नमस्कार मित्रांनो ,
दिवाळीत सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतेच. दिवाळीपूर्वी प्रत्येक घरात साफ-सफाई आणि स्वच्छता करण्यात येते. ज्या घरात स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन होते असं म्हटलं जातं.
दिवाळीपूर्वी सर्वच घरात साफसफाई करण्यास सुरुवात होते. तसेच घरांची रंगरंगोटी आणि सजावट करण्यासही सुरुवात होते. असं मानलं जातं की, ज्या घरात साफसफाई अन् स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचं आगमन होतं. तसेच सुख-समृद्धी येते. दिवाळीत साफसफाई करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.
तुटलेली काच…
घरातीलकोणत्याही कोपऱ्यात तुटलेली काच नसावी. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली काच हे अपशकून मानले जाते.घरातील खिडकी आणि दरवाजाला असलेली काच तुटलेली असेल तर दिवाळीपूर्वी ते नक्कीच बदलून घ्या. इतकेच नाही तर बाथरूमच्या खिडकीची काचही तुटलेली नसावी. सोबतच दिवाळीत काचेच्या वस्तूंचा वापर हा कमी असलेला बारा.
इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती…
घरातील वीजेवर चालणारी एखादी वस्तू बिघडली असेल तर तात्काळ दुरुस्त करा. अन्यथा त्या वस्तू फेकून द्या. इतकेच नाही तर पंख्यातून आवाज येत असेल तर ते सुद्धा दुरुस्त करुन घ्या.
जुने घड्याळ…
जुने आणि बंद पडलेले घड्याळ हे दुर्दैवाला आमंत्रण देण्याच्या सारखे आहे. या घड्याळाची एकतर दुरुस्ती करुन घ्या किंवा फेकून द्यावे. बंद पडलेले घड्याळ हे घरात ठेवणे म्हणजे आपण जाणूनबुजून प्रगतीला रोखत आहोत.
स्वच्छता…
वास्तूत घराच्या छताची साफसफाई फार महत्त्वाची मानली जाते. ज्या घरातील छत हे अस्वच्छ असते त्या ठिकाणी नेहमीच आजारपण आणि दु:ख कायम राहते. त्यामुळे घराचे छत हे नेहमीच स्वच्छ ठेवा.
तुटलेली मूर्ती..
घरातील देवघरात किंवा इतरत्र तुटलेली मूर्ती असेल तर दिवाळीपूर्वी ते वाहून टाका. तुटलेल्या मूर्तीची पूजा करणे शास्त्रात चुकीचे मानले जाते. त्याऐवजी नवीन मूर्ती आणा आणि त्याची प्रतिष्ठापना करुन मग पूजा करा. तसेच शोपीस म्हणून आणलेल्या देवांच्या मूर्तीची पूजा करू नका.
तुटलेली भांडी…
असे मानले जाते की, घरात चुकूनही तुटलेली भांडी ठेवू नका. घरात तुटलेली भांडी ठेवणे म्हणजे नशीब आपल्यावर नेहमीच नाराज होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी अशी तुटलेली भांडी घरातून बाहेर काढा. सोबतच कमी ना येणारी भांडी विकून टाका किंवा गरिबांना दान करा .
तुटलेले फर्निचर…
वास्तूशास्त्रानुसार, घरात जर तुटलेले फर्नीचर असेल तर ते अशुभ मानले जाते. जर घरात एखादी खुर्ची, टेबल किंवा एखादे तुटलेले फर्निचर असेल तर दिवाळीपूर्वी त्याची दुरुस्ती करुन घ्या किंवा ते घरातून काढून टाका.