नमस्कार मित्रांनो,
आज आपण बघणार आहोत आषाढी अमावस्या. म्हणजेच दीप अमावस्या बद्दल थोडी माहिती. दीप अमावस्या का, कधी आणि कशी साजरी करायची याबद्दल थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहे.
दीप हा मांगल्याचं प्रतीक. दीप हा त्यागाचा सूचक दीप हा अंधाराचा नाशक. मग सूर्य मावळल्यानंतर उजळत येणारा कंदील असो, तुळशी समोर लावली जाणारी पण ते असो, देवाला ओवाळनारी पंचारती असो,
सभेच्या सुरुवातीला लावला जाणारा सभा दीपक म्हणजेच समय असो किंवा निरंतर तेवत राहणारा नंदादीप असो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दिवा आपल्याला प्रकाश देत असतो.
त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्व आहे आणि याच दिव्याची कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केली जाते. दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते.
श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असतो. त्यानंतर गौरी गणपती, दसरा, दिवाळी हे सर्व सण ओळीने येत असतात आणि या सर्व सणांसाठी आपल्याला विविध दिव्यांची आवश्यकता असते.
त्यामुळे दीप अमावस्याच्या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते. घरातील लहान मुलगा जो आपला कुलदीपक आहे किंवा मुलगी जी आपल्या कुळाची पणती आहे. त्यांचेसुद्धा या दिवशी औक्षण केले जाते आणि
गुळ आणि कणकेचे दिवे बनवून त्याचा नैवेद्य दिला जातो. कणकेचे दिवे बनवण्यासाठी गव्हाचे जाडसर पीठ एक वाटी, गूळ अर्धी वाटी चमचाभर तूप, चिमुटभर मीठ, चिमुटभर वेलचीपूड हे साहित्य घेऊन दिवे बनवावे.
एका पातेल्यामध्ये गुळ व पाणी मिक्स करून घेणे. कणकेमध्ये मध्ये गुळाचे पाणी घालुन घट्टसर मळून घ्यावे. त्याचे सारखे पाच किंवा अकरा दिवे बनवावे. सर्व दिवे तयार झाल्यावर वाफवून घ्यावे. दिवे थंड झाल्यावरथंड झाल्यावर त्यामध्ये तुपाच्या वाती लावून घेणे.
दीपपूजा कशी करावी दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातील सर्व पणत्या, दिवे, समया, नंदादीप, कंदीलअसेल तो सुद्धा स्वच्छ करून घ्यावा. पाटावर लाल कापड घालून ते व्यवस्थित मांडून घ्यावे. आणि हळद कुंकू अक्षत आणि फुले ठेवून त्याची मनो भावे पूजा करून घ्यावी.
आपण केलेले कणकेचे दिवे इथे ठेवून घ्यावे. आणि त्यामध्ये तूप वातीलावून घ्याव्यात. नंतर दिवे लावून घ्यावेत. आणि दिव्यांना प्रार्थना करायची आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम् धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते.
हे दिव्या माझ्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदू दे घरातील सर्व व्यक्तींना आयुर आरोग्य लाभू दे. सर्वांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसू दे. अशी प्रार्थना आज या दिव्याला करावी. त्यानंतर कणकेचे जे हे दिवे आहेत ते प्रसाद म्हणून ग्रहण करावेत.
तुम्हाला आवडत असेल तर थोड तूप किंवा दूध घालून तुम्ही खाऊ शकता. आपल्या सर्व प्रथा परंपरांची माहिती आपल्या भावी पिढीला माहिती असावी म्हणून आपण सर्व सण आवर्जून साजरे करायला हवेत. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.