हेल्दी शरीरात कॅन्सरला जन्म देतात ‘या’ 5 गोष्टी, माहित असूनही लोक सोडत नाहीत 2 नंबरची अतिभयंकर सवय

नमस्कार मित्रांनो,

कॅन्सरचं नाव ऐकलं की, मन खूप घाबरून जातं. मनात असंख्य नको नको ते विचार येऊ लागतात. हा एक असा रोग आहे ज्याचा काहीच इलाज नाही, म्हणूनच माणूस खूप लवकर हार मानतो. रोग जसजसा वाढत जातो तसतशी रुग्णाची जगण्याची इच्छा कमी होत जाते.

पण आजकाल आपल्या आजूबाजूच्या इतक्या लोकांना कॅन्सर का होत आहे याचा कधी विचार केला आहे का? जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं तेव्हापासून मलेरिया, कावीळ, हार्ट अटॅक अशा आजारांबद्दलच ऐकले होते.

कर्करोग हा नेहमीच एक असा आजार मानला जात होता, जो अनेकांपैकी फक्त काही लोकांना किंवा एक-दोन लोकांनाच होत असे. पण आज खरोखरच कॅन्सरच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत भारतात कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

पण आपल्या सामान्य शरीरात कर्करोगाच्या पेशी कशा अॅक्टिवेट होतात आणि शरीरात अचानक कर्करोगाच्या पेशी का व कुठून निर्माण होतात याचे कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

कॅन्सरची कारणे
कर्करोग हा अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही कारणांमुळे होतो. आंतरिक घटकांमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तन म्हणजेच जेनेरिक म्युटेशन, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत स्थिती, ओवर अॅक्टिव्हेशन आणि बाह्य घटकांमध्ये धूम्रपान, मद्यपान व व्हायरल इनफेक्शन यांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकट्याने किंवा एकत्र येऊन सामान्य पेशींना गंभीर बनवतात.

कर्करोगाचा धोका वाढणारे घटक
डॉक्टरांना चांगल्या प्रकारे माहित असते की कोणत्या गोष्टींमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो, परंतु बहुतेक कर्करोगाचे प्रकार हे अशाच लोकांमध्ये दिसून येतात ज्यांच्या शरीरात कोणतेही धोका वाढवणारे घटक नसतात. कर्करोगाचा धोका वाढवण्यासाठी खाली दिलेले घटक जबाबदार आहेत

आपले वय
कॅन्सर शरीरात डेव्हलप होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की कर्करोगाने पीडित बहुतेक लोकांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असते. वृद्ध लोकांमध्ये हे सामान्य आहे. कर्करोग हा केवळ वृद्ध लोकांना होणाराच आजार नाहीये. तर तो कोणत्याही वयात होऊ शकतो. एवढंच की तो पूर्णपणे डेव्हलप होण्यासाठी बराच काळ जातो.

वाईट सवय
कॅन्सरचा धोका वाढवण्यासाठी जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. दिवसातून एक किंवा अधिक वेळा दारूचे सेवन करणे, सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात येणे, वाढलेला लठ्ठपणा आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

कौटुंबिक इतिहास
कौटुंबिक इतिहास हा देखील कर्करोगाचे एक लहान कारण आहे. जर तुमच्या कुटुंबात कॅन्सर सामान्य असेल तर पुढच्या पिढीलाही याचा धोका असतो. लक्षात ठेवा की अनुवांशिक उत्परिवर्तनाचा किंवा जेनेरिक म्युटेशनचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्हाला कर्करोग 100 टक्के होणारच आहे.

मेडिकल कंडिशन
अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या काही जुनाट आजारांमुळे तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला या आजारांनी ग्रासले असेल, तर तुम्ही सतर्क राहावे आणि काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

वातावरण
तुमच्या सभोवतालच्या वातावरणात हानिकारक रसायने असू शकतात, जी कर्करोगाचा धोका वाढवण्यासाठी जबाबदार ठरतात. तुम्ही धुम्रपान करत नसलात तरी तुम्ही अशा ठिकाणी बसलाय जिथे लोक धूम्रपान करतायत तर यामुळे तुम्हालाही कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *