चंद्रग्रहणाच्या वेळी घ्या ‘ही’ खबरदारी, त्याच्या प्रभावापासून मिळेल मुक्ती

नमस्कार मित्रांनो,

2022 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan) 8 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. सूर्यग्रहणाच्या 15 दिवसानंतर म्हणजे देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण लागणार आहे. 2022 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी लागलं होतं. 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आहे. त्या दिवशीच हे ग्रहण लागणार आहे. वर्षातलं हे शेवटचं अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.

चंद्रग्रहणाची वेळ आणि सुतक काळ

2022 वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारताच्या वेळेनुसार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:32 ते संध्याकाळी 7:27 पर्यंत असेल, जे भारतात देखील दिसेल. 8 नोव्हेंबर रोजी, हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी 5.32 वाजता दिसेल आणि संध्याकाळी 6.18 वाजता संपेल. त्याचा सुतक काळ भारतात वैध असेल. या चंद्रग्रहणाच्या काळात ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक विध्वंसक योग तयार होतील, ज्याचा देशावर तसेच राशींवर अशुभ प्रभाव पडेल. ग्रहण काळात ही खबरदारी घेतल्यास तुम्ही त्याच्या प्रभावापासून मुक्त व्हाल. यापूर्वी दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण (Surya Grahan) लागलं होतं.

चंद्रग्रहणाच्या वेळी घ्या ‘ही’ खबरदारी

ग्रहणकाळात खाण्यापिण्याचे पदार्थ खाऊ नका, अन्न शिजवू नका.

ग्रहणाच्या काही वेळ आधी अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकावीत. असे केल्याने चंद्रग्रहणाचा परिणाम होणार नाही, असे मानले जाते.

ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातून किंवा खोलीतून बाहेर पडू नये. असे मानले जाते की ग्रहण काळात बाहेर जाण्याने मुलामध्ये शारीरिक व्यंग येते.

ग्रहण काळात आपल्या इष्ट देवतेशी संबंधित मंत्रांचा जप करा आणि देवाच्या मूर्तीला घरात किंवा मंदिरातील पूजास्थळी स्नान केल्याशिवाय स्पर्श करू नका.

ग्रहणानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडावे.

धार्मिक आख्यायिका काय?

समुद्रमंथनाच्या वेळी भगवान श्री हरी विष्णूजींनी अमृत मिळविण्यासाठी राहू-केतू यांचा वध केला होता. त्यावेळी राहू आणि केतू चंद्र आणि पृथ्वीच्या सावलीत स्थान देण्यात आले होते, अशी धार्मिक आख्यायिका आहे,

ग्रहणकाळात ‘या’ मंत्राचा जप करावा

राहु-केतूच्या वाईट दृष्टीमुळे व्यक्तीच्या जीवनात अस्थिरता येते असे शास्त्रात सांगितले आहे. यासाठी ग्रहणकाळात राहू आणि केतूचा प्रभाव टाळण्यासाठी मंत्राचा जप करावा. धार्मिक पंडितांच्या मते ग्रहण काळात तुळशीच्या पानांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

ॐ ह्लीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय

जिह्ववां कीलय बुद्धि विनाशय ह्लीं ओम् स्वाहा।।

सॊजन्य – a.b.p. माझा

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *