नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आज 24 जूनला वटपौर्णिमा आहे. विवाहित महिलांचा खास दिवस. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात आणि कामना करतात. पतीचे आयुष्य वाढावे, दीर्घायुष्य लाभूदे अशी कामना करतात.
जर तुम्ही तुमच्या कुलदैवताला, देवीला, लक्ष्मी किंवा इतर कोणत्याही देवीची मूर्ती असेल किंवा ज्या कोणत्याही देवीला तुम्ही मानत असाल त्या देवीची ओटी भरली तर तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल.
ओटी फक्त विवाहित स्त्रीने भरावी. ही ओटी भरायची आहे 24 जून रोजी वटपौर्णिमेला. हा खूप शुभ दिवस आहे. वाटपौर्णिमेदिवशी तुम्हीसुद्धा देवीची ओटी भरा. सोप्प्या पद्धतीने घरच्या घरी ओटी भरा.
देवीच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसून तुम्ही ओटी भरू शकता. यासाठी तुम्हाला एक पूजेचा नारळ लागेल आणि एखादी नाविकोरी साडी किंवा ब्लाउस पीस. नवीन साडी किंवा ब्लाउस पीस देवीसमोर दोन्ही हाताने ठेवावी. त्यावर नारळ ठेवावं. त्यानंतर ५ किंवा ७ मूठ तांदूळ किंवा गहू ठेवावे. हळदी कुंकूवाने ओटीची पूजा करावी.
अश्या सोप्यापद्धतीने ओटी भरावी. एक दिवस रात्रभर ती ओटी तशीच देवीसमोर ठेवावी आणि दुसऱ्यादिवशी जे हे गहू किंवा तंदुळ असतील त्या आपल्या घरातल्या धान्यात मिक्स करावे.
नारळ फोडून त्याचा प्रसाद करून घरच्यांनी सगळ्यांनी खावा आणि ओटीची साडी असेल ती ज्या महिलेने ओटी भरली त्या विवाहितेने देवीचा प्रसाद, आशीर्वाद समजून ती साडी वापरायला घ्यावी.
तर अश्या सोप्प्या पध्दतीने 24 जून वाटपौर्णिमेदिवशी विवाहित महिलांनी ओटी अवश्य भरा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.