गरुडपुराण वाचल्याने किंवा ऐकल्याने काय घडते?

नमस्कार मित्रांनो,

गरुड पुराण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. हे पुराण श्री हरी विष्णूंची भक्ती व ज्ञानावर आधारित आहे. गरुड पुराण हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक
ग्रंथांपैकी एक आहे. हे पुराण अठरा पुराण पैकी एक असल्याचे मानले जाते.

गरुड पुराणात मनुष्य जीवनाच्या निगडित कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. गरुड पुराणात स्वर्ग, नर्क, पाप व पुण्य याशिवाय इतरही खूप काही आहे. यामध्ये ज्ञान, विज्ञान, निती, नियम व धर्म याबद्दल माहिती दिलेली आहे.

गरुड पुराणात एका भागात जीवनाचे रहस्य लपलेले आहे. गरुड पुराण या कडून आपल्या कितीतरी प्रकारची शिक्षा मिळते. गरूड पुराणात मनुष्याच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे.

परंतु या पुराणा बद्दल असे देखील ऐकण्यात येते ची कोणत्याही व्यक्तीने गरुड पुराण वाचू नये. एवढेच नाही तर याबद्दल असेही बोलले जाते की जे व्यक्ती हे पुराण वाचतात किंवा जवळ बाळगतात त्यांच्या जीवनात काही ना काही अशुभ घडते. परंतु हे अर्धसत्य आहे.

आजची माहिती वाचून तुम्हाला जरूर कळेल की व्यक्तीने गरुड पुराण वाचावे की नाही. गरुड पुराणात श्रीहरी विष्णू व त्यांचे वाहन गरुड यांच्यामधील संवादाचे वर्णन केलेले आहे. मनुष्याच्या शेवटच्या क्षणी हे पुराण वाचले जाते.

म्हणूनच आपल्या मनात त्याबद्दल भीती निर्माण होते की आपण गरुड पुराण वाचू ही शकत नाही आणि ते जवळही बाळगू शकत नाही. परंतु हे खरे नाही. गरूड पुराणाचे वाचन करताना सुरुवातीला त्याचे वाचन करण्यासंबंधित महात्‍म्‍याचे वर्णन केलेले आहे.

ज्यानुसार एखादा व्यक्ती पुराणाचे वाचन करीत असेल तर त्या व्यक्तीला विद्या, यश, सौंदर्य, लक्ष्मी, विजय व आरोग्याची प्राप्ती होते. जे व्यक्ती याचे नियमित वाचन व पठण करतात. त्यांना सर्व गोष्टीचे ज्ञान होते व त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते.

जे व्यक्ती एकाग्रचित्त होऊन पुराणाचे वाचन, पठण किंवा इतरांना सांगतात किंवा पुस्तक रूपात आपल्या जवळ बाळगतात त्या व्यक्तींना जर धर्माची इच्छा असेल तर धर्म मिळतो. जर त्यांना अर्थाची पैशांची अपेक्षा असेल तर त्यांना पैशांची प्राप्ती होते.

ज्या व्यक्तींच्या हातात हे महापुराण आहे त्यांच्या हातामध्ये संपूर्ण ज्ञानाचे भंडार आहे. जे या पुराणाचे वाचन व पठण करतात ते भोग व मोक्ष या दोघांची प्राप्ती करतात. या महापुराणाचे पठण केल्याने व्यक्तीला धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांची सिद्धी होते.

या महापुराणाचे पठण करणाऱ्या व्यक्तीला जर पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर त्याला पुत्र प्राप्ती होते. जे व्यक्ती काम भावनेचे इच्छुक असतात त्यांना त्याप्रमाणे कामजीवनाची प्राप्ती होते. कुमारिकेला मनासारखा जोडीदार, भोगी व्यक्तीला भोगाचे प्राप्ती होते. विद्यार्थ्यांना विद्येची प्राप्ती होते.

श्रेष्ठ पक्षी असणाऱ्या गरुडाने सांगितलेले हे गरुड पुराण धन्य आहे. हे पुराण मानवाचे कल्याण करणारे आहे. जे व्यक्ती या पुराणातील एका श्लोकाचे पण पठण करतात त्या व्यक्तीचा अकाली शेवट होत नाही. याच्या जर अर्ध्या श्लोकाचे जरी पठण केले तरीही आपल्या शत्रूंचा नाश होतो.

म्हणून हे गरुड पुराण मुख्य व शास्त्रसंमत पुराण आहे. विष्णू धर्माच्या प्रदर्शनांमध्ये गरुड पुराण या सारखे दुसरे कोणतेही पुराण नाही. जसे सर्व देवांमध्ये जनार्दन श्रेष्ठ आहेत त्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंच्या तत्व प्रमाणामध्ये सर्व पुराण पैकी गरुड पुराण श्रेष्ठ मानले जाते.

या गरुड पुराणांमध्ये श्रीहरी विष्णू आहे. म्हणून श्रीहरी विष्णू पूजनीय व वंदनीय आहेत. या पुराणाच्या श्रवणाने आपली सर्व पापे नष्ट होतात. जर गरुड पुराण वाचल्याने किंवा ऐकल्याने इतके फायदे होत असतील तर ते वाचल्याने किंवा ऐकल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभ घटना कश्या काय घडू शकतील?

हा फक्त एक भ्रम आहे. इतर काहीही नाही. म्हणून तर शक्य असेल जर मनात कोणत्याही प्रकारचे भीती न बाळगता पवित्र पुराणाचे वाचन व श्रवण करावे आणि आपले जीवन समृद्ध करावे. या पुराणाचे नियमितपणे वाचन किंवा श्रवण करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की मनुष्याला जीवनात होणाऱ्या रहस्याबद्दल जिवंतपणीच सहजपणे जाणीव होते.

कारण गरुड पुराणात मनुष्य जीवनात जी काही कर्मे करतो याबद्दल माहिती सांगितलेली आहे. यात कोणते कर्म चांगले व कोणते वाईट याबद्दल सांगितलेले आहे.

म्हणजे असे मानले जाऊ शकते की या पुराणात वर्णन केलेल्या गोष्टींना जर संपूर्ण मानव जातीने या जीवनात उतरविले तर एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *