18 डिसेंबर शनिवार दत्त जयंती फक्त 3 वेळा बोला हा सिद्ध मंत्र बाधा, अडचणी, संकटे संपतील.

नमस्कार मित्रांनो,

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 18 डिसेंबर शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे श्री दत्त जयंती. मित्रांनो या दिवशी भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास मनुष्याला बुद्धी, ज्ञान आणि बलाची प्राप्ती होते. शत्रु बाधा सुद्धा नक्की दुर होतात. या दिवशी भगवान दत्तात्रेयांचे काही मंत्र आपण नक्की बोलावेत.

या मंत्रांचा जप या मंत्रांची साधना आपण नक्की करावी. आपल्या घरात जर स्पटिकांची माळ असेल तर या स्फटिकांच्या माळेवर या दत्तात्रेयांच्या मंत्रांचा जप केल्यास जीवनातील मोठ्यात मोठ्या बाधा, अडचणी नक्की दूर होतात. मित्रांनो दत्त भगवान आपल्या भक्तांवर आलेली कोणतीही संकटे तात्काळ शीघ्ररित्या दूर करतात.

आणि म्हणूनच या दत्त जयंतीपासून या मंत्रांचा जप करण्यास सुरुवात करा आणि मग प्रत्येक गुरुवारी प्रत्येक पौर्णिमेस आपण या मंत्रांचा करा. मित्रांनो या मंत्रांचा जप इतका प्रभावशाली आहे की, मनुष्य जीवनातील मोठ्यात मोठे कष्ट खूप लवकर याने दूर होतात.

हे मंत्र काही असे आहेत. या मंत्रांचा आपण कमीतकमी प्रत्येक मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळा जप आपण अवश्य करा आणि जी अनुभूती तुम्हाला येईल जे अनुभव येतील ते याठिकाणी कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो भगवान दत्तात्रेयांचा पहिला महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

दुसरा तंत्रोक्त दत्तात्रेय मंत्र आहे जो तंत्र शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावशाली आहे. ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: दत्तात्रेयाय नमः आणि तिसरा दत्त गायत्री मंत्र ॐ दिगंबराय विद्महे योगीश्रारय् धीमही तन्नो दत्त: प्रचोदयात, ॐ दिगंबराय विद्महे योगीश्रारय् धीमही तन्नो दत्त: प्रचोदयात.

मित्रांनो या मंत्रांचा प्रभाव इतका प्रचंड आहे की, आपले जीवनात जर पितृदोष असतील पितृदोष म्हणजे काय तर आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे असे लोक मृत्यूपश्चात पितृलोकी जातात. त्यांच्या आत्म्यास जर शांती लाभली नसेल,

किंवा आपल्या हातून काही अशा चुका कळत नकळत घडलेल्या असतील की, त्यामुळे आपले पित्र जर प्रसन्न नसतील तर हा पितृदोष सुद्धा या मंत्राच्या प्रभावाने तात्काळ दूर होतो. पितृ देवतेची कृपा प्राप्त होते आणि जीवन सुखी संपन्न बनते मित्रांनो दत्त जयंतीच्या आपणास सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.