आज शनिवार इंदिरा एकादशी पितृपक्ष… गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू… गरिबी, सर्व संकटं जातील पळून… व्हाल करोडपती…

नमस्कार मित्रांनो,

पितृपक्षात जी एकादशी येते म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते त्या एकादशीला इंदिरा एकादशी किंवा पित्र एकादशी म्हटले जाते.

या एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सात पिढी पर्यंतचे जे पित्र आहेत त्या सर्वांना मोक्षाची प्राप्ती होते. हे व्रत केल्याने आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पितरांच्या आत्म्याला शांतता मिळावी, आपली पितृ ऋणातून मुक्तता व्हावी या करिता यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते.

यावर्षी ही एकादशी 2 ऑक्टोबर शनिवारी आहे. या दिवशी श्रीविष्णूचे शालिग्राम स्वरूपात पूजन केले जाते. या एकादशी मुळे आपल्या पितरांना तर मुक्ती मिळतेच पण त्याबरोबरच आपल्यालाही अनेक शुभ फळांची प्राप्ती होते.

शुक्रवारी 1 ऑक्टोबर रात्री 11 वाजून तीन मिनिटांनी पासून एकादशी प्रारंभ होणार असून 2 ऑक्टोबर शनिवारी रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी एकादशी तिथीची समाप्ती होईल.

सूर्यास्ताच्या वेळी शनिवारी 2 ऑक्टोबर ला एकादशी तिथी असणार आहे म्हणून एकादशीचे व्रत हे शनिवारी करावे. ही एकादशी पितृपक्षात येत असल्याने या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. आपल्याला जर हे व्रत करायचे असेल तर शुक्रवारी दशमी तिथी पासूनच या व्रताची तयारी करावी.

यासाठी शुक्रवारी एखाद्या नदीवर किंवा तलावावर जाऊन आपल्या पितरांच्या नावाने तर्पण व पिंडदान करावे. जर नदी किंवा तलावावर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच हा विधी करू शकता. त्यानंतर गरीब व गरजू व्यक्तींना भोजन द्यावे आणि त्यानंतर आपण भोजन करावे. सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर श्राद्धविधी करून पंच बळी विधि करावा. म्हणजेच गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या व देवी-देवतांना नैवेद्य अर्पण करावा. दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडावा.

इंदिरा एकादशीला गाईचे खूप जास्त महत्त्व आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असल्याचे मानले जाते. तसेच मृ त्यू नंतर वैतरणी नदी पार करण्यासाठी आपल्याला गाईच्या शेपटीला धरूनच ती नदी पार करावी लागते. म्हणून पितरांच्या मुक्ततेसाठी यादिवशी गाईंचे पूजन जरूर करावे.

व्रताच्या पारणाची वेळ आहे 3 ऑक्टोबर रविवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटं पर्यंत म्हणून या वेळेतच आपल्या ग्रंथाचे पारण करावे. इंदिरा एकादशी च्या दिवशी पूजन कसे करावे?

यासाठी एका पिवळ्या वस्त्रावर श्री विष्णूची शाळीग्राम स्वरूपात स्थापना करावी. नंतर त्यांना गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. धूप दीप ओवाळावा. हळद अर्पण करावी. नैवेद्याला दूध फळे ठेवावे. पिवळी फुले अर्पण करावी. शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

त्यानंतर तेथेच बसून इंदिरा एकादशीची कथा वाचावी व पितरांच्या मुक्तीसाठी भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचे वाचन किंवा पठण करावे. त्यानंतर श्री हरी विष्णूची मनोभावे आरती करावी. या दिवशी जर आपल्या पितरांचे श्राद्ध तिथी असेल तर पितरांसाठी भोजन बनवून दक्षिण दिशेला त्यांना नैवेद्य अर्पण करावा.

या दिवशी विष्णू सहस्त्रनाम याचे पठण केल्यानेही आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्यानंतर पितृ देवांसाठी गाय, कुत्रा, कावळा या सर्वांना भोजन द्यावे. परंतु या दिवशी गाईला काय खायला द्यावे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधा यापासून आपल्याला मुक्ती मिळेल?

इंदिरा एकादशीचे खूप महत्त्व आहे. म्हणून विधीपूर्वक आणि नियमानुसार आपण जर एकादशीचे व्रत केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. आपल्या घरातील स्वयंपाकातील पहिली पोळी घेऊन, त्या पोळीला थोडेसे साजूक तूप लावून त्यावर गुळाचा थोडासा तुकडा ठेवावा.

थोडीशी चणाडाळ ठेवून त्यात थोडेसे काळे तीळ टाकावेत आणि हि पोळी गाईला खायला द्यावी. गाईला पोळी खाऊ घालताना आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करावी. पितृदोष यांपासून आपली मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना करावी. गाईला स्पर्श करून नमस्कार करावा व आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची क्षमा मागावी.

आपले पित्र आपल्यावर प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करावी. या उपायामुळे आपल्या कुंडलीतील सर्व पितृदोष पितरांच्या आशीर्वादात बदलते.

मित्रांनो, या इंदिरा एकादशीचे व्रत आणि दिलेला उपाय नक्की करून पहा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *