नमस्कार मित्रांनो,
आपण कधी अडचणीत असलो की आपल्याला वाटते आपण तर इतके चांगले वागतो, देवाचे नामस्मरण करतो तरीही दुःखात व अडचणीत देव आपली मदत का करीत नाही?
इतर व्यक्ती मनाप्रमाणे वागतात, कधी देवाचे काहीच करत नाहीत, मंदिरात जात नाहीत तरीही त्यांच्या दुःखाच्या वेळी देव त्यांच्या मागे उभा असतो. पण माझ्यावर जेव्हा दुःख येते त्यावेळी देव माझ्यामागे का उभा राहत नाही?
देव जर सगळे करू शकतात तर मग फक्त एका इशाऱ्यावर माझे जीवन व्यवस्थित का करू शकत नाही? माझ्या जीवनात इतकी संकटे आणि अडचणी असताना देव स्वतः प्रकट होऊन माझ्या जीवनातील अडचणी दूर का करत नाही?
तर आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये दिले आहे. त्या श्लोका बद्दल माहिती घेण्यापूर्वी आपण एक गोष्ट बघूया. या गोष्टीमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
एका मुलाचा जन्म खूप श्रीमंत घरात झाला. त्यांच्या घरात इतके धन होते त्याला काही करायची गरज नव्हती आणि त्याप्रमाणे तो काहीही करत नसे. त्यामुळे तो आळशी झाला होता. फक्त खायचे आणि झोपायचे एवढेच त्याला येत असेल.
त्याचे वडील नेहमी त्याला काम करण्यासाठी सांगत असत. आळशीपणा सोडून काम कर असे त्याला समजावत असत. त्यांचे बोलणे तो मनावर कधीच घेत नसे व काहीच काम करत नसे.
काही काळानंतर त्याचे वडील वारले. त्याची आई आधीच वारली होती. आता त्याला आधार देणारे कोणीच नसल्याने त्याच्या भावांनी त्याला घराबाहेर काढले आणि सांगितले की तू काही हे काम धंदा करीत नाही म्हणून आम्ही तुला आयुष्यभर आयते खायला देणार नाही. तू कुठेही जा पण येते राहू नको.
तो घरातून निघाला आणि चालता-चालता फार दूरवर आला. आता दुपार झाली होती. त्याला भूक जाणवू लागली. तोच त्याला एक आंब्याची बाग दिसली. तेथे भरपूर आंबे त्याला दिसले. तो लगेच बागेत गेला आणि आंबे तोडून खाऊ लागला.
तेथेच एका झाडाखाली त्या बागेचा माळी झोपलेला होता आणि आवाजाने त्याला जाग आली. त्याला आंबे खाताना तो मुलगा दिसला. त्याने दोनच आंबे खाल्ले होते आणि तिचे पोटही भरले नव्हते पण माळ्याला हातात काठी घेऊन येताना आणि तो पळत सुटला.
माळी त्याच्या मागे मागे पळू लागला म्हणून तो आळशी माणूस एका जंगलात पळाला. घनदाट जंगलात तो खूप आत गेला आणि चालून चालून दमलेल्या ने एका झाडाखाली झोपला. तोच त्याला सिंहाची डरकाळी कानावर पडली. तो खूप घाबरला का उठून उभा राहिला आणि पाहतो तर काय सिंह त्याच्याच दिशेने येत होता.
तो खूप घाबरला आणि घाईघाईने झाडावर चढला. त्याने पाहिले की फक्त दोन पाय असलेला कुत्रा त्याला दिसला. तो सरपटत तसाच पुढे येत होता. कुत्र्याला पाहून त्या आळशी माणसाला खूप आश्चर्य वाटलं इतकी हिंस्त्र जनावरे या जंगलात असताना हा कुत्रा इथे राहिला कसा?
तोच सिंह कुत्र्याकडे येताना दिसला. त्याला खूप वाईट वाटले आणि तो मनोमन भगवंताला प्रार्थना करू लागला की देवा, या कुत्र्याला वाचव. तो पळायला सक्षम नाही. काहीही करून याचे रक्षण कर. पण कुत्रा न वापरता तो तिथे तसाच बसून राहिला.
माणसाने पाहिले की सिंहाच्या तोंडात एक मांसाचा तुकडा आहे व तो कुत्र्या कडेच येत आहे. सिंहाने कुत्र्याकडे येऊन तो मांसाचा तुकडा कुत्र्यासमोर टाकला आणि तेथून आल्या पावली निघून गेला. कुत्रा तो माणसाचा टुकडा खाऊ लागला. आळशी माणूस झाडावर बसून ते सगळं पाहत होता.
त्याला खूप आश्चर्य वाटले व आनंदही झाला की देव कोणालाही उपाशी ठेवत नाही. सर्वांना ज्याच्या त्याच्या वाट्याचे अन्न बरोबर मिळते. म्हणून तो त्या झाडाखाली येऊन बसला आपल्याला हि कोणी तरी काहीतरी खायला देईल असा विचार करू लागला. परंतु खूप रात्र झाली मात्र तेथे कोणी आले नाही.
भुकेने तो व्याकूळ झाला आणि असेच पहाट झाली. त्याला रात्रभर झोप काही लागली नाही. सकाळी तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून जवळच आश्रमात राहणारे साधू तिथे आले व त्याला ओरडण्याचे कारण विचारू लागले.
त्याने साधूंना सांगितले की देव सगळ्यांकडे बघतो फक्त माझ्याकडेच बघत नाही. मला किती दुःख आहे, किती अडचणीत आहे याचे त्याला काही वाटत नाही. असे सांगून त्याने सर्व हकिकत साधू महाराजांना सांगितले. माझ्यापेक्षा तो कुत्रा चांगला की त्याचासुद्धा भगवंत विचार करतात पण माझा नाही असं म्हणू लागला.
तेव्हा साधू महाराजांनी आधी त्याला जेवायला दिले सांगितले की भगवंत सर्वांचा विचार करतात. पण ज्याच्या त्याच्या भाग्यानुसार त्याला ते मिळते. तू असा विचार का करत नाही की भगवंताने तूला त्या कुत्र्याच्या रांगेत नाही तर सिंहाच्या रांगेत बसविले आहे.
म्हणजे फक्त घेणाऱ्याचा रांगेत तुला ठेवले असते तर तू लाचार व दिन झाला असतास. देणाऱ्याच्या रांगेत बसविले म्हणून तू स्वाभिमानी आणि आनंदी राहशील. असं तुला वाटत नाही का? देव खरे तर त्याचीच मदत करतात जे स्वतःची मदत स्वतः करतात.
म्हणजेच जे आपल्या कामासाठी दुसऱ्यावर विसंबून राहत नाही. भगवंत नेहमी त्याच्या पाठीशी उभे राहतात. भगवद्गीतेचा तिसऱ्या अध्यायात आठव्या श्लोकात यासंदर्भात श्लोक दिला आहे की कोणतेही कर्म न केल्यापेक्षा कोणते तरी कर्म करणे श्रेष्ठ आहे.
तू जर कर्म केले नाही तर तुझ्या उदरनिर्वाह ही होणार नाही. भगवंत आपल्या भक्तांची मदत जरूर करतात परंतु आपले कर्म आपल्यालाच करावे लागते. अर्जुनाला ही स्वतः रणांगणावर उतरून युद्ध करावे लागले होते म्हणजे संत सुखात व दुःखात दोन्ही वेळेस आपल्या बरोबर असतात पण आपले काम आपल्यालाच करावे लागते.
तेव्हाच त्याचे फळ मिळते. देरे हरी खाटल्यावरी असे म्हणून पोट भरत नाही. हरी देईल पण त्यासाठी आपल्याला आपले हात पाय हलवावेच लागतात. नुसते बसून काहीही होत नाही.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.