नमस्कार मित्रांनो,
वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्याच्यातील वस्तुंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याचं जर आपण पालन केलं तर, आपल्या घरी सुख, शांती आणि आनंद नांदेल. काही लोक याच्यावर विश्वास ठेवतात. तर काही लोकं याला मानत नाहीत.
परंतु ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे, त्यांना याचं महत्व माहित आहे. घरात काहीही गोष्टी करताना आपण नेहमी म्हणतो की, काही गोष्टी करण्याचे काही नियम असतात. पण ते का असतात आणि का पाळले जातात. या मागचं कारण आपल्याला ठावूक नसतो.
घराच्या मंदिराबद्दल बरेच नियम आहेत, मंदिराची स्थापना कोणत्या दिशेला आणि कशी करावी, देवाची मूर्ती कोणती असावी आणि ती कुठे ठेवावी, या सर्वांवर वास्तूशास्त्रात सल्ला दिला जातो.
वास्तुशास्त्रानुसार व्यक्ती आपल्या घरात मंदिर सजवतात आणि त्याची पूजा करतात. त्यावेळी लोक मंदिरात दिवा देखील लावतात. परंतु तुम्हाला माहितीय का की, दिवा लावण्याचे काही नियम असतात. जे माहित असणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे.
वास्तूशास्त्राच्या मान्यतेनुसार जर मंदिरात तुपाचा दिवा लावला जात असेल, तर तो देवतेच्या उजव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा भगवंताच्या डाव्या हाताला ठेवणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार जर घरातील मंदिरात शिवलिंग ठेवले जात असेल, तर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मूर्तीही ठेवाव्यात. परंतु मृत पूर्वजांचे फोटो मंदिरात किंवा पूजाघरात लावणे शुभ मानले जात नाही. तसेच मंदिर बेडरूममध्ये न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात ठेवला गेला आहे.
तसेच जर मंदिरात शंख ठेवला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये. असे मानले जाते की, ज्या मंदिरात शंख आहे तिथे लक्ष्मी देवी स्वतः वास करते. तसेच पाण्याचा कलश नेहमी प्लेटमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.