नमस्कार मित्रांनो,
बियर कोणी प्यायला हवी? याविषयी आज आपण पाहणार आहोत. बरेचसे भारतीय बियर पिऊ लागले आहेत. याला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे बियर ही जर प्रमाणात घेतली तर आरोग्याला पोषक असते असा गैरसमज आणि दुसरं म्हणजे बियर पिणे हे एक सोशल स्टेटस चा भाग आहे. हाय स्टेटस चे लोक बिअर पितात असा असणारा गैरसमज.
मित्रांनो, या दोन्ही गोष्टी भारतीयांच्या मनामध्ये पाश्चात्त्य, विदेशी कंपन्यांनी अगदी जाणीवपूर्वक बिंबवलेले आहे. या कंपन्यांनी जाहिरातींद्वारे किंवा इतर मार्ग वापरून भारतीयांच्या मनामध्ये या दोन गोष्टी इतक्या खोलवर रुजवलेल्या आहेत की लोक बियर पिणे हे एक सोशल स्टेटसचा भाग समजतात.
आणि बियर प्रमाणात घ्यायला हवी म्हणजे त्याचे फायदे होतात हे तर एक खोटी थेअरी आहे आणि याला आपण बळी पडलोय. यामागचं कारण आपण समजून घेऊया. जे अमेरिकेतील लोक आहेत किंवा इंग्लंड, फ्रान्स किंवा युरोप खंडातील जे लोक आहेत त्यांना आपण पाश्चात्त्य देश असे म्हणूया.
या ठिकाणचे लोक सर्रास बिअर पितात. वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल ते पितात. मग तुम्हाला असे वाटते का हे लोक चुकीचे करतात? अजिबात नाही. त्या लोकांनी बियर प्यायलाच हवी. कारण पाश्चात्त्य जे राष्ट्र आहे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश फार कमी असतो.
सतत बर्फ पडत असतो. परिणाम असा होतो की त्या ठिकाणी तापमान फार कमी असतं. त्यामुळे त्या लोकांच्या शरीरामध्ये एच सी एल म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्लाची निर्मिती कमी होते. हे आम्लं आपल्या शरीरात पचनक्रिया चांगली चालण्यासाठी फार आवश्यक असतं.
आपण जे काही खाल्लं असेल ते जर चांगलं पचन व्हायचं असेल तर एच सी एल ची निर्मिती आपल्या शरीरात व्हावी लागते आणि या देशांमध्ये तापमान फारच कमी असल्यामुळे याची निर्मिती होत नाही. मग ती व्हावी यासाठी हे लोक बिअर पितात.
जेवणाआधी ही पितात आणि जेवणानंतर ही पितात. जेणेकरून खाल्लेले व्यवस्थित पचेल. जर त्यांनी बीयरच घेतली नाही तर त्यांच्या पचनक्रियेवर याचा विपरीत परिणाम नक्की होतो. म्हणजेच त्यांना बिअर पिणे हे आवश्यक आहे.
आपल्याकडे सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असतो. एकंदरीतच आपल्याकडचं वातावरण हे गर्मी चे वातावरण आहे. आपल्याकडे तापमान फार जास्त असतं. आपल्या शरीरात उष्णता आधीच खूप जास्त आहे.
आणि त्यातल्या त्यात आपण जर ही बियर प्यायलो तर त्यामुळे अतिरिक्त एचसीएल ची निर्मिती होते. त्याचे ऍसिड आपल्या शरीरात तयार होते आणि मग अल्सर आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार पाठीमागे लागतात. आपल्या शरीराची हानी होते.
मग मित्रांनो तुम्हीच ठरवायचे आहे की आपण या पाश्चात्त्य लोकांचे आंधळेपणाने अनुकरण करायचे की नाही. आपण जाणीवपूर्वक या बियरचा खप वाढावा म्हणून या विदेशी कंपन्यांनी आपल्या मनावर बिंबवलेल्या दोन गोष्टी, गैरसमज आपण पाहिल्या.
म्हणून बियर आणि अल्कोहोलपासून होईल तितका लांब रहा आणि आपल्या देशाचा लाखो कोटींचा तो पैसा बाहेर देशात चालला आहे तो वाचवा.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका