नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदू धर्मात गाईला माता मानले जाते. ज्यांच्या घरात घाई असते त्यांच्या घरातले वास्तुदोष आपोआप नष्ट होतात.. धर्मानुसार गायीमध्ये ३३ कोटी देवी देवतांचे वास्तव्य मानले जाते म्हणून गायीचे पूजन केले की ३३ कोटी देवी-देवतांचे पूजन केले असे आपल्याला पुण्य प्राप्त होते. गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो.
गाईच्या पाठीमागे वरच्या भागात सूर्य केतू नाडी असते, जी सूर्याच्या किरणांपासून रक्तात सूर्यक्षर निर्माण करते. हे सूर्य क्षर गाईच्या दुधात उतरते म्हणून गाईचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृतासमान आहे. या सुवर्ण क्षारा मुळेच गाईच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो त्यासाठी आपण आता जाणणार आहोत.
गाईच्या पूजनाने मनुष्याला कोण कोणते पुण्य फळाची प्राप्ती होते तसेच घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणत्या उपाय करावे तसेच गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते. शास्त्रानुसार गाईच्या शरीरात तेहतीस कोटीे देवी देवतांचे वास्तव्य असते म्हणून जी व्यक्ती गाईचे नित्यनेमाने पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी-देवतांची कृपा असते.
जे लोक गाईची सेवा करतात व गायीला देवी मानतात. देवी त्यांच्या दुःखांचे हरण करते. गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते. असे म्हणतात सूर्यास्तानंतर ज्यावेळी गाय रानातून घरी परतत असतात त्यावेळी त्यांच्या पायामध्ये हवेतून धुळीचे कण अडकतात, त्या धुळीमुळे व्यक्तीच्या पापांचा सर्वनाश होतो.
ज्या विद्यार्थ्यांना खूप राग येतो, जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे आहेत तसेच जे बोलू शकत नाहीत अशा व्यक्तींनी गाईला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते व सर्व प्रकारच्या अडीअडचणी पासून आपली सुटका होते.
गाईचे दान करणे शास्त्रात खूप शुभ मानले जाते जर आपल्या मंगळाची दशा वाईट असेल तर एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला गाय दान करावी. नवग्रहांची शांती व शनी ग्रहाची स्थिती करायची असेल तर एका काळ्या गाईचे दान जरूर करा यामुळेच सर्व प्रकारच्या संकटांपासून आपली सुटका होते व शनी देवांच्य कृपेमुळे सर्वकाही व्यवस्थित होते.
जर आपले एखादी कार्य पूर्ण होत नसेल तर काहींना काही अडथळे येत असेल तर गाईला पोळी खायला द्यावी व तिच्या कानात आपली इच्छा सांगावी तसेच गायीची नित्यनेमाने पूजा केल्यास माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. उन्हाळ्यात, हिवाळ्यात जर दारामध्ये गाय आली तर तिला जरूर पाणी पाजावे यामुळे आपल्या सर्व रोगांपासून सुटका होते.
तसेच थंडीच्या दिवसात गाईला गुळ खाऊ घालावा. परंतु उन्हाळ्यामध्ये गुळ खाऊ घालू नये. पितृदोष पासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येला गाईला गुळपोळी व हिरवा चारा जरूर खायला द्या यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात व त्याच बरोबर नवग्रहांची शांती होते.
जर घरामध्ये लहान मुले हट्टी असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा राग येत असेल तर दारात आलेल्या गाईला त्यांच्या हाताचे भोजन गाईला द्यावे यामुळे खूप फरक जाणवतो. गाईच्या पाठीवर उंच वाट्यावर सूर्य केतू नाडी असते ,रोज सकाळी गाईच्या या उंचवट्यावर हात फिरवल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात.
तसेच आपल्या आर्थिक समस्या ही नष्ट होतात आणि दारिद्र्य दूर जाते त्याच बरोबर आपल्या सर्व रोगांचा नाश होतो. जर नवीन जागा घर बांधायचे असेल तर त्या जागी गाय कींवा वासरू काही दिवस तेथे राहू द्यावे यामुळे त्या जागेवर असलेले सर्व रोग दोष दूर होतात. गाय ज्या जागी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतेही वाईट शक्ती प्रवेश करत नाही.
घरामध्ये स्वयंपाक झाला की सर्वात अगोदर गाईला पोळी खायला द्यावी त्यानंतरच सर्वांनी खावी यामुळे घरामध्ये शांतता राहते. वाद-विवाद भांडण तंटा दूर होतात . गाईपासून मिळणारे पंचगव्य हजारो रोगावर गुणकारी औषध आहे. याचे सेवन केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते. पूजापाठ हवन पंचगव्या नसेल तर त्यात यश मिळतं नाही.
गायीच्या शेना पासून तयार केलेल्या गौर्या सकाळ-संध्याकाळ मंदिरात किंवा घरात जाळून त्याचा धूर केल्यास वातावरण शुद्ध होते यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. गाईच्या गळ्यात घंटी जरूर बांधा कारण गाईच्या गळ्यात घंटी बांधल्यामुळे गाईचा आवाज होतो.
गाईच्या पोटा मध्ये तेहेतीस कोटी देवांचे पुण्य आपल्याला मिळते. गायीच्या शेणात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. तर गाईच्या मूत्रात देवी गंगेचे वास्तव्य असते तसेच गाईच्या दुधात सुवर्ण तत्व असतात म्हणूनच गाईच्या दुधाचे सेवन जरूर करावे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.