नमस्कार मित्रांनो,
मित्रानो स्त्री असो अथवा पुरुष प्रत्येकाचे नेत्र, प्रत्येकाचे डोळे कधी ना कधी स्फुरण पावतात. डोळे फडफड करतात. नेत्र स्फुरण पावन यामागे अनेक घटना घडण्याचा पूर्व संदेश असतो.
यामार्गे तुम्हाला आपल्या समोर येणारे संकट अथवा आपल्या सोबत घडणाऱ्या शुभ घटना यांची पूर्व सूचना मिळत असते. मात्र आपल्याला त्या बद्दलच ज्ञान नसत त्यामुळे बहुतांश वेळा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.
पण मित्रानो या पुढे जर आपले नेत्र स्फुरण पावत असतील डोळे जर फाडफड करत असतील तर तुम्हाला अगदी योग्य माहिती इथे मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला डोळा फडफडण्या मागची सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मित्रानो जर तुमच्या डोळ्याची वरची पापणी फडफड करत असेल तर त्यापासून लाभ होतो. खालची पापणी स्फुरली तर त्यापासून नुकसान होते. आणि नाकाजवळ म्हणजेच डोळ्याच्या आतली बाजू फडफडत असेल संकट येण्याची चिन्ह असतात.
पुरुषांचा उजवा नेत्र जर स्फुरण पावला तर त्याचा अशुभ किंवा शुभ प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो. हाच परिणाम महिलांच्या डाव्या नेत्रावर होतो. जर महिलांचा डावा नेत्र स्फुरण पावत असेल तर त्याचा अशुभ किंवा शुभ प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो.
त्याच बरोबर जर पुरुषाचा डावा नेत्र स्फुरण पावला आणि स्त्रियांचा उजवा नेत्र स्फुरण पावला तर यांची फळ निष्फळ असतात. म्हणजे यापासून कुठलाही लाभ होत नाही किंवा यापासून कुठले संकट सुद्धा आपल्यावर येत नाही.
पुरुषाचा उजवा आणि स्त्रीचा डावा नेत्र जर स्फुरण पावत असेल तर त्यापासूनच आपल्याला बरे वाईट लक्षण दिसून येतात. सामुद्रिक शास्त्र असे मानते की, पुरुषांमध्ये जर त्यांचा उजवा डोळा फडफडत असेल तर हे अंत्यत शुभ मानले जाते आणि भविष्या मध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होवू शकतो.
त्यांची अडलेली काम होवू शकतात. प्रोमोशन होऊ शकते किंवा मोठा धनलाभ होण्याची शक्यता असते. मित्रांनो जर महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल तर मात्र महिलांसाठी ही गोष्ट अशुभ असते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.