नमस्कार मित्रांनो,
दिव्यात वातीचे फुल का बनते? आज आपण पाहणार आहोत की कोणाच्या दिव्यात फुल बनते? असे कोणाच्याही दिव्यात फुल बनत नाही. त्यासाठी काही खास व्यक्ती आहेत. ज्यांच्या दिव्यात फुल बनते. नित्यपूजा जे करतात, भक्ती करतात, मनापासून पूजा करतात, वरचेवर देवाचे काही करत नाहीत, साधना करतात.
त्यांना देव काही संकेत देतात जस की फुल पडणे. पूजा करताना फुल पडणे हा देखील तोच संकेत आहे. त्याचप्रमाणे हा एक संकेत आहे की दिव्याच्या वातीमध्ये फुल बनणे. अगदी स्पष्ट आकारात त्या दिव्याच्या वातिचे जेव्हा काजळी निर्माण होते त्यामध्ये फुलाचा आकार दिसतो.
तो एक दैवी संकेत आहे की तुमच्या सोबत देव आहे आणि तुमची भक्ती देवा पर्यंत पोहोचत आहे. तुम्हाला देव आशीर्वाद देत आहे. तुम्हाला कर्म करण्याची आणि कष्ट करण्याची खूप गरज आहे. जेव्हा तुम्हाला असे आशीर्वाद मिळतात.
असे फुल बनल्यानंतर तुमच्या मनातील जी कोणती प्रबळ इच्छा आहे ती लगेच देवाजवळ बोलून दाखवा. ती १००% पूर्ण होईल. असे देवाच्या वातीमध्ये फुल बनणे याचा अर्थ तुम्ही देवाशी कनेक्टेड आहात असा आहे. काही अशुभ संकेत नाही. घाबरण्यासारखे काही नाही.
शुभ संकेत आहे. पूजा पाठ करताना संकेत ज्यांना मिळत नाहीत अशांना जेव्हा हा संकेत मिळतो. वातीचे फुल जेव्हा बनते तेव्हा लाभ होतो. तुम्ही जे मंत्र जप करता ते देवा पर्यंत पोहोचलेले आहेत. तुमची भक्ती देवा पर्यंत पोहोचलेली आहे. असे म्हणायला हरकत नाही.
अशा लोकांच्या दिव्यातही फुल बनते. पाच तत्व balance होतात तेव्हा दिव्यात फुल बनते. अग्नी देवता तुमच्यावर प्रसन्न आहे. असा या फुल बनण्याचा संकेत आहे. अग्निने तुमची पूजा स्वीकार केलेली आहे. असा देखील याचा संकेत आहे.
मागच्या जन्मीचे पुण्य ज्यांचे भरपूर असते, भरपूर तपस्या केलेले असतात ते कधीही वाया जात नाहीत. ते या जन्मी कामी येतात. मंत्रांची ऊर्जा आपल्या पूजेत समाविष्ट होते. आणि मंत्रांची सिद्धी झाल्यानंतर दिव्यामध्ये फुल बनते. जेव्हा आपले मंत्र काही पटीने म्हणजे लाखो, करोडो पटीने होतात.
रोज जर तुम्ही हजारो जप करत असाल तर आपोआप तो लाखोच्या कोटीच्या घरात जातो. आणि ते मंत्र सिद्धीस जातात. जेव्हा आपले मंत्र सिद्धीस जातात तेव्हा आपल्या दिव्यात फुल बनते. हा शुभ संकेत आहे. काहीच न करता रोजच फुल बनत असेल तर अग्नी तत्वाशी निगडित असा हा संकेत आहे.
<
लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर अखंड राहणार आहे. अग्नी देवता तुमच्यावर प्रसन्न आहे. आर्थिक लाभ होणार आहेत असा याचा संकेत आहे. पूजा पाठ काहीजण खूप करतात अनेक त्याग खूप करतात. त्यागचा अर्थ मांसाहार सोडतात, मदिरा सोडतात देवासाठी अक्षरशः कांदा, लसूण खाणेही सोडतात.
अशा लोकांवर देव अतिशय शीघ्र प्रसन्न होतो असे म्हटले जाते आणि अशा लोकांच्या त्याग करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात वातीमध्ये फुल बनते. स्मशानातून जाऊन आल्यावर जसे आपण आंघोळ करतो तसे मांस, मदिरा खाल्ल्यावर अंघोळ केली जाते.
याचाच अर्थ किती ते वाईट असेल याचा विचार करा. मांस मदिरा खाणे हे पाप आहे म्हणून सोडण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय तुमची सेवा देवापर्यंत रुजू होत नाही. कोणत्याही देवाला कोणत्याही जीवाची हत्या करून त्याची मजा लुटलेली आवडत नाही. पटेल त्यांनी घ्या. नाही पटेल त्यांनी सोडून द्या ही नम्र विनंती.
खूप भावनात्मक असणे, कोणालाही दुःखी न करणे, कोणाच्याही मदतीला धावून जाणे. कोणाला दुःख झाले तर तुम्हाला रडू येणे. अशा लोकांच्या बाबतीतही खूप चांगले घडते. जे रोज पूजा करतात भावूक असतात त्यांच्या दिव्यामध्येही अशा प्रकारचे फुल बनते.
दुसऱ्याचे चांगले करण्याची वृत्ती ज्यांची असते त्यांच्या दिव्यातही अशा प्रकारचे फुल बनते. ज्यांच्या दिव्यात फुल बनत नाही त्यांनी नाराज होऊ नका. ही सर्व वागणूक जर तुमची असेल तर देव तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. फक्त आचरण चांगलं ठेवा. कर्म आणि कष्ट नेहमी जोडीला चांगले ठेवा तुमचं नेहमी कल्याणच होत जाईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.