नमस्कार मित्रांनो,
रविवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बेंबीवर बोट ठेऊन हा एक मंत्र अवश्य म्हणा. या मंत्राच्या प्रभावाने तुमचं व्यक्तिमत्त्व इतकं आकर्षक बनेल, प्रभावी बनेल की लोक तुमच्याकडे आकृष्ट होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा समाजात नक्की उमटेल. मित्रांनो या सोबतच धन, संपत्ती, ऐश्वर्य तुमच्या पायाशी लोळण घेऊ लागेल.
रविवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय कोणता करायचा, कसा करायचा, त्या उपाया मुळे होणारे लाभ या सर्वांबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपण हा उपाय करण्यापूर्वी आपले हात, पाय, तोंड स्वच्छ धुवावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी स्नान करून हा उपाय करावा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. मित्रांनो कोणताही उपाय करताना स्वच्छता, पवित्रता अत्यंत महत्वाची असते. त्यानंतर झोपायला जाण्यापूर्वी एका छोट्या वाटीत थोडी हळद आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो त्या हळदी मध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे.
मित्रांनो आपण हळकुंड घेऊन ते घासून सुद्धा त्याची हळद वापरू शकता. अशा प्रकारे हळकुंड घासून बनवलेली हळद कोणत्याही प्रकारचे उपाय करताना अत्यंत लाभदायक ठरते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर हळकुंड घेऊन त्या पासून तुम्ही हळद बनवू शकता.
अशा प्रकारे हळदीचा घोळ बनवल्यानंतर आपण आपल्या बेंबीवर जे बोट ठेवणार आहोत, त्यासाठी आपण आपल्या करंगळी जवळचे बोट वापरायचे आहे.
आपल्या उजव्या हाताचे, करंगळी जवळचे बोट, ज्याला अनामिका असं म्हणतात हे बोट आपल्याला वापरायचं आहे. मित्रांनो अनामिका हे जे बोट आहे या बोटाखाली सूर्याचे क्षेत्र आहे. आपण सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या कुंडली मध्ये असलेल्या सूर्याला मजबूत करण्यासाठी या अनामिका चा वापर करणार आहोत.
मित्रांनो ज्या व्यक्तींच्या कुंडली मध्ये असलेला सूर्य मजबूत बनतो, सूर्य उच्च स्थानी असतो, त्या व्यक्ती समाजात उच्च स्थानी राहतात, नेतृत्व करतात. त्या व्यक्ती त्यांच्या त्यांच्या कार्य क्षेत्रात नेतृत्व करतात. अशा व्यक्तींना समाजात, मान सन्मान, प्रतिष्ठा, पैसा इत्यादी गोष्टी अगदी सहज मिळतात. एक अत्यंत ताकतवान, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून या व्यक्ती समाजात वावरू लागतात. धन, ऐश्वर्य, संपत्ती या लोकांच्या पायाशी लोळण घेताना आपल्याला दिसून येते.
मित्रांनो आजचा आपला उपाय इतका प्रभावशाली आहे की त्यामुळे तुमचा सूर्य मजबूत बनेल, तुमचं व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक बनेल, तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुमचा ठसा उमटेल. आपल्या करंगळी च्या बाजूचे जे बोट आहे ते वाटीत घेतलेल्या हळदी मध्ये बुडवायचं आहे. त्यानंतर बेड वर झोपून या बोटाने आपल्या बेंबीला स्पर्श करायचा आहे. या हळदीच्या बोटाने आपल्याला आपल्या बेंबीला स्पर्श करायचा आहे.
मित्रांनो बेंबीचे म्हणजेच नाभीचे अंकशास्त्र, ज्योतिष शास्त्र आणि हस्तरेषा शास्त्रात खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे. आपली आणि आपल्या आईची नाळ या नाभी मार्फत जोडलेली असते. नाभीला कोणत्याही पदार्थांचा स्पर्श करा, ते पदार्थ नाभी मध्ये शोषले जातात.
मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की भगवान विष्णूंच्या नाभी मधून कमळाची निर्मिती झाली आणि या कमळातून भगवान ब्रह्म देव यांची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. आणि ब्रह्म देवांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली.
थोडक्यात या सृष्टी ची निर्मिती ही भगवान विष्णूंच्या नाभी मुळे झाली अस म्हणता येईल. मित्रांनो नाभीचे महत्त्व खूप मोठं आहे. असं म्हटलं जातं की झोपताना आपल्या बेंबीला मोहरीचे तेल लावले तर, आपलं आरोग्य सुधारते, आपल्याला अनेक प्रकारच्या त्वचा रो गापासून सुटका मिळते.
मित्रांनो आपण अनामिकेला जी हळद लावली आहे ते बोट आपण आपल्या नाभीला स्पर्श करायचं आहे. आपलं बोट आपण नाभी वरच ठेवायचं आहे आणि पुढील मंत्राचा जप करायचा आहे.
ओम भूर् भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो योनः प्रचोदयात्
हा मंत्र आहे गायत्री मंत्र. गायत्री मंत्राचा महिमा खूप मोठा आहे मित्रांनो. त्यामुळे प्रत्येकाला रोज या मंत्राचा जप करायला हवा. मित्रांनो गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर 3 वेळा ओम या शब्दाचा उच्चार आपल्याला करायचा आहे. थोडक्यात गायत्री मंत्राच्या शेवटी ओम जोडून आपण मंत्र म्हणायचा आहे.
या मंत्राचा जप तुम्ही 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 101 वेळा जेवढं तुम्हाला शक्य असेल या मंत्राचा जप करा. तुम्ही जेवढं जप कराल तेवढं तुम्हाला चांगलं फळ मिळेल.
ओम भूर् भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो योनः प्रचोदयात्
ओम ओम ओम
या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे.
ज्यांना आपल्या व्यक्तमत्वाने लोकांना स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वा मध्ये चुंबकीय शक्ती निर्माण करायची आहे त्यांनी या मंत्राचा जप करावा.
आणि ज्या व्यक्तींच्या आयुष्यात दारिद्रय आहे, पैसा येत नाही, आला तर टिकत नाही त्यांनी गायत्री मंत्राचा उच्चार केल्यानंतर ओम चा उच्चार न करता माता लक्ष्मी च्या बीज मंत्रातील श्रीम या मंत्राचा उच्चार करावा.
ओम भूर् भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो योनः प्रचोदयात्
श्रीम श्रीम श्रीम
अशा प्रकारे हळदीचे बोट नाभीला स्पर्श करताना या मंत्राचा जप करावा. याच्या उच्चाराने तुमच्या जीवनात पैसा, धन धान्य, संपत्ती कशाची कमतरता राहणार नाही. तुमच्या जीवनात सर्व बाजूने पैसा यायला सुरुवात होईल.
मित्रांनो या मंत्राचा जप करताना आपलं पूर्ण लक्ष हे नाभी वर असायला हवं. मंत्राचा जप करत असताना माता लक्ष्मी चे स्मरण करा. या सोबत सूर्य देवांचे स्मरण सुद्धा अवश्य करा. हा उपाय दररोज केला तरी चालेल. पण रोज करणं शक्य नसेल तर रविवारी रात्री झोपताना करा. तुम्हाला इच्छित फळ नक्की मिळेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा. अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.