नमस्कार मित्रांनो,
मित्रानो कर्जाची समस्या ही एक अशी समस्या आहे जी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात एकदा झाली तर अशा व्यक्तीला जीवनात सुख आणि शांती मिळतच नाही. अशावेळी मनुष्य जितक्या पण गोष्टी करतो त्या मन लावून करू शकत नाही.
कारण त्याचे पूर्ण लक्ष दिवसभर फक्त त्या कर्जातून कसे बाहेर पडायचे यावरच असते. म्हणून शास्त्रामध्ये कर्जाला स्लो मरण म्हणले आहे. ज्याच्या जीवनात कर्जाची समस्या असेल त्याच्या मनात सुख शांती कधीच नसते.
तो व्यक्ती प्रत्येक क्षणी झोपत असताना, खात असताना, काहीही करत असताना त्याच गोष्टीचा सतत विचार करत असतो. पण मित्रांनो, कर्जाची समस्या कितीही मोठी असली तरी त्यासाठी काहीतरी उपाय सांगितले आहेत.
हे उपाय जर तुम्ही केले तर कर्जाच्या समस्येतून तर तुम्हाला सुटका मिळेलच त्याचबरोबर धन प्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील परिणामी तुम्हाला पुन्हा कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
कर्जाच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात पण यामध्ये कर्म सर्वात मोठे कारण मानले जाते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे मागच्या जन्मात काही कर्ज राहिले असेल तर या जन्मात ते कोणत्या ना कोणत्या रूपाने कर्जाच्या रूपाने फेडत राहावेच लागते.
काही लोक असे असतात की जे धनाची जी समस्या असते त्यालाच कर्ज मानतात, यामुळे अनेक लोकांना आजार होतात, काही लोकांच्या घरात नको असलेला खर्च वाढतो जेवढी कमाई आहे त्यापेक्षा अधिक खर्च होतो व पैसे पुरत नसल्यामुळे कर्ज घ्यावे लागते. आणि इथूनच कर्जाची मोठी समस्या चालू होते.
ही गोष्ट फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिच्या जीवनात कर्जाची समस्या आहे. पण तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला जो प्रयोग सांगणार आहे तो ज्या व्यक्तीने केला आहे त्याच्या जीवनातील कर्जाची समस्या दूर झाली आहे.
तुम्हाला ही असे वाटत असेल की तुमच्या जीवनातील कर्जाची समस्या दूर व्हावी, धन संबंधित समस्या दूर व्हावी तर तंत्र, मंत्र या सर्व गोष्टींचा वापर करणे खूप आवश्यक आहे. नाभीचे केंद्र हे धनाचे स्थान मानले जाते, असे म्हणले जाते की तिथेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विराजमान असतात
ज्या व्यक्तीचे हे स्थान, केंद्र खराब होते अशा व्यक्तीला धन संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक वेळी तो धनाविषयी विचार करत असतो. पण हेच केंद्र जर जागृत झाले तर अशा व्यक्तींना धना विषयी अजिबात विचार करावा लागत नाही. आणि तो जी इच्छा करतो त्या आपोआपच पूर्ण होत जातात.
म्हणून हे केंद्र जागृत करणे खुप महत्वाचे आहे, नाभीचे जे केंद्र आहे तेथूनच ब्रह्माजी उत्पन्न झाले आहेत म्हणजेच ज्या व्यक्तीचे हे केंद्र जागृत आहे त्याच्या सर्व इच्छा आपोआपच पूर्ण होतात, त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच हसू असते.
हे केंद्र जागृत करण्यासाठी नाभीमध्ये सूर्य फुलांचा रस रोज लावायचा आहे. केवळ या फुलांचा रस लावल्याने हे केंद्र जागृत होते. सूर्यफुल हे पिवळे असते आणि भगवान विष्णू यांचा कारक रंग हा पिवळा आहे. त्यामुळे सुर्यफुलांचा रस रोज तुम्हाला नाभी मध्ये लावायचा आहे आणि त्याच बरोबर भगवान विष्णू यांचे उग्र स्वरूप भगवान नरसिंह यांचे बीज जप तुम्हाला रोज , झोपण्याआधी करायचा आहे.
सकाळी उठल्यावर डोळे उघडताच तुम्हाला हा जप करायचा आहे. कर्जासारख्या मोठ्या समस्येतून बाहेर येण्यासाठी भगवान नरसिंह यांच्यासारखा दुसरा कोणताच उपाय नाही. भगवान नरसिंह यांची कृपा झाली की माता लक्ष्मीची कृपा आपोआपच होते. कर्ज समाप्त झाले की धनाचे आगमन निश्चित आहे.
तुम्ही सूर्यफुलाचा रस काढून घ्या आणि गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणत्याही सणा दिवशी हा रस नरसिंहाच्या जपाने अभिमंत्रित करा. उजव्या हातात हा रस घेऊन त्याकडे बघत हा मंत्र 51 माळा जप तुम्हाला करायचा आहे.
( ओम श्रोम महा नरसिंहाय नमः) यातील अर्धा रस तुम्हाला घरात ठेवायचा आहे आणि अर्धा रस कोणत्याही मातीच्या कुंडीत गाढुन पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे.
दुसऱ्या दिवशी त्याच वेळी काढायचा आहे आणि घरी आणून त्या अर्ध्या रस मध्ये मिक्स करायचा आहे आणि रोज रात्री हा रस आपल्या नाभीमध्ये लावल्याने व मंत्र जप केल्याने त्याची सर्व कर्जातून सुटका होते.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.