अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
स्वामी भक्त हो नमस्कार,
स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोट नगरीत आले तेव्हा स्वामींच्या अतर्क्य लीला ऐकून अनेक लोक स्वामींकडे येत. स्वामींच्या समोर नतमस्तक होत. स्वामींचा अक्कलकोट नगरीत प्रभाव वाढत होता. परंतु काही लोकांना स्वामींचा हा वाढणारा प्रभाव आवडत नव्हता. हे खरोखर साधू संत देव आहेत की हे सर्व थोतांड आहे.
याची शहानिशा म्हणून यातील काही मंडळींनी स्वामींची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि त्यांनी राधा नावाच्या गनिकेला स्वामींकडे पाठविण्याचे ठरविले. आणि त्याप्रमाणे एक योजना केली त्या योजनेप्रमाणे स्वामींना भुलवून कशा प्रकारे जाळ्यात ओढायचे हे व्यवस्थित समजावून सांगितले. ही २० वर्षांची राधा दिसायला खूप सुंदर होती. ती नृत्य कले मध्ये निपुण होती.
असो ही राधा ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे स्वामींकडे आली. स्वामी महाराज त्या वेळेला एका उंच टेकडीवर बसलेले होते. स्वामींच्या सभोवताली भक्त मंडळी जमलेली होती. राधा स्वामींच्या समोर येते स्वामींना वंदन करते. स्वामीना फल पुष्प अर्पण करून एका बाजूस जाऊन बसते. थोड्या वेळात ती आणि तिचे सहकारी वाद्यांची जुळवाजुळव करतात. आणि गायनास सुरुवात करतात.
राधा आकर्षक हावभाव करून स्वामींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती पण स्वामींच्या वर तिचा काहीच परिणाम होत नव्हता. तिचा हा प्रकार सुरू असताना तिला स्वामिंविषयी विचार मनात आला. आणि मनातल्या मनात ती बोलली माझ्या सारख्या सौंदर्यवती सोबत स्वामींचा समागमाचा योग आला असेल काय? स्वामी भक्त हो तिच्या मनात असा विचार येताच तो स्वामींना तात्काळ समजला.
आणि स्वामींनी तिच्याकडे बघितले. आणि म्हणाले, काय ग स्त्री आणि पुरूष मध्ये काय फरक आहे. हे ऐकून राधा एकदम चपापली. आणि लज्जेने मान खाली घालून म्हणाली. स्त्री चे अवयव आणि पुरुषाचे अवयव वेगवेगळे असतात. इतक्यात समर्थ बोलले. अग सदच्चिदानंद मुळ स्वरूप चैतन्य सर्वत्र व्यापक आणि निरंतर एकच तेथे प्रकृती आणि पुरुष असा कसलाच भेद नाही.
म्हणून तुझ्यामध्ये पुरुषांपेक्षा अधिक काहीतरी आहे असे समजू नकोस. आणि हे तुझे स्त्रीत्व चे अवयव त्या ब्राह्मणाला देऊन टाक. स्वामी भक्त हो स्वामींचे हे बोलणे ऐकून राधा चांगलीच घाबरली. आणि तिने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. आणि तळमळीने विनंती करू लागली की स्वामी मला माफ करा. दृष्ट लोकांच्या नादी लागून मी आपली परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. सर्व मंडळी हा प्रकार बघत होते.
राधा तर अक्षरशः लज्जेने मान खाली घालून उभी होती. तिच्या सोबत असलेली ही वादक मंडळी तिला सोडून निघून गेली. पुढे काही दिवसांनी अजून एक चमत्कार झाला. राधेचे स्त्रीत्वाचे अवयव नाहीसे होऊन तिच्या शरीराला पुरुषाचा आकार येऊ लागला. आपल्या शरीरात अचानक होणारे बदल बघून ती पूर्णपणे घाबरून गेली. स्वामी महाराज प्रत्यक्ष परब्रह्म आहेत.
ही समज दृढ झाली. त्यानंतर ती पूर्णपणे वासनारहित झाली. स्वामींची अनन्य भक्त झाली. पुढे ती निर्मळ अंतःकरणाने स्वामींच्या भजनात दंग होऊ लागली. तिची भक्ती उत्तरोत्तर वाढत गेली. ती शुद्ध प्रेमळ भक्ती बघून एके दिवशी स्वामींनी आपल्या गळ्यातील माळ तिच्या गळ्यात टाकून तिच्यावर अनुग्रह केला. तिला दिव्यात्वाची समज देऊन तिच्यावर कृपा केली. पुढे ती उत्तरेकडे गेली.
<
शेवटपर्यंत काशिमध्ये राहिली. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या लीला अगाध आहेत. स्वामी आपल्याला प्रत्येक लिलेतुन असंख्य बोध देत आहेत. आजच्या लीलेतून तुम्हाला आम्हाला सर्वाँना स्वामी महाराज सांगत आहेत. की बाळा नो तुमच्या स्वतः च्या निर्मळ शुद्ध मनावर विश्वास ठेवा. सांसारिक कर्म करता करता तुम्ही शुद्ध स्वरूप आहात हे लक्षात ठेवा.
आणि त्यानंतर तुम्हाला अशुद्ध अहंकार भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला खुशाल तसे करू द्या. पावित्र्याचा शक्तीवर विश्वास ठेवा. तुमचे काही एक बिघडणार नाही. उलट ती भ्रमिष्ट अज्ञानी व्यक्ती तुमच्या सानिद्ध्याने शुद्ध होईल. पवित्र होईल. स्वामी भक्त हो बघा..! जो स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे जो स्वतः पावित्र्याचा स्त्रोत आहे अशा स्वामीरायांच्या पावित्र्याची परीक्षा राधाला आली, परंतु खऱ्या शुद्धतेचे वैशिष्ट जे असते त्याच्या सानिध्यात अशुद्धी आली तर ती अशुद्धी स्वतः शुद्ध होते. आणि त्याच प्रमाणे घडले.
शृंगारिक गाण्यात मदमस्त राहत असलेल्या राधेतील सौंदर्याचा अहंकार उतरवला आणि तिला तिच्या खऱ्या शुद्ध स्वरूपाची ओळख करवून दिली आणि तिला आनंदी भक्तीचा उपहार देत तिचे रूपांतरण अनन्य भक्तीचे भजन गाणाऱ्या राधेत केले. स्वामी भक्तहो आपण सुद्धा स्वामींचे अंश आहोत आपण सुद्धा पवित्र सच्चिदानंद स्वरूप आहोत.
आपल्याला आपल्या स्वरूपावर आलेले अज्ञानाचे थर बाजूला करून आपल्या शुद्ध आनंदी स्वरूपाचे दर्शन करायचे आहे. आणि विश्वास ठेवायचा आहे की एक जर राधा नावक गनिकेचा उद्धार होऊ शकतो. तर आपला उद्धार का होणार नाही! नक्कीच होणार आपल्याला फक्त आपल्या अहंकाराचे स्वामी चरणी समर्पित करायचे आहे.
आणि आपल्यातील शुद्धतेवर विश्वास ठेवून आपले संसारिक प्रामाणिक कर्म करत स्वामींना अपेक्षित आनंदित शुद्ध जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करुया; हे गुरुराया तुम्ही पावित्र्याचा सागर आहात.. जो कोणी तुमच्या सानिध्यात येतो तो सहज पवित्र होऊन जातो. आज माझे भाग्य की माझ्या मुखात तुमचे नाम आहे आणि खरोखर तुमच्या नामाने माझे जीवन पवित्र झाले आहे.
हे आई तुम्हाला हीच विनंती आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाम माझ्या ओठावर ठेवा. हृदयात तुमचा भक्ती भाव ठेवा. आणि तुम्हाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घ्या! हे महादेवा तुम्हीच सोडून मला कोणीच नाही. मला प्रेरणा द्या, मला मार्गदर्शन करा.
बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंदसद्गुरु अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.