दिवाळी येण्यापूर्वी घराबाहेर काढा या 8 वस्तू… लवकरच व्हाल मालामाल…

नमस्कार मित्रांनो,

दिवाळी म्हणजे सर्वांच्या आवडीचा असा सण आहे. दिवाळी आली कि एक वेगळीच उत्सुकता मनामध्ये निर्माण होते. दिवाळीच्या काही दिवस आधीच घरात लगबग सुरु होते.

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे, अनेक जण घराच्या साफसफाईला सुद्धा लागले असतील. घरातील अनेक जुन्या, तुटक्या फुटक्या वस्तू आपण घराबाहेर काढतो जेणे करून घर स्वच्छ आणि टापटीप दिसावं.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी घरात प्रवेश करते, पण या 8 गोष्टी घरात पडून असतील तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही.

कारण या वस्तू माता लक्ष्मीस अत्यंत अप्रिय आहेत, अजिबात आवडत नाहीत मातेस या 8 वस्तू.

चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या 8 वस्तू ज्या आपण दिवाळीपूर्वी घरातून बाहेर काढायला हव्यात.

देवी देवतांचे तुटलेले फुटलेले फोटो, मूर्ती

मित्रानो जर घरात किंवा देव्हाऱ्यात असे देवी देवतांचे तुटलेले फुटलेले फोटो किंवा मुर्त्या असतील तर या मुर्त्या किंवा फोटो तात्काळ हटवाव्यात. त्वरित यांचे पाण्यात विसर्जन करावे.

अशा मुर्त्या घरात ठेवणं हा एक मोठा दोष मानला जातो, यामुळे आपले भाग्य आपल्याला साथ देत नाही. भाग्याच रूपांतर दुर्भाग्यात होत.

अगदी चालू असलेली काम सुद्धा अडतात, घरामध्ये वाद विवाद होतात. तर मित्रानो साफ सफाई चालूच आहे तर अश्या प्रकारचे फोटो आणि मुर्त्याचे विसर्जन करायला विसरू नका.

आता काहींना प्रश्न पडला असेल कि या खंडित मुर्त्या कशा प्रकारे विसर्जित करायच्या. तर मित्रांनो त्यांना तुम्ही वाहत्या पाण्यात सुद्धा विसर्जित करू शकता किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता.

घरातील पूर्वजांचे किंवा वाड वडिलांचे फोटो

मित्रांनो घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर ते योग्य दिशेला आहेत का याची खात्री करा.

अनेक जण आपल्या देवघरातच आपल्या पित्राचे पूर्वजांचे फोटो ठेवतात, किंवा देवी देवतांजवळ हे फोटो लावले जातात. यामुळे देवघरात पावित्र्य राहात नाही.

घरात मोठ्या प्रमाणात पितृदोष निर्माण होतात. पूर्वजांचे आशीर्वाद लाभावे असे वाटत असेल तर ते फोटो उत्तर दिशेला लावावेत.

उत्तरेस फोटो लावणं शक्य नसेल तर पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही फोटो लावू शकता. सोबतच त्या फोटोंची फ्रेम तुटली असेल, काचा तुटल्या असतील तर ते लगेचच दुरुस्त करून घ्याव्या. अश्या घरात सुद्धा माता लक्ष्मी प्रवेश करत नाही.

जुने दिवे

मागच्या वर्षी जे दिवे आपण दिवाळीत प्रज्वलीत केले होते त्याच दिव्यांचा वापर या वर्षी करणे कटाक्षाने टाळावे. आणि जर पुन्हा वापर करणारच आहात तर ते स्वच्छ घासून पुसूनच त्यांचा वापर करायला हवा.

जुने दिवे जे मळकट झालेले आहेत अशा दिव्यांचा वापर केल्याने माता लक्ष्मी क्रोधीत होते, अप्रसन्न होते आणि अशा घरात ती प्रवेश करत नाही.

घराचा मुख्य दरवाजा

मित्रानो घराचा मुख्य दरवाजा वास्तू शास्त्रानुसार अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण याच दरवाजातून सुख समृद्धी आपल्या घरात येत असते. माता लक्ष्मी सुद्धा याच दरवाजातून आपल्या घरात प्रवेश करते.

घरात सुख समृद्धी आणते, आणि मग अशा वेळी घराचा दरवाजा तुटलेला असेल किंवा मग त्याला क्रॅक गेल्या असतील, चिरा पडलेल्या असतील किंवा मग हा मुख्य दरवाजा उघडताना आवाज येत असेल तर असा दरवाजा वासू दोष युक्त मानला जातो.

यामुळे माता लक्षमी घरात प्रवेश करत नाही. आणि म्हणून आपला मुख्य दरवाजा स्वस्तिक असेल, ओम असेल अश्या शुभ चिन्हांनी सजवावा. शुभ लाभ असं त्याच्या दोन्ही बाजूला लिहावं.

चौकटीला आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावावं. जेणेकरून एक प्रकारची स कारा त्मक ऊ र्जा निर्माण होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात येऊ शकेल.

काचेच्या वस्तू

मित्रानो अनेकांच्या घरात काचेच्या वस्तू किंवा काचेचं साहित्य असते. आपल्या घरात पण काचेच्या वस्तू असतील तर त्या त्वरित बदला.

उदाहरण जर तुमच्या घरात कपाटाचा आरसा फुटला असेल तर ते अशुभ मानले जाते. काच हा राहू शी संबंधित पदार्थ आहे, आणि म्हणून फुटलेल्या काचांमुळे आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात राहू दोषाची निर्मिती होते.

परिणामी घरावर मोठं मोठी संकटे येतात. अपघात, दुर्घटना अशा वेळी हा राहू दोष कारणीभूत असतो. त्यामुळे या दिवाळीत काचेच्या तुटलेल्या वस्तू अवश्य बदलून घ्या.

पलंग

मित्रांनो अनेकदा वैवाहिक जीवन सुरळीत सुरु नसते. पती पत्नी मध्ये कायम वाद सुरु असतात अशामुळे दोघेही टोकाची भुमीका घेऊन परिस्तिथी घटस्फोट पर्यंत जाते.

मित्रानो अशावेळी आपल्या घरातील जो बेड, पलंग आहे तो जरा बारकाईने पहा. बेड हा वाजत असेल, पाय तुटलेले असतील किंवा कोणत्याही कारणास्तव बेड खराब झाला असेल तर येत्या दिवाळी पूर्वी हा बेड दुरुस्त करून घ्या. किंवा तो दुरुस्तीच्या लायकीचा राहिला नसेल तर तो घरा बाहेर काढलेला बरा.

कारण असा बेड पती पत्नीच्या जीवनात कलह निर्माण करतो. सोबतच घरात जे काही जड साहित्य आहे ते नेहमी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावं. कारण नैऋत्य दिशा हि जड वस्तूंसाठी योग्य दिशा मानली जाते.

घड्याळ

आपल्या घरातील महत्वाची वस्तू म्हणजे घड्याळ. मित्रानो आपल्या घरात जर एकापेक्षा जास्त घड्याळ असतील तर सर्व घड्याळांमध्ये समान वेळ दाखवत आहेत का,याची काळजी घ्या.

ज्या घरातील घड्याळ वेग वेगळ्या वेळा दर्शवतात अश्या घरात कायम वाद विवाद सुरु असतात. तसेच घड्याळ तुटलेले, फुटलेले नसावे, अनेक जण बंद पडलेली घड्याळे घरामध्ये साठवून ठेवतात.

तर येत्या दिवाळीपूर्वी अशी घड्याळ घरा बाहेर अवश्य काढा. कारण बंद पडलेली घड्याळ भाग्य सुद्धा बंद करतात. आयुष्यात नवं नवीन संधी निर्माण होत नाहीत. सोबतच ज्या इले क ट्रो निक वस्तू घरात आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत त्या सुद्धा घरातून बाहेर काढा.

कपडे

खराब झालेलं कपडे, तुटलेले फाटलेले कपडे, तुटल्या फुटलेल्या चपला, बूट या वस्तू सुद्धा दिवाळी येण्यापूर्वी घरातून बाहेर काढा.

मित्रानो वस्तू अगदी सध्या सुध्या वाटत आहेत. तुम्हाला वाटत असेल असा काय फरक पडणार आहे या वस्तू घरा बाहेर काढून, पण मित्रानो हे एकदा करून बघा, तुम्ही स्वता घरात चैतन्य आलेले पाहाल. घरात सुख शांती आली तर पैसा यायला वेळ नाही लागत.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *