घरात धन येण्यापूर्वी मिळतात हे ठीक पाच संकेत लगेच ओळखा.

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगली वेळ व वाईट वेळ ही येतच असते आणि चांगली वेळ व वाईट काळ हा एकमेकांना विपरीत असतो. प्रत्येक मनुष्याला असे वाटते की त्याचा वाईट काळ निघून जावा व चांगली वेळ यावी परंतु वाईट काळानंतर चांगला काळ व चांगल्या काळानंतर वाईट काळ हा येतच असतो.

अशा स्थितीत भगवंतांचे नामस्मरण हे खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण काही व्यक्ती आपल्या वाईट काळात भगवंतांचे नामस्मरण करतात व त्यांची वाईट वेळ जाऊन चांगली वेळ आली की अहंकारात इतके फुलतात की भगवंताला ही विसरून जातात. आपला वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी

भगवंत आपल्याला त्या विषयी संकेत देतात. परंतु आपण आपल्या कामांमध्ये इतके व्यस्त असतो की हे संकेत आपल्या लक्षातच येत नाही. धर्मशास्त्रात देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते आणि असे म्हटले जाते की लक्ष्मी ही चंचल स्वभावाची आहे आणि देवी ही कोणाकडे निरंतर वास्तव्य करत नाही.

आणि अशातच जे लोक देवीचे मनापासून करतात व कोणाचे मन दुखेल असे आचरण करत नाही या व्यक्तींवर देवी आई प्रसन्न होते आणि त्यांना धन व सुख-समृद्धी प्रदान करते. विष्णू पुराना देवी लक्ष्मी बद्दल काही तथ्य सांगितलेले आहेत. देवी लक्ष्मी ज्या घरात आगमन करणार असते

येथील व्यक्तींना देवी आधी काही संकेत देते. जर तुमच्या जीवनात या पाच पैकी एखादा संकेत घडत असेल तर समजून जा ती लवकरच तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होणार आहे. तुमचे भाग्यच बदलणार आहे चला तर बघूया ते पाच संकेत. घुबडाला देवी लक्ष्मीचेवाहन मानले जाते

आणि जर तुम्हाला कुठे घुबड दृष्टीस पडले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि लवकरच देवी लक्ष्मी घरात वास्तव्य करणार आहे. कारण जेथे-जेथे घुबड असते तेथे देवी लक्ष्मी स्वतः असते. तुम्ही देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि कोणतेही असे काम करू नये. ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल.

जर आपल्याला सगळीकडे हिरवळ दिसत असेल वारंवार हिरवी झाडे, झुडपे बाग-बगीचे दृष्टीस पडत. हिरवीगार वस्तू स्वप्नात येत असतील तर समजून जावे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे. हिरव्यागार वस्तू ,भाजीपाला, हिरवळ या वस्तू आपले जीवनही त्यांच्याप्रमाणे बहरलेले वटवट वीट करून टाकतात.

झाडूला आपण देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतो. झाडू स्वच्छता करण्याचे काम करते. देवी आईला स्वच्छता खूप प्रिय आहे. झाडू आपल्या घरातील केरकचरा बाहेर काढते अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांपासून आपण दूर राहतो. तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामा निमित्त बाहेर पडत असताना

एखादा सफाई कर्मचारी झाडताना दिसल्यास असे समजावे की देवी लक्ष्मी चे आपल्या घरात आगमन होणार आहे. व आपले नशीब पालटणार आहे. जर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आल्यास असे समजावे की तुमच्यावर भगवंतांची कृपा होणार आहे.

आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावर धन वर्षाव होणार आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की उसाचा रस भगवंतांना अर्पण केल्यास देवी लक्ष्मी अति प्रसन्न होते कारण त्यात उपजतच गोडवा आहे. हा गोडवा आपल्या जीवनात उतरतो म्हणून जर आपल्याला उठल्या उठल्या उसाचे दर्शन झाले.

तर समजावे की देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे तर मित्रांनो हे आहेत ते संकेत जर तुमच्याही जीवनात मिळत असतील तर आनंद साजरा करा कारण लवकरच तुमचे भाग्य बदलणार आहे. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *