उद्या चुकून सुद्धा या वेळेत बांधू नका राखी… स्वतःच्या हाताने गरिबी ओढवून घ्याल…

नमस्कार मित्रांनो,

उद्या रविवार 22 ऑगस्ट 2021 रोजी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन चा सण साजरा केला जाईल. हिंदू कॅलेंडर नुसार राखी चा हा पवित्र सण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो.

राखीचा हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण आहे. या पौर्णिमा तिथीला राखी पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधून हा सण साजरा करतात.

प्रत्येक राखी पौर्णिमेला भद्र काळाची विशेष अशी काळजी घेतली जाते. पुराण कथांनुसार भद्र काळामध्ये राखी का बांधू नये याची एक कथा आहे. लंका पती रावणाने भद्रामध्ये आपल्या बहिणी कडून राखी बांधून घेतली होती.

आणि भद्र काळात राखी बांधून घेतल्यामुळे रावणाचे साम्राज्य नष्ट झाले. मित्रांनो याच कथेच्या मान्यते नुसार जेव्हा जेव्हा भद्र काळ असतो त्या वेळी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत नाहीत. त्याचबरोबर भगवान शिव हे भद्र काळात तांडव नृत्य करतात. आणि या कारणाने सुद्धा भद्र काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधताना, भद्र काळ आणि राहु काळावर खूप लक्ष दिले जाते. हिंदू धर्म शास्त्रानुसार भद्र काळा मध्ये राखी बांधणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र काळाकडे विशेष असे लक्ष दिले जाते. असं म्हटलं जातं की भद्र काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास त्यात यश मिळत नाही.

मित्रांनो पौराणिक मान्यते नुसार भद्रा ही भगवान शनी देवांची बहीण आहे. भद्रा हि सुद्धा शनी देवां सारखीच तापट स्वभावाची आहे. ब्रह्म देवांनी भद्राला असा श्रा प दिला होता की जी व्यक्ती भद्र काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करेल तर त्या कार्यात कधीच यश मिळणार नाही.

भद्र काळा प्रमाणेच राहू काळात सुद्धा कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू नये. रक्षा बंधन हे नेहमी भद्रा मुक्त काळात करावे असं सांगितलं आहे.

मित्रांनो यावेळी भगवान शनिदेवांची बहीण भद्रा ही संपूर्ण दिवस राहणार नाही. उद्या संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांच्या आत रक्षाबंधनचा सण साजरा करावा. राहू काळ सुरू होण्याच्या आधी राखी बांधावी. उद्या दुपारी 12 ते 1 वाजे पर्यंत चा मुहूर्त हा राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम आहे.

भद्रकाळासोबतच राहूकाळ असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे भद्राबरोबर राहुकाळाची विशेष काळजी घ्यावी. उद्या 22 ऑगस्ट 2021 रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळाची वेळ संध्याकाळी 05:12 ते संध्याकाळी 06:49 पर्यंत असणार आहे. या काळात विशेष काळजी घ्यावी.

शुभ मुहूर्तावर किंवा भद्र काळ विरहित वेळेत आपल्या भावाच्या हातावर राखी बांधल्याने भावाला यश आणि विजय मिळतो. या दिवशी चंद्र कुंभ राशीत संक्रमण करेल आणि हा सण सर्व बंधू -भगिनींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

मित्रानो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा.

अशीच महत्वपूर्ण माहिती रोज मिळवण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *