नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा; बाळू मामाच्या नावाने चांग भल!! आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी इच्छा नक्की असते. जसं की माझं स्वतःचं घर असावं, मला नवीन गाडी असावी, बंगला असावा, मला चांगली नोकरी असावी माझं लग्न व्हावं.
अगदी कोणत्याही प्रकारची इच्छा आपली असू शकते किंवा माझ्या मुलाला नोकरी असावी असं अनेकांना वाटतं. विवाहासाठी चांगलं स्थळ यावं. तर मित्रांनो अशी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक आपण कॅलेंडरचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्याला चालू कॅलेंडर घ्यायचं आहे.
आता 2022 साल सुरू आहे तर आपण 2022 चे कॅलेंडर घेणार आहोत. पुढे म्हणजे 2023 मध्ये 2024 मध्ये पाहत असाल, तर त्या त्या सालच कॅलेंडर आपण घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे कॅलेंडर घेतल्या नंतर तुम्हाला ह्या कॅलेंडरमधील जे बारा महिने आहेत. जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत या कोणत्या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होईल.
अस मनापासून वाटत असेल, तो महिना आपण निवडायचा आहे. आणि त्या महिन्याकडे आपण अगदी काळजी पूर्वक पहायचं आहे. त्या महिन्यामध्ये एकुण अठ्ठावीस, तीस, एकतीस जितके काही दिवस आहेत तारखांकडे व्यवस्थित निरखून पहायचं आहे. आणि ज्या तारखेला जी तारीख तुम्हाला स्वतः कडे आकर्षित करते ती तारीख आपण निश्चित करायची आहे.
उदा.- जर तुमचं स्वतःच घर बनायचं आहे. तुम्हाला एखाद नवीन वाहन खरेदी करायचं आहे. तर तुम्हाला अस वाटत आहे की? गुढीपाव्याच्या दिवशी घरामध्ये नवीन कार यायला हवी तर गुढीपाडव्याची तारीख तुम्हाला आकर्षित करू शकते.
दसऱ्याच्या दिवशी तुमचं नवीन वाहन यायला हवं, किंवा धनत्रयोदशी असते किंवा दिवाळीमध्ये तुम्हाला तुमचं नवीन वाहन हवं असेल बारा महिन्यातील एखादी तारीख तुम्हाला आकर्षित करते आणि त्या महिण्याकडे आपण व्यवस्थित निरखून पहायचं आहे. त्या महिन्यातील जी तारीख तुम्हाला आकर्षित करते त्या तारखेभोवती कोणत्याही पेनाने शक्यतो काळा पेन घेवू नका.
लाल, हिरवा किंवा निळा देखील चालेल तर कोणत्याही पेनाने त्या तारखेला गोल करायचा आहे. मित्रांनो हा गोल केल्यानंतर तुमची जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा त्या गोलाच्या आतमध्ये आपण त्याचं पेनाने लिहायची आहे. आणि अशी ही इच्छा त्याठिकाणी लिहिल्यानंतर आता ती इच्छा वर्तमान काळात लिहायची जणू काही ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे.
माझी नवी गाडी नवी कार घरी आलेली आहे. किंवा मी विकत घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा लिहायची आहे. तर घराचं स्वप्न आहे नवीन घर तयार झालेलं आहे. आपण आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं वाक्य आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे.
<
मित्रांनो संपूर्ण वर्षभरात इच्छा लिहून झालेली आहे आपली!! ती तारीख व महिना निवडण्यापूर्वी आपल्या कुलदैवतेच स्मरण करायला विसरू नका किंवा ज्यांना तुम्ही गुरू मानता त्याच स्मरण आपल्याला केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण हा उपाय प्रारंभ करायचा आणि एकदा ते गोल काढल.
आपली इच्छा तिथे लिहली की त्या नंतर चालू तारखेला सेट करायचं आहे. अधून मधून जेव्हा तुम्हाला आठवेल का आपण टार्गेट सेट केलेल आहे धेय्य निश्चित केलेल आहे. त्याकडे पाहा. मनामध्ये अशी कल्पना करा की हे आपण पूर्ण करणारच आहोत त्या तारखेला हा आत्मविश्वास फारच महत्वाचा आहे.
पुन्हा एकदा सांगत आहोत की त्या कॅलेंडर कडे एकाग्रतेने पाहणे फार महत्त्वाचे आहे. अगदी ज्या महिन्यात तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करणार आहात. त्या महिन्यातील सर्व तारखांकडे निरखून पहाणे आणि की तारीख तुम्हाला आकर्षित करते. जी तारीख तुम्हाला आकर्षित करते त्याठिकाणी आपल्याला गोल करायच आहे.
हे मात्र लक्षात ठेवा. हे सर्व करताना मन शांत असणं फार महत्त्वाचे आहे. मध्ये मध्ये डिस्टर्ब होऊ नये. मित्रांनो अत्यंत साधा आणि सोपा असा हा उपाय आहे. तुमची ही मनोकामना पूर्ण होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.