मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी कधी व कशी भरावी नक्की जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी कधी व कशी भरावी नक्की जाणून घ्या. कारण हा महिना मार्गशीर्ष महिना देवीचा महालक्ष्मीचा लक्ष्मी मातेचा महिना मानला जातो. असे मानले जाते की, या महिन्यात लक्ष्मीची आराधना लक्ष्मीची कृपा प्राप्त केली तर लक्ष्मी प्रसन्न होते.

म्हणून आपण या महिन्यांमध्ये लक्ष्मी मातेची ओटी अवश्य भरली गेली पाहिजे, आपण भरायला पाहिजे. मित्रांनो लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी खास दिवस असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे गुरुवारचा दिवस. तसा तर मार्गशीष महिना हा 5 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

5 डिसेंबरपासून महिना सुरू झाल्यानंतर पहिला जो गुरुवार येत आहे तो 9 डिसेंबरच्या दिवशी पहिला गुरुवार येत आहे. यानंतर 3 किंवा 4 गुरुवार असे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात. तर तुम्ही पहिल्या गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी, चौथ्या गुरुवारी तुम्हाला ज्या गुरुवारी वेळ मिळेल,

ज्या गुरुवारी तुम्हाला जमेल त्याच गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीची ओटी तुमच्या घरातच भरायची आहे. खास करून विवाहित महिलांनी ही ओटी भरायची असते. अविवाहित महिलांनी ओटी भरायची नसते. तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी मार्गशीष महिन्यात ही ओटी भरू शकता. सकाळी भरा संध्याकाळी भरा कोणत्याही वेळेस भरा.

त्या ओटीमध्ये तुम्ही ब्लाऊजपीस ठेवू शकता किंवा नवीन कोरी साडी आणू शकता ती ठेवू शकता. त्यानंतर नारळ आणून नारळ ठेवू शकता. ओटी भरण्याची सोपी पद्धत असते. सगळ्यात आधी पाठावर किंवा चौरंगावर माता लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती लाल कापड टाकून स्थापन करायची. लक्ष्मीचा पाठावर कधीही सफेद कापड टाकून नये. फक्त लाल रंगाचा कापड टाकावा.

त्यानंतर तो माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर साडी असेल तर साडी, ब्लाउजपीस असेल तर ब्लाउजपीस तुम्ही पाठाच्यासमोर ठेवायचं आहे. साडी असेल साडी ठेवा किंवा ब्लाऊजपीस असेल तर ब्लाऊजपीस ठेवा. त्यानंतर तुम्ही 5 किंवा 7 मूठ तांदूळ किंवा गव्हाचे त्या ओटीमध्ये टाकायचे आहे.

जस तुम्ही इतर ओटी भरता तसं. ते टाकल्यानंतर तुम्ही 1 नारळ ठेवायचं. त्यानंतर 11 रुपये दक्षिणा किंवा 21 रुपये तुम्ही त्यात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो सौभाग्याचा शृंगाराचा सामान असतो तो ही तुम्ही ठेवू शकता. काही लोक ठेवतात काही लोक नाही ठेवत. तुम्हाला ठेवायचे असेल ठेवू शकत.

नाही ठेवायचे असेल तर ब्लाउजपीस, साडी किंवा तांदूळ, गहू आणि 11 रुपये दक्षिणा ठेवली तरी चालते किंवा एखादे फळ केळी, सफरचंद तुम्ही आणून त्या ओटीमध्ये ठेवू शकता. अशा रीतीने सोप्यारीतीने घरच्या घरी ती ओटी भरू शकता. आणि गुरुवारी भरली तर रात्रभर ती ओटी देवीसमोर राहू द्यायची.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर तुम्ही सगळे देवपूजा करताना आवराआवर केल्यानंतर ती ओटी तुम्ही तिथून उचलायचे आहे. त्या ओटीतला नारळ आपण कधीच खायचा नाही. तर कोणाला तरी दान करायचा म्हणजे तुम्ही मंदिरात दान करू शकता किंवा कोणाला तरी देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करू शकता.

जे तांदूळ आणि गहू आपण टाकले आहे ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा कोणत्याही गरिब व्यक्तीला दान करू शकता. आणि जे साडी आणि ब्लाऊजपीस असेल ते तुम्ही ज्या महिलेने ओटी भरली आहे त्या महिलेने वापरायला घेतले तरी चालते. दक्षिणा आपण सांभाळून कुठेतरी ठेवून द्यायची.

आणि त्या दक्षिणाच्यानंतर तुम्ही देवासाठी काहीतरी सामान विकत घेऊ शकता. अशा रीतीने ती ओटी तुम्ही वापरू शकता आणि बाकी सगळ सामान तुम्ही दान करायचा असतो. तर मित्रांनो नक्की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात देवीचा महिना महालक्ष्मीचा महिना मानला जातो. म्हणून कोणत्याही गुरुवारी देवीची ओटी अवश्य भरावी.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *