दातांच्या पिवळेपणामुळे हैराण आहात? ‘या’ 5 घरगुती उपायांनी मिळेल सुटका

नमस्कार मित्रांनो,

आपण अनेकदा शरीराच्या सर्व भागांच्या सौंदर्याची काळजी घेतो, परंतु दात पिवळे पडण्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. दातांमध्ये पिवळेपणा असल्यास अनेकवेळा लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. जरी आपण दररोज ब्रशने स्वच्छ करतो,

परंतु तरीही अनेकदा आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. आज आपण असे 5 घरगुती उपाय जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज चमकदार तर होतीलच, पण डेंटल क्लिनिकचा खर्चही वाचेल. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी 5 घरगुती उपाय :

आले –
आल्याचे छोटे तुकडे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करा आणि नंतर त्यात पाव चमचा मीठ मिसळा. त्यात लिंबाचा रसही मिसळा. तिन्ही गोष्टींचे मिश्रण टूथब्रशने दातांवर घासा.

कडुलिंबाची पाने –
कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहीत आहेत. कडुलिंबाची पाने एका भांड्यात घेऊन ती गरम पाण्यात उकळवा, नंतर हे पाणी फिल्टर करून थंड होऊ द्या. आता या पाण्याने गुळण्या करा. कडुलिंबाच्या काडवाटपणामुळे तोंड आणि दातांमध्ये असलेले जंतू नष्ट होतात.

एप्सम मीठ –
एप्सम सॉल्टला मॅग्नेशियम सल्फेट देखील म्हणतात. हे मीठ आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशने दातांवर घासून नंतर तोंड धुवा.

कोको पावडर –
कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट ब्रशवर लावून दात स्वच्छ करा. या मिश्रणाच्या वापराने दातांची चमक पुन्हा येईल.

पुदिन्याची पाने –
पुदिना खूप गुणकारी मानला जातो. पुदिन्याची 3 ते 4 पाने बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशवर लावा आणि दातांना चोळा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *