भोगी का आणि कशी साजरी करावी?

नमस्कार मित्रांनो,

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणार सण आहे. या दिवसात शेतामध्ये धन धान्य बहरलेलं असतं. त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो.

या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढविणाऱ्या घटकांचा त्यामध्ये समावेश असतो. मित्रांनो भोगी हा इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीच्या मध्यानात येतो. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करत असताना आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण समजला जातो. पण भोगी या शब्दाचा आणखीही दुसरा अर्थ आहे.

जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला सुद्धा भोग म्हणतात. त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून देवाला नैवेद्यही दाखवला जातो आणि खास करून सवासिनीला जेवायला बोलावले जात. पण तसं करणं शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा करून सुवासिनीच्या घरी पोहोचविला जातो याला सुद्धा भोगी म्हणतात.

या दिवशी सकाळी आपले घर स्वच्छ करायचं असतं. सभावतालचाही परिसरही स्वच्छ करायचा असतो. दरवाजासमोर रांगोळी काढायचे. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवनवीन अलंकार धारण करतात.

सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. मित्रांनो या दिवशी इंद्र देवतेने आपल्या शेतजमिनीमध्ये उदंड पिक पिकवावी म्हणून त्याची प्रार्थना केली जाते अशीही मान्यता आहे.

ती पिक वर्षानुवर्षे पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती सुद्धा दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा तरी विसावा मिळतो.

मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तेलमिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार प्रेमाचा अनुभव घेतो. त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यासाठी तो सज्ज होतो. मराठवाड्यात या भाजीला खेंगट अस म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते.

या सणाला भारतभर वेगवेगळी नाव सुद्धा आहेत. म्हणजे तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा होतो. तर आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोहिरी आणि राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.

नवा बदल केला जातो म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची असते. या भोगीच्या सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. खास करून या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी करतात.

या भोगीच्या भाजीमध्ये हरभरा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर इत्यादी भाज्या घातल्या जातात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्याच्यावर मस्त लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते.

त्यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याची पद्धत वेगवेगळ्या भागात वेगळी आहे. अशा प्रकारे सण साजरा केला जातो. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहवा अश्या शुभेच्छा दिल्या जातात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *