आज 29 मे, संकष्टी चतुर्थी… आज गणपतीला हा नैवेद्य दाखवाच…

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.

मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात असलेले संकटं, विघ्न दूर व्हावेत म्हणून आपल्या लाडक्या बाप्पाला, विघ्नहर्त्या ला प्रसन्न करतो. गणेशाला प्रसन्न केल्यानंतर आपले सगळे विघ्न दूर होतात आणि सोबत  आपल्या अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात.

आपल्या पैकी बहुतेक जणांचा आपल्या लाडक्या गणपती बाप्पा वर विश्वास आहे. आपण प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतो. तर मित्रांनो आज 29 मे ला गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी येत आहे.

संकष्टीचा हा दिवस गणपती बाप्पाचा दिवस समजला जातो.

संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात. या दिवशी मंत्र, जप, प्रवचन, पारायण किंवा स्तोत्र पठण करतात. हे सर्व केल्याने बाप्पा प्रसन्न होतात. तर मित्रांनो आजच्या दिवशी 29 मे ला तुम्हाला तुमच्या घरात एक प्रकारचा नैवेद्य बनवायचा आहे. हा नैवेद्य बाप्पाना दाखवायचा आहे.

मित्रांनो हा नैवेद्य बाप्पाला दाखवला तर आपल्या घरातील सगळे विघ्न दूर होतील. तुमच्या घरात पैसा येईल, सुख समृद्धी, बरकत येईल. घरात शांतता, समाधान नांदेल. घरातून नकारात्मक ऊर्जा, वाट शक्ती, चिडचिडेपणा, होणारे वाद कमी होतील.

हा नैवेद्य म्हणजे आपल्या बाप्पाला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ आहे. मित्रांनो हो आपल्याला बाप्पाला आवडणारे मोदक बनवायचे आहेत. संकष्टी ला बरेच लोक नैवेद्य म्हणून मोदक करतात. पण आज आपल्याला वेगळ्या प्रकारे मोदक करायचे आहेत.

मित्रांनो आपल्याला एकूण 21 मोदक बनवायचे आहेत. पण हे 21 मोदक बनवताना आपल्याला एक मोदक हा मिठाचा बनवायचा आहे. आपण नेहमी उकडीचे मोदक बनवतो, आजही आपल्याला असेच उकडीचे मोदक बनवायचे आहेत. पण त्यातले 20 मोदक हे नेहमी प्रमाणे साखर, खोबरं यांचे बनवा आणि एक मोदक हा खारट मीठ टाकून बनवा.

मोदक उकडीचे बनवा अथवा तळून बनवा. पण 20 मोदक गोड आणि एक मोदक मिठाचा बनवा. हे सर्व मोदक रात्री चंद्रोदय झाल्यानंतर नैवेद्य म्हणून बाप्पाला दाखवायचे आहेत.

आरती करून नैवेद्य दाखवून बाप्पाच्या मंत्राचा जप करा. नंतर ते मोदक सर्वांना प्रसाद म्हणून द्या. मित्रांनो हे मोदक फक्त घरातील लोकांना खायला द्या.

मित्रांनो आपल्याला माहीत नसेल की कोणता मोदक खारा म्हणजेच मिठाचा आहे. त्यामुळे आपण घरातल्या लोकांना मोदक खायला देऊ तेव्हा त्याच्या नशिबात खारा मोदक असेल त्याला तो मिळेल.

ज्याला खारा मोदक मिळेल त्याने तो पूर्ण मोदक न खाता थोडा खाऊन उरलेला मोदक हा पक्षांना किंवा मुंग्यांना खायला घालावा. पक्षी किंवा मुंग्या नसतील तर तुम्ही तो वाहत्या पाण्यात सुद्धा विसर्जन करु शकता.

ज्या व्यक्तीच्या वाट्याला तो खारट मोदक आलेला असेल त्या व्यक्तीवर गणेशाची कृपा सदैव राहील. त्याच्या आयुष्यात असलेले सगळी संकटं दूर होतील. त्याला बाप्पा प्रसन्न आहेत. तर आज संकष्टी दिवशी हे नक्की करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज फोकस मराठी लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *