नमस्कार मित्रानो
गरजू व्यक्तीला दान करणे हे सनातन संस्कृतीत अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात दान केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात आणि त्याला पुण्य प्राप्त होते हेच कारण आहे की हिंदू धर्मातील कोणताही उत्सव दानाशिवाय पूर्ण मानला जात नाही.
धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही गरजूंना काही गोष्टी सोडून काहीही दान करू शकता. त्या निषिद्ध वस्तूंचे दान केल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो आणि कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.
शिळे अन्न
गरजू व्यक्तींना अन्न देणे हे मोठे पुण्य मानले जाते, परंतु हे लक्षात ठेवा की अन्न शिळे नसून ते पूर्णपणे ताजे असावे. जर तुम्ही दानी व्यक्ती होण्यासाठी शिळे अन्न दान केले तर तुमच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
फाटलेली पुस्तके
जर तुम्हाला पुस्तके किंवा ग्रंथ दान करायचे असतील तर त्यांना या गोष्टी नेहमी नवीन द्या. फाटलेली पुस्तके किंवा ग्रंथ कोणत्याही परिस्थितीत देणे चांगले मानले जात नाही. असे केल्याने माता सरस्वती क्रोधीत होते , ज्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणाचा फटका सहन करावा लागतो.
टोकदार , धारदार वस्तू
कात्री, चाकू किंवा इतर कोणतीही तीक्ष्ण वस्तू कोणत्याही गरजूला कधीही दान करू नये. या गोष्टींमुळे इतरांचे नुकसान होणार आहे. असे केल्याने नशीब व्यक्तीवर नाराज होते. त्याचबरोबर कुटुंबातील क्लेशही वाढू लागतात.
झाडू
झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच चुकूनही झाडूचे दान करू नये. असे म्हणतात की जे झाडू दान करतात, त्यांना गरिबीचा सामना करावा लागतो आणि अनेक प्रकारचे आजारही त्यांना घेरतात.
तेल
घरात वापरलेले किंवा खराब झालेले तेल दान करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव दुःखी होतात आणि कुटुंबावर वाईट परिणाम होतात. असे म्हणतात की एकदा शनिदेव कोणावर क्रोधीत झाले की त्यांच्या आयुष्याची गाडी लवकर रुळावर येत नाही.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.