आज वट पौर्णिमेची रात्र… रात्री चंद्र दिसताच करा हे उपाय… आयुष्य बदलुन जाईल…

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहुयात वटपौर्णिमेच्या दिवशी सहज आणि सोपे असे कोणते उपाय करायचे. वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्वाचे म्हणजे हळदी कुंकूवामध्ये थोडीसे केशर टाकून मग ते स्वतःच्या कपाळी लावावे.

आपल्या पतीस ही कुमकुम तिलक करावे. ओल्या कुंकुवा मध्ये केशर टाकून पतीच्या कपाळी लावून त्यावर अक्षता चिटकवावे. पतीचे औक्षण करून त्यांना नमस्कार करावा.

वटपौर्णिमेची पूजा करून आल्यानंतर केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी उशिरा केल तरी चालेल. शक्य असल्यास पतीने पत्नीस काठापदराची साडी किंवा कोणताही एक दागिना भेट म्हणून द्यावा.

पत्नीकडून एखादा सुट्टा रुपया घेऊन त्यात आपला रुपया टाकून एका हिरव्या कापडात गुंडाळून तो पैशाच्या कपाटात ठेवून द्यावा. यामुळे बरकत येते.

संध्याकाळी चंद्र दिसू लागल्यावर चंद्राला हळदीकुंकू अर्पण करा. त्याचे औक्षण करा. वाटीभर दूध दोन्ही हातांनी चंद्राला अर्पण करा. अर्पण करताना कोणत्याही झाडात हे दूध सांडले तरी चालेल.

पत्नीने दोन्ही हाताची ओंजळ झाडाच्या दिशेने करावी व पतीने त्यावर दूध अर्पण करावे. त्यानंतर दोघांनी चंद्राला नमस्कार करावा. हा पारंपारिक उपाय आहे. जमल्यास गायत्रीमंत्राचा 18 वेळा जप दोघांनी करावा. पती आणि पत्नी ने चांदीच्या पेल्यामध्ये दूध रात्रभर ठेवून सकाळी ते प्राशन करावे.

असं म्हणतात की ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी आणि विष्णूचा पिंपळाच्या झाडावरती वास असतो. अशा वेळेस एका तांब्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये कच्चे दूध आणि बत्तासे टाकून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.सकाळ संध्याकाळ कधीही केले तरी चालेल.

जर पती-पत्नीमध्ये फार कटकटी होत आहेत असे वाटत असेल किंवा काही भाग्य बिघडल्यासारखं वाटत असेल किंवा आपलं काम होत नसेल तर घरातल्या पाणीसाठ्यात एक चमचा दूध टाकावे. तसेच पौर्णिमेच्यादिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात चार चमचे दूध टाका.

ज्या पती-पत्नींमध्ये एकमेकांच्या बाबतीत जास्त चिडचिड वाटत असेल, अजिबातच पटत नसेल तर दोघांनी या दिवशी उजव्या करंगळीमध्ये चांदी, तीन ते चार कॅरेटचा साधा मोती धारण करावा.

सर्व प्रकारचे दोष, नजर दोष, बाधा तसेच जन्म कुंडलीतले ग्रह दोष हे तुम्हाला जाणवत असतील तर वड, पिंपळ आणि औदुंबर तसेच कडुलिंबाच्या झाडाखाली विष्णुसहस्त्रनाम किंवा शिवाष्टकाचा पाठ करा. त्यानंतर या सर्व झाडांना दूध टाकून पांढरे तीळ अर्पण करा. पाणी अर्पण करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.