नमस्कार मित्रांनो,
आठवड्यातील पहिला वार म्हणजे रविवार. हिंदूधर्म शास्त्रात अशी मान्यता आहे की रविवारचा दिवस सुर्यादेवाना आणि सोबतच भगवान विष्णूदेवाना अर्पण असतो.
त्यातल्या त्यात अनेक लोक या दिवशी भगवान सुर्यादेवाची, सूर्यनारायणाची पूजा करतात. सकाळी उठल्यानंतर सूर्याला तांब्याभर पाणी अर्पण केलं जातं. याला अर्घ्य देणे असं म्हणतात.
ही सवय ज्या लोकांनी अंगी कारली आहे त्या लोकांच्या जीवनात सुर्यादेवाच्या कृपेने मानसन्मान,
प्रतिष्ठा, यश या गोष्टी नक्की प्राप्त होतात. दर दिवशी सूर्य देवाला अर्घ्य अर्पण केल्यास घरातील आजार दूर होतात आणि चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते.
जाणून घेऊया कोणती कामे रविवारी करावीत आणि कोणती कामे कटाक्षाने टाळावीत कारण काही कार्य अशी असतात जी आपण रविवारी नकळत केल्यास आपल्या कुंडलीतील सूर्य नीच स्थानी राहतो. सूर्य कमजोर बनतो आणि त्याची अशुभ फळं आपल्याला प्राप्त होतात.
तसेच अशी काही कार्य असतात जी रविवारी केल्याने सूर्य मजबूत बनतो त्याचबरोबर सुर्यादेवांच्या कृपेने त्याची चांगली फळं आपल्याला मिळतात. समाजात मानसन्मान मिळतो तसेच संपूर्ण कुटुंबाला चांगले आरोग्य प्राप्त होते.
रविवारी दिवसभरात जर आपल्याला एखादी गरीब, असह्य, अपंग, रोगी व्यक्ती दिसली, एखादी किन्नर, तृतीयपंथी व्यक्ती दिसली तर अश्या व्यक्तीची सहायता, मदत अवश्य करा. यामुळे सूर्य मजबूत बनतो आणि याची शुभ फळं आपणास लाभतात.
या दिवशी सकाळी उठल्यावर घरातील पहिली चपाती, भाकरी ही गोमातेसाठी अवश्य काढुन ठेवा. आणि शक्य असेल तर प्रत्येक रविवारी गोमातेची पूजा करून एक रोटी अवश्य खाऊ घालत चला.
यादिवशी आपल्या कपाळावर लाल चंदन किंवा हरीचंदन लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच रविवारी चांगले पदार्थ तयार करून त्याचे सेवन करणंअतिउत्तम मानले आहे.
याचबरोबर रविवारी तांब्याभर पाणी घेऊन त्यात कुंकू टाकून हे पाणी वडाच्या झाडाच्या बुंदयाजवळ मनोभावे अर्पण करावे. तसेच सुके खोबऱ्याचा किस आणि साखरेची पूड एकत्र करून काळ्या मुंग्यांना खायला द्यावे.
त्याचप्रमाणे हिंदूधर्मशात्रानुसार रविवारी आपण काही कार्य चुकूनही करू नये यामध्ये जर यादिवशी आपल्याला एखादी गरीब, असाह्य, रोगी व्यक्ती किंवा किन्नर व्यक्ती दिसली तर त्यांना मदत करायची तर आहे मात्र चुकूनही त्यांचा अपमान करू नये.
रविवारच्या दिवशी पश्चिम किंवा वायव्य या दोन्ही दिशांना प्रवास करणं टाळावं. कारण हा प्रवास असफल ठरतो. जर प्रवास करणं अगदी अत्यावश्यक असेल तर पान खाऊन किंवा तोंडात थोडस तूप टाकून पाच पाऊलं मागे अगदी उलट्या बाजूने चालून नंतर आपण या दिशेने प्रवास करू शकता.
या दिवशी आपण काळ्या, निळ्या, तपकिरी आणि करड्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत. हे रंग सुर्यादेवाना पसंत नसतात. रविवारी मिठाच सेवन कमीत कमी करावं.
जर आपल्या कुंडलीत सूर्य कमजोर स्थानी आहे तर मिठाच सेवन टाळावं. याचा थेट प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडत असतो. तसेच अनेक कामामध्ये बाधा निर्माण होतात.
त्याचप्रमाणे रविवारी दिवसा कोणतेही व्यसन करू नये किंवा कोणत्याही प्रकारचे मांस खाऊ नये. शनि देवांशी संबंधीत कोणतेही पदार्थांचे सेवन करू नये.
कोणत्याही प्रकारच्या तेलाने मालिश करू नये कारण तेल हे शनी देवांशी संबंधित घटक आहे आणि रविवार हा सुर्यदेवांचा दिवस आहे.
आपल्याला जितके नियम पाळता येतील तितके नियम नक्की पाळा. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप सुर्यदेवना अर्घ्य अर्पण करताना करत चला.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.