नमस्कार मित्रानो
मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ‘स्त्री’ हे असे पात्र आहे की जिची हिस्सेदारी जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये असते. परंतु काही लोकं आपल्या जीवनामध्ये स्त्रीचे महत्त्व विसरून वासनेत अंध होऊन स्त्रीच्या भावनेसोबत सोबत खेळून बलात्कार सारखे दुष्ट कुकर्म करण्यापासून स्वतःला रोखत नाहीत.
आपल्या समाजात याच्या विरोधात काही दंड निर्धारित केले आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का, अशा पापी लोकांना मृत्यूपश्चात देखील ह्या पापाची शिक्षा भोगावी लागते.
ही शिक्षा ऐकून तुमचं हृदय पिळवटून निघेल. चला तर मग जाणून घेऊयात अठरा पुराणांमध्ये एक असे गरुड पुराणात या दुषकर्माची शिक्षा नरकात काय सांगितली आहे.
गरुड पुराणामध्ये बलात्कार सारख्या गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला नरकात काय शिक्षा दिली जाते याबद्दल विस्तारित स्वरूपात लिहिले आहे. ज्यामध्ये सांगितले आहे की,बलात्कार किंवा व्याभीचार व्यक्तीला सरळ नरकामध्ये घेऊन जातो. गरुड पुराणामध्ये यमपुरी मध्ये जाण्यासाठी चार मार्ग सांगितले आहेत.
पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर हे ते चार मार्ग आहेत. यापैकी दक्षिण मार्ग अति कष्टदायक असतो. याच मार्गात एक अशी नदी आहे जी रक्ताने भरलेली असते. इतकेच नाही तर या नदीमध्ये अनेक प्रकारचे भयानक किडे देखील आहेत.
गरुड पुराणानुसार माणूस जिवंत असताना जसे कर्म करतो त्याच पद्धतीने मेल्यानंतर त्याला त्याचे फळ भोगावे लागते. जेव्हा कोणी अपराधी बलात्कार सारखा मोठा गुन्हा करतो तेंव्हा तो स्वतः असच समजत असतो की हे कुकर्म करताना त्यांना कोणीही पाहिले नाही अथवा त्याने मागे कोणताही पुरावा ठेवला नाही.
परंतु आपल्याला हे माहीत नसते की आपल्या शरीरात उपस्थित असणारे पाच चक्र सोडून सूर्य, चंद्र आणि ब्रम्हा यांचा पुत्र ‘श्रवण’ आणि त्याची पत्नी ‘श्रावणी’ मनुष्याच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून असतात.
शास्त्रांमध्ये सांगितले आहे की व्यभिचारी आणि बलात्कारी व्यक्तीला याच नदीतून प्रवास करून यमपुरीत आणलं जातं. मग व्यभिचार करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष. सर्वांनाच एक समान शिक्षा दिली जाते.
अशा मनुष्याचा आत्मा यमपुरी मध्ये पोहोचल्यानंतर यम त्याची शिक्षा ठरवतात. त्यानंतर यांना लोखंडाच्या अशा तव्यावर ठेवले जाते तो 400 किलो मीटर लांब रुंद असतो. या तव्या च्या खाली सतत आग धगधगत राहते. शिवाय वरून शंभर सूर्या समान ऊन पडते.
त्या तव्यावर बलात्कारी व्यक्तीला निर्वस्त्र करून सोडले जाते. तामिस्त्र नरकामध्ये जेव्हा शिक्षा पूर्ण होते, तेव्हा त्या व्यक्तीला अनेक वर्षांसाठी तप्त सुर्मी नावाच्या नरकात पाठवले जाते. जिथे त्या व्यक्तीला लोखंडाच्या गरम मूर्तीला 100 वर्षे चिटकवून ठेवतात.
दोषी स्त्री असेल तर तिला पुरुष प्रतिमेला आणि पुरुष असेल तर त्याला स्त्री प्रतिमेला बांधले जाते. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्या मनुष्याचा दुसऱ्यांदा पृथ्वीवर जन्म होतो तो बैल किंवा घोड्याच्या रूपात. 84 लाख योनी मधून गेल्यावरती काही आत्म्यांना मनुष्य योनी प्राप्त होते.
परंतु मनुष्य योनी प्राप्त करून देखील अशी व्यक्ती सदासर्वदा रोगी बनुन जगते. याशिवाय गरुड पुराणात सांगितले आहे की जो पुरुष आपलंच गोत्र असलेल्या स्त्रीशी संबंध ठेवतो त्याला वरील सर्व शिक्षा उपभोगल्या नंतर ‘तरसाच्या’ योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो.
तसेच कुमारीके सोबत संबंध बनवणाऱ्या पुरुषास सर्व शिक्षा उपभोगल्यानंतर अजगर योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. हेच नाही तर काम भावनेने ग्रासून जी व्यक्ती गुरु पत्नीचा विनयभंग करतो अशी व्यक्ती सरड्याच्या रूपात जन्म घेते.
जो पुरुष आपल्या मित्रासोबत विश्वास घात करून त्याच्या पत्नी सोबत संबंध बनवतो तो गाढवाच्या योनीमध्ये जन्म घेतो. या आहेत गरुड पुराणातील मृत्यूपश्चात मिळणाऱ्या शिक्षा! तेव्हा असा अपराध करण्याचा विचार चुकून देखील करू नका..!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.