची पाने सुकवून बारीक वाटून घ्या. या पावडरमध्ये काजू घाला आणि साबणाऐवजी वापरा. यामुळे शरीरातून दुर्गंध येणार नाही.
6) सुगंधित तेल
लॅव्हेंडर, पेपरमिंट आणि पाइन ॲपल तेल वापरा, यामुळे शरीराची दुर्गंधी कमी होते आणि सुगंध दोन-तीन दिवस टिकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.