घरात गरिबी येण्याची 9 कारणे या कारणामुळे घरात येते गरिबी

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो घरात गरिबी येण्याची 9 कारणे आज आपण पाहणार आहोत. अनेकदा आपल्या हातून या गोष्टी कळत नकळत घडतात या चुका घडतात. अनेक लोकांना याचा वाईट अनुभव आलेला आहे. या 9 चुका करणं तुम्ही कटाक्षाने टाळा. पहिली गोष्ट आहे कोणत्याही झाडाखाली मलमूत्र विसर्जन करणे आणि त्यामध्ये जर पिंपळ, वड, उंबर अशा प्रकारचे पवित्र वृक्ष असतील.

केळीचे झाड असेल, तर अशा झाडाखाली चुकूनही हि क्रिया आपण करू नका. हि झाडे अत्यंत पवित्र मानली जातात. अनेक लोक प्रवासादरम्यान या प्रकारची चूक करतात. त्यामुळे त्या वृक्षामध्ये असलेल्या देवी-देवतांचा प्रचंड अपमान होतो आणि घरातून लक्ष्मी निघून जाते. कदाचित तुमच्या या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे आपल्या घरात जे अतिथी येतील, अतिथी म्हणजे पाहुणे त्या पाहुण्यांचा कोणत्याही परिस्थितीत अपमान करू नका. पाहुणे हे काही दिवसांसाठी आपल्याकडे आलेले असतात. हिंदू धर्म संस्कृतीत अतिथी देवो भव असं म्हटलेलं आहे. अतिथीला प्रत्यक्ष देवाचा दर्जा आहे. ज्या घरात अतिथींचा अपमान होतो, पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित होत नाही त्या घरात सुद्धा लक्ष्मी टिकत नाही.

तिसरी गोष्ट आहे आपल्या दारामध्ये अगदी उंबरठ्याला चिटकून चपला किंवा बूट सोडणे अनेक लोकांना ही सवय असते. आपल्या दारात मुख्य दरवाजासमोर उंबरठ्याला चिटकून चपला किंवा बूट सोडू नका. आणि चप्पल, बूट पालथे पडलेले तुम्हाला दिसून आले तर ते तात्काळ सरळ करा. चप्पल, बूट पालथे दिसूनही ज्या व्यक्ती त्यांना सरळ करत नाहीत त्यांच्या आयुष्यात अलक्ष्मीचा प्रवेश होतो. दरिद्रता त्यांच्या पाठीशी लागते.

मित्रांनो भाकरी किंवा चपाती खाताना ती दातांनी कुरतडून खाणे, भाकरी किंवा चपाती कुरतडून कुरतडून खाणे याने अन्नाचा अपमान होतो. अन्नपूर्णा देवीचा हा भयंकर अपमान मानला जातो आणि अशा घरात अन्नपूर्णा देवीच काय, माता लक्ष्मी सुद्धा आपली कृपा बसरवत नाही. अनेक लोकांना दातांनी नखे कुरतडण्याची करण्याची सवय असते. अगदी बसल्याबसल्या नखे कुरतडतात.

मित्रांनो यामुळे रोग आजार बळावण्याची शक्यता असते. आणि या आजारपणात रोगांमध्ये प्रचंड पैसा सुद्धा खर्च होऊन घरात दैन्यावस्था गरिबी येऊ शकते. म्हणून दातांनी नखे कुरतडू नका. झोपण्याच्या वेळा सूर्योदय म्हणजे सूर्य उगवताना आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळताना या दोन वेळा कटाक्षाने पाळा. यावेळी चुकूनही झोपू नका. यावेळी जी व्यक्ती झोपते तिचं नशीब झोपतं. लक्ष्मी या घरात कधीच राहत नाही. ती घर सोडून निघून जाते.

मित्रांनो पॅन्ट घालताना किंवा कोणतेही वस्त्र परिधान करताना ते डाव्या पायाने परिधान करू नका. सर्वात आधी उजवा पाय घालावा आणि त्यानंतरच आपण हे वस्त्र परिधान करावे. विशेष करून महिलांच्या बाबतीत घराची साफसफाई करताना झाडू मारल्यानंतर, झाडून काढल्यानंतर कचरा दरवाजाच्या पाठीमागे साठवला जातो. घराच्या एखाद्या कोपऱ्यात तो गोळा केला जातो आणि तो तसाच तिथे पडून असतो.

वास्तुशास्त्रानुसार असा कचरा गोळा केल्यानंतर तो ताबडतोब आपण कचरा पेटी मध्ये टाकावा किंवा घराच्या बाहेर नेऊन टाकावा. कचरा एक तर कचरा पेटीत टाकावा ते शक्य नसेल तर घराबाहेर टाकून द्या. मात्र तो घरातल्या एखाद्या कोपर्‍यात साठवण अत्यंत चुकीच आहे. आणि त्यातल्या त्यात घराचा जो ईशान्य कोपरा आहे म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्यामधली दिशा ईशान्य अस म्हणतात.

या ईशान्य दिशेला जर हा कचरा वारंवार साठवला जात असेल, तर मात्र मित्रांनो घरात लक्ष्मी टिकत नाही आणि अनेक लोकांनी याचा अ त्यं त वाईट अनुभव घेतलेला आहे. तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे भांग पाडणे या गोष्टीसुद्धा कटाक्षाने टाळा. मित्रांनो अशा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत जेणेकरून आपलं जीवन सुखी सं प न्न समृद्ध बनाव.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *