नमस्कार मित्रांनो,
तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही? उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत आहे का? पैसा घरात आला की लगेच निघून जातोय? उत्पन्नच खूप कमी झाले आहे? तर अजिबात घाबरू नका. कारण जेथे अपाय आहेत तेथे उपाय आहेत. जेथे अडचण तेथे समाधान.
जीवनात सर्व बाबतीत सुखी असा मनुष्य असूच शकत नाही. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतातच. या अडचणींना अगदी साधे व सोपे उपाय करून आपण दूर करू शकतो.
मित्रांनो, आज आपण जे काही उपाय पाहणार आहोत ते तुम्ही बुधवारी करू शकता. सप्ताहातील बुधवार हा श्री गणेशांचा वार म्हटला जातो आणि श्रीगणेशांना सर्व दुःखाचे निवारण करणारे मंगलमुर्ती म्हटले जाते.
हिंदू धर्मात सर्व पूजेमध्ये सर्वात आधी पहिला मान श्री गणेश यांना आहे. श्री गणेश यांना भौतिक, दैविक अध्यात्मिक याच्या पूर्ततेसाठी सर्वात आधी पूजले जाते. म्हणूनच यांना मंगलमूर्ती म्हटले जाते.
बुधवारी जर श्री गणेश यांचे विधिवत व श्रद्धा भावनेने पूजन केले तर सर्व प्रकारच्या इच्छा व मनोकामना यांची पूर्ती होते. तसेच आपल्या कुंडलीत बुध ग्रह जर अशुभ स्थितीत असेल तर बुधवारच्या पूजनाने तो ग्रह ही शांत होतो.
चला तर पाहुयात बुधवारी श्रीगणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोण कोणते उपाय करावे. ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी व दुःख यान पासून आपली सुटका होईल.
जर तुमच्या घरात खुप निगेटिव्ह ऊर्जा भरलेली आहे. तुम्ही त्यासाठी कितीतरी उपाय केले परंतु त्याचा काहीही उपयोग होत नसेल तर बुधवारी आपल्या घरात श्रीगणेशाची पांढऱ्या रंगाची मूर्ती आणून तिची स्थापना करावी.
असे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व इतर वाईट ऊर्जा, वाईट शक्तींचा ही आपल्या घरावर प्रभाव पडणार नाही. नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडल्याने आपली जी कामे अडून पडली होती ती व्यवस्थित मार्गी लागतील.
जर कितीही कष्ट करून तुम्हाला तुमचे समाधान होईपर्यंत उत्पन्न मिळत नसेल तर बुधवारी गणपती बाप्पांचे विधिवत पूजन करून गुळ व तुपाचा नैवेद्य ठेवावा. पूजन झाल्यानंतर ते गुळ व तूप गाईला खायला घालावे.यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
जर तुमच्या घरात नेहमी वाद-विवाद व भांडणे होत असतील ज्यामुळे घरातील वातावरण अशांत होऊन सुख व शांतता लाभत नसेल तर बुधवारी श्री गणेश यांचे दुर्वांची प्रतीकात्मक मूर्ती बनवावी व ती आपल्या देवघरात स्थापित करावी आणि दररोज या दुर्वा गणेशाचे विधीवत पुजन करावे.
यामुळे तुमच्या घरातील भांडण तंटे, वाद-विवाद थांबून घरात शांततेचे वातावरण निर्माण होईल व सुख शांतता लाभेल.
जर तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असतील, प्रत्येक कामात अडथळा येत असेल व काही केल्या अडचणी कमीच होत नसतील तर बुधवारी एखाद्या हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा.
आणि गणपती मंदिरात जाऊन श्रीगणेशांना आपल्या अडचणी सांगून त्या निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी. प्रयत्न करावा हिरवा चारा हत्तीलाच द्यावा परंतु जर हत्ती नसेल तर गाईलाही तुम्ही हा चारा देऊ शकता. यानंतर थोड्याच दिवसात तुमच्या जीवनातील अडचणी दूर झालेले असतील.
बुधवारी सकाळी स्नान झाल्यानंतर एका कास्याच्या ताटात चंदनाच्या लेपाने ओम गं गणपतये नमः हा मंत्र लिहावा आणि त्याच्यावर पाच बुंदीचे लाडू ठेवावेत व ते ताट गणपती मंदिरात दान करावे. या उपायांमुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते.
बुधवारी स्नान वगैरे कामातून निवृत्त होऊन जवळ असलेल्या गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना 21 गुळाच्या छोट्या-छोट्या ढेल्या अर्पण कराव्यात व त्यांच्यावर दुर्वा ठेवाव्यात. त्यानंतर गूळ व तूप घेऊन गाईला खायला द्यावे.हा उपाय केल्याने धन संबंधित अडचणींचे समाधान होते.
जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर श्री गणेश यांना गुळ व शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने लवकरात लवकर लाभ होतो.
शास्त्रांमध्ये श्री गणेशांचा अभिषेक करण्याचा विधी सांगितलेला आहे. बुधवारी त्यांचा अभिषेक केल्यास विशेष लाभ आपल्याला होतो व अभिषेक शुद्ध पाण्याने करावा. आज बरोबर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.यानंतर माव्याचे लाडू प्रसादाला ठेवून तो प्रसाद वाटून द्यावा.
बुधवारी एखाद्या गणपती मंदिरात जाऊन जे आपल्याला शक्य आहेत अशा वस्तू कराव्यात. दान केल्याने आपल्या पुण्यात वाढ होते व श्रीगणेशाची कृपा आपल्यावर होऊन ते प्रसन्न होतात.
जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर या दिवशी पूजन केल्यास बुध ग्रह शांत होतो व श्री गणेश हे सर्व दुःखांचे हरण करणारे आहेत म्हणूनच त्यांना दुःखहर्ता असे म्हटले जाते.
जर श्रीगणेश आपल्यावर प्रसन्न झाले तर ते आपल्या सर्व इच्छा व मनोकामना यांची पूर्ती करतात. प्रत्येक पूजेत सर्वात आधी श्रीगणेशाचे पूजन केले जाते. हे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी दूर होऊन तुम्हाला सुख शांती लाभेल.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.