नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते. तर कोणासाठी वाईट. कधी कधी आपण म्हणतो माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावे लागते.
तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीतून गरिबिकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळे पुढे कोणाचेही काही चालत नाही. काय परिस्थिती होती यांची व आज कशी वेळ आलेली आहे. अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्यांचे जीवन, बालपण, तरुणपण, म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत.
जी व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते त्यांचे प्रौढपण मजेत जाते. ज्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेलेले असेल ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उतारकाळ कष्टाचा जातो. याला काही अपवादही असतात. पण ते क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो.
त्यांचे बालपण खूप कष्टात आणि दुःखात गेलेले असते. प्रत्येकाला कधी सुख तर कधी दुःख हे पचवावेच लागते. प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात.
जर तुम्ही लक्ष दिले तर या इशाऱ्याना समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणू शकता. या संकेतमुळे तुम्हाला समजते की या पूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आलेला आहे. दुःखाचा व कष्टाचा आता नाश होणार आहे.
कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश व उत्साही वाटते. आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते. आरश्यात तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येते. चेहऱ्यावर लाली पसरलेली दिसते. ते अशा गोष्टीचे संकेत आहेत की तुमची आता चांगली वेळ येणार आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल.
काही व्यक्ती यावर विश्वासही ठेवणार नाहीत. परंतु पशू पक्षी ही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिले दिल्यास ती चांगल्या वेळेची निशाणी आहे. आणि जर एखाद्या माकडाने अचानक आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली सुरू होत आहे.
असा याचा अर्थ होतो. व घरात धनधान्यची बरकत येते. असे समजा की भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे. आता तुम्हाला धन प्राप्ती होईल. हा या गोष्टीचा इशारा आहे की आता तुमचे सर्व चांगलेच होणार. जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.
<
तर समजून जा की तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही सकाळी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलात लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले. तर हे सुद्धा भगवंता द्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे.
जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे. आज ज्या कामात हात टाकाल ते नक्कीच पूर्ण होईल व आपल्याला सफलता मिळेल. हे आहेत चांगली वेळ येण्याचे संकेत.
जर तुमच्याबरोबर असे काही होत असेल तर तुम्हाला आता कोणतीही चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारे देत आहेत. की तुमचे आता चांगलेच होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.