नमस्कार मित्रांनो,
खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करून सुद्धा जर तुम्हाला यश मिळत नसेल, किंवा खूप मेहनत करून सुद्धा तुमच्याकडे पैसा येत नसेल तर आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. या पाच मूलभूत गोष्टी ज्या आहेत यशाचं व धनवान बनण्याचं गुपित.
मित्रांनो जर या गोष्टींचे पालन तुम्ही गेलात तर बंद झालेली आर्थिक उन्नतीची दारे नक्कीच उघडतील.
हिंदी मध्ये असे म्हटले जाते, सही समय सही मित्र सहि तरिका. पैसे कमावण्याचे साधन आणि पैसे खर्च करण्याचा सही तरीका यांचा योग्य ताळमेळ म्हणजेच यश होय.
एक, सही समय म्हणजे तुम्हाला सध्या नोकरी कुठे आहे, तूम्ही काय करू शकता, हे समजून घ्यायला हव. जुन्या पद्धतींनी, जुन्या काळाप्रमाणे जर तुम्ही वागू लागला तर कधीच यश मिळणार नाही.
मित्रांनो आज काळ अत्यंत वेगाने बदलत आहे. पैसे कमावण्याचे मार्ग बदलत आहेत. उद्योगधंद्यांच्या पद्धती बदलत आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा अपडेट राहावे लागेल. लक्षात ठेवा जो बदलतो तोच टिकतो. आणि म्हणून योग्य वेळेनुसार जे काम तुम्ही हाती घेतल त्या वेळेतच पूर्ण करा. ते पोस्टपोन न करता आज आताच करा.
तुम्हाला जे जे काही काम करायचे आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्यांने एक विशिष्ट क्षेत्रांमधील तुम्ही प्रावीण्य मिळवायला हवे. जेव्हा कामे वेळेत पूर्ण होतात आणि तुम्हाला यश मिळतंच आणि अशा कामातच पैसा सुद्धा मिळतो.
मित्रांनो नंबर 2 सही मित्र, म्हणजेच आपल्याला योग्य मित्रांची निवड करता यायला हवी, तुम्हाला मित्र असायला हवेत, प्रत्येक माणसाच्या यशामध्ये मित्रांचा वाटा फार मोठा असतो, मात्र काही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
आपल्याला योग्य वाटतात पण त्यातीलच काही जण मागे धोका देतात, योग्य मित्र तुमचे सिक्रेट्स शेअर करत नाहीत. काहीजण पाठीवरती वार करतात, पाठीमागून येऊन गुप्त शत्रू असतात अशा लोकांपासून सावध राहायला हवं. म्हणून चांगले मित्र बनवायला हवेत.
नंबर 3 सही ठिकाण म्हणजेच योग्य ठिकाण. तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते ठिकाण जर योग्य नसेल तर तुमचा विकास होणार नाही. त्यासाठी आवश्यकता असते ती सही ठिकाण निवडण्याची. कारण चुकीच्या ठिकाणी विकासाच्या कोणत्याही संधी नसतात, नवीन रोजगार नसतात, नवीन कंपनी येत नाहीत, नवीन उद्योगधंदे स्थापन होत नाहीत. तर अशा ठिकाणी राहण्यात काही अर्थ नसतो.
मित्रांनो तुम्ही अशा ठिकाणी राहायला हवं जिथे कलेला वाव मिळेल, कलेवरती तुम्ही गुजरान करू शकतात, त्या कलेचा सन्मान होईल, तुमच्याकडे जे कौशल्य आहे त्याचा त्या ठिकाणी सन्मान होईल अशा ठिकाणी वास्तव्य करावं.
ज्या ठिकाणी बेरोजगारी असते, तिथे उद्योग धंदे नसतात, विकासाच्या संधी नसतात, सर्वत्र गरिबी गरिबीच दिसून येते किंवा ज्या ठिकाणी सारखी परिस्थिती असते अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नका. अशा ठिकाणी तुम्ही फक्त यशस्वी होण्याची फक्त स्वप्न पाहत राहाल, तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही.
मित्रांनो नंबर 4, पैसे कमावण्याचं साधन म्हणजे आपल्याकडे बरेचजण 2 नंबर ने पैसे मिळवतात. आपण चुकीच्या मार्गाने पैसे कमावू लागतो. असे तुम्हाला दिसत, तुमच्या आजूबाजूला बरेच लोक अगदी चुकीच्या मार्गाने देखील पैसे कमावतात. सरळ सरळ बोलायचं तर दोन नंबरने पैसे कमावत आहेत.
अशा लोकांकडे पैसा येतो सुद्धा आलेला पैसा हा कधीही टिकत नसतो. त्यातून कधीही संतोष ती म्हणजे समाधान मिळत नसतं. कारण तुम्हाला दिसेल की या लोकांकडे पैसा आलेला आहे. त्याच्यावर सुखसुविधा मिळत आहेत मात्र लक्षात ठेवा त्यातून समाधान मिळत नाही.
उलट मेहनत करून योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे थोडा जरी असला तरी आपल्याला समाधान मिळतं आणि या पैशातून काही गोष्टी निर्माण होतात. मित्रांनो हा पैसा कधीही वाया जात नाही.
आता शेवटची गोष्ट खर्च करण्याचं सही तरीका. आपल्याकडे पैसा आलेला आहे. खूप मेहनत करून तो पैसा आलेला आहे. तो जर तुम्ही उधळपट्टी केली तर काय उपयोग.
जर तो पैसा जर तुम्ही अगदी व्यवस्थित खर्च केला तर तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडणार नाही, त्या गोष्टीचा आधी विचार करा. आपल्याकडे जुन्या जाणत्या माणसांनी सांगुन ठेवल आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजेच काम आहे त्यापेक्षा जास्त खर्च कधी करू नये.
मित्रांनो तुम्ही जर खूप मेहनत करून पैसा कमविला असेल तर तुम्हाला त्याचे मूल्यमापन करता यायलाच हवं, त्या पैशाची किंमत तुम्हाला माहीत असायला हवी आणि म्हणून ज्या गोष्टींवरती खरोखरच आपण खर्च करताय या गोष्टींवर खर्च करणं आवश्यक नाहीये अशा गोष्टी वरती खर्च तुम्हाला टाळता यायला हवा.
जे लोक इन्कम आणि आपल्या होणारा खर्च याचा ताळेबंद व्यवस्थित ठेवतात, तेच लोक आयुष्यात यशस्वी होतात . आपण जो काही पैसा कमावला त्यातील थोडाफार तरी पैसा हा गुंतवणुकीसाठी वापरा. त्यातून पुन्हा नवीन पैसा निर्माण होईल.
लक्षात ठेवा पैशाकडेच पैसा येत असतो आणि म्हणून नवीन पैसा आकर्षित करेल त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.