नमस्कार मित्रांनो,
देवपूजा करताना देवाला नैवेद्य अर्पण करणे हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. आपल्या घरात जे काही गोडधोड पदार्थ बनले असतील ते नैवेद्य म्हणून देवीदेवतांना अर्पण करतो ते नसतील, तर साखर असेल, गूळ असेल, साखरफुटाणे असतील विशेष प्रसंगी खीरसुद्धा बनवली जाते किंवा पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. देवीदेवतांना हा नेवैद्य दाखवताना या नेवैद्यासाठी एक छोटेसे ताट असावे, छोटीशी प्लेट असावी.
ज्याप्रमाणे आपण स्वतः आपले सर्व कुटुंब ताटामध्ये अन्न घेऊन खातो, अगदी देवालासुद्धा नेवैद्य ठेवताना त्याठिकाणी एक छोटेसे ताट नक्की असावे. देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट नक्की आवर्जून करा आपण किंवा आपणच नव्हे तर कुटुंबातील प्रत्येकाने या गोष्टीचे पालन केले तर तो जो भोग आपण देवी देवतांना अर्पण करत आहोत, भोग म्हणजे तो नेवैद्य देवीदेवतांनपर्यंत पोहचतो.
त्याचे फळ आपल्याला मिळते. अनेकजण देवाला नैवेद्य अर्पण करताना मीठसुद्धा ठेवतात, तर अशी चूक करू नका. कारण हिंदूधर्म शास्त्रानुसार, देवाच्या नैवेद्य ताटात मीठ कधीही ठेवू नये. तसेच या पदार्थांमध्ये आपण कांदा आणि लसूण यांचा वापर केला आहे. किंवा कांदा व लसूण घालून पदार्थ बनविले आहेत. असे पदार्थसुद्धा भोग म्हणून नैवेद्य म्हणून देवपुजेमध्ये त्याचा वापर कदापिही करू नये.
तुम्ही जर व्रत उपवास करत असाल तर तुम्ही स्वतः कांदा, लसूण या पदार्थापासून दूर राहा. मासांहारीसुद्धा वर्ज्य आहे. कांदा लसूणसुद्धा शक्यतो टाळा. कारण आपण जे वर्त,उपवास करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेची उपासना करण्यासाठी तिच्या मंत्राचा, नामाचा जप करतो. तिची उपासना करताना शरीर सात्विक असणे, मन सात्विक असणे व मनाची एकाग्रता असणे फार महत्त्वाचे असते. तरच त्या व्रतवैकल्याचे फळ आपल्यास प्राप्त होते.
कांदा लसूण जे तामसी पदार्थ आहेत ते वर्ज्य आहेत. मन हे विचलित होते ते एका ठिकाणी स्थिर होत नाही. मित्रांनो, देवीदेवतांना नेवैद्य दाखवल्यावर, अनेकजण तो नेवैद्य लगोलग ग्रहण करतात. लगेच खातात. आपण देवाला आधी नैवेद्य दाखविला आहे की नाही, तो थोडावेळ त्या ठिकाणी तसाच असू द्या. देवीदेवतांना ग्रहण करू द्या. देवपूजा संपन्न झाल्यावर, मग आपण थोडया वेळाने स्वतःहा ग्रहण करा व घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटा, सर्वांना प्रसाद खाण्यास द्यावा. त्यामुळे कुटुंबांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो, कुटुंबांत प्रेम वाढीस लागते. जर तुमच्या घरात सतत कटकटी, भांडणे होत असतील तर हा छोटासा उपाय करून पाहा.
देवपूजेत घंटा वाजविणे हेसुद्धा स्वतंत्र असे त्याचे महत्त्व आहे. देवपूजेत घंटा कोणकोणत्या वेळीस वाजवावी. पूजेमध्ये नेमके घंटा वाजविण्याचे नक्की महत्त्व तरी काय आहे. जेव्हा आपण देवीदेवतांना स्नान घालत आहोत, देवाच्या स्नानाच्यावेळी, धूपदीप दाखवत आहोत, दीप ओवाळीत आहोत, पंचारती ओवाळीत आहेत. त्या त्यावेळी घंटावादन करायला हवे. जी व्यक्ती पंचारती ओवाळताना घंटावादन करते तेव्हा देवपुजेचे संपूर्ण फळ, सर्व वाद्य वाजवल्याचे श्रेय त्या ठिकाणी मिळत असते.
म्हणून देवपुजेत घंटा वाजविणे फार महत्वाचे आहे. अनेकजण म्हणतात आम्ही देवपूजा दररोज करतो पण आम्हाला देव प्रसन्नच होत नाही. कारण तुम्ही कधी तुमची जी आवडती देवीदेवता आहे. तिच्या मंत्राचा जप केलात. तिचे कधी नामस्मरण केलेत का? तर सर्वात जास्त कोणती महत्वाची गोष्ट असेल तर ती आहे नामस्मरण आणि ध्यानधारणा. नामस्मरण आणि ध्यानधारणा ह्या दोन गोष्टी देवाला सर्वाधिक प्रिय आहेत.
आणि म्हणूनच त्यांना देवपूजेत सर्वोच्च स्थान आहे. ध्यानधारणा, नामस्मरण केल्यामुळे मनाचे सामर्थ्य वाढते. मनशांती लाभते. जी तुमची देवता आहे. जर स्वामी समर्थ असतील तर त्यांचा मंत्र जप करा, गजानन महाराज असतील, बाळूमामा असतील, तुमची जी देवता असेल तिचे नामस्मरण करा. तसेच तुम्ही जर माता महालक्ष्मीला मानत असाल, तुमची कुलदेवता जर तुळजाभवानी असेल तर तिचे नामस्मरण, ध्यानधारणा करा तिच्या मंत्राचा जप करून पहा. आत्मबल वाढते. मनाचे सामर्थ्य वाढते. मनशांती लाभते. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी आम्ही देवपूजेच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.
<
देवपूजेची वेळ ही ठराविकच असावी का? दररोज विशिष्ट वेळेतच देवपूजा करायला हवी का? हो. मित्रांनो, देवपुजेस मुहूर्त पाहण्याची गरज नाही. देवपूजा कधीही करू शकता मात्र ज्याप्रकारे आपल्याला आपले जेवण अगदी वेळच्यावेळी लागते. अगदी त्याप्रकारे देवपूजादेखील वेळोवेळी केली तर त्याचे फळ आपणास निश्चितच मिळते. ज्यांना शक्य असेल त्यांनी पहाटे लवकर उठून देवपूजा करा. कारण पहाटे केलेली पूजा ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे हिंदुधर्म शास्त्रामध्ये.
कारण यावेळी आजूबाजूचे वातावरण शांत आणि प्रसन्न असते. आणि ज्या घरात देवीदेवतांचे मंत्र उच्चारताना जे स्वर गुंजतात. आणि तिचा आवाज संपूर्ण वास्तूमध्ये गुंजतो त्या घरात नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. तसेच क्लेश, असमाधान, अशांती, वाद भांडणतंटे या सर्व नकारात्मक गोष्टी निघून जातात. तुम्हाला पहाटे जर देवपूजा करणे शक्य नसेल तर कमीतकमी सकाळच्या प्रसन्नतेवेळी तरी, ही पूजा करायला हवी.
मात्र सकाळी ही पूजा अकरा, बारा वाजता होत असते तेव्हा त्या देवपुजेचे मिळणारे फळसुद्धा तितकेच कमी असते. यात शंका नाही. मित्रांनो, देवपूजा करतांना तिची वेळ निश्चित असावी. तर मित्रांनो, अशाप्रकारे आपण मनोभावे भावपूर्ण देवपूजा व नामस्मरण, प्राथर्ना करून देवतेला नेवेद्य दाखविल्यास त्या देवतेचे तत्त्व आणि चैतन्य त्या अन्नात अधिक प्रमाणात आकृष्ट होते. आणि पुजेमध्ये सफलता प्राप्त होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.