नमस्कार मित्रांनो,
नवरात्र सुरू आहे आणि आपण प्रत्येकाच्या घरात घटस्थापना केली असेलच. नवरात्रीतील नऊ दिवस देवीची आपण मनोभावे पूजा करतो. देवीच्या नऊ रूपांना पुजतो.
आपलीही नवरात्रीची पूजा सफल होत आहे का? देवी आपल्यावर प्रसन्न आहे का? हे जाणूनच घ्यायचं असेल तर काही सूक्ष्म संकेत आपल्याला मिळत असतात. काही स्वप्न अशी पडतात किंवा आपल्या समोर असे काही प्राणी किंवा पक्षी येतात.
जर आपण बारकाईने पाहिले आणि हे संकेत समजून घेतले तर आपली नवरात्री ची पूजा सफल झालेली आहे का? माता रानी चा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत आहे का? हे आपण सहजासहजी ओळखू शकता. हे संकेत आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो नवरात्रीचा पहिला सर्वात मोठा संकेत तो म्हणजे नवरात्रीतील नऊ दिवसात अगदी कोणत्याही दिवशी स्वप्नात तुम्हाला घुबड दिसला तर हा माता लक्ष्मीचा तुमच्या घरात आगमन होणार आहे याचा खूप मोठा संकेत आहे.
म्हणूनच माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सुसज्ज व्हा. आपल्या घरादाराची, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करा. सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करा. घरात अखंड दिवा प्रज्वलीत करा. हा संकेत सांगतो की तुमच्या घरात, जीवनात धनसंपदा, पैसा-अडका येणार आहे. तुम्ही जी पूजा करतात ती सफल होत आहे.
घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते. माता लक्ष्मी याच घुबडावर स्वार होऊन संपूर्ण पृथ्वीलोकावर फिरत असते.
दुसरा जो संकेत आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये जर सोळा शृंगार केलेली एखादी महिला जर तुम्हाला दिसली तर लक्षात घ्या ही प्रत्यक्ष माताराणीने तुम्हाला दर्शन दिले आहे आणि मग तुमच्या जीवनात अगदी कोणत्याही प्रकारचे समस्या असेल तर ती लवकरच दूर होणार आहे याचा हा संकेत असतो.
तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे नारळ, हंस पक्षी किंवा कमळाचे फुल हे जर सकाळ सकाळ नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला दिसू लागले तर लक्षात घ्या ही माता आंबे ची तुमच्या वरती कृपादृष्टी आहे. कारण मातेच्या पूजेमध्ये नारळ, कमळ यांना एक विशेष महत्त्व आहे.
हंस हा माता सरस्वतीचे वाहन आहे. या गोष्टी सकाळ सकाळ दिसणे ही सुद्धा तुमची पूजा सफल होत आहे याचे संकेत आहे.
जर घरातून बाहेर पडल्यावर तुम्हाला गोमातेचे म्हणजेच गाईचं जर दर्शन झालं तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. कारण नवरात्रीच्या दिवसात आपल्या घरातून किंवा एखाद्या मंदिरातून बाहेर पडताना गोमातेचे दर्शन होऊन आणि त्यातल्या त्यात सफेद रंगाची गाय दिसणे तुमच्या मनातील एखादी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे याचे संकेत देते.
जर तुम्ही आत्तापर्यंत माते पुढे नतमस्तक होऊन तुमची इच्छा म्हणून दाखवलेली नसेल तर ती बोलून दाखवा. हा संकेत इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे याकडे निर्देश करतो.
नवरात्रीतील पुढील संकेत असा आहे की नवरात्रीतील नऊ दिवसात जर तुम्ही एखाद्या कामानिमित्त बाहेर पडलेले असाल, तुमचा प्रवास सुरू असेल आणि तुमच्या उजव्या हाताला जर तुम्हाला एखादा साप दिसला किंवा जर एखाद्या माकडाचे तुम्हाला दर्शन झालं किंवा स्वप्नात तुम्हाला एखाद्या सफेद रंगाचा साप किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला.
तर हे सर्व संकेत देवीची कृपा तुमच्यावर बरसत आहे याकडे निर्देश करतात. तर मित्रांनो अशा प्रकारचे संकेत नवरात्री मध्ये देवी माते कडून आपल्याला मिळत असतात. याचा योग्य तो अर्थ घेऊन आपण कष्ट, मेहनत, परिश्रम याकडे अधिकाधिक लक्ष पुरवावे.
भक्ती दिवसेंदिवस वाढवत जावे. आपल्या श्रमाचे फळ आपल्याला देवी माता नक्की देईल. धन्यवाद.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.